Corona Cases and Lockdown News LIVE : राज्यातील कोरोनाच्या अपडेट्स, कुठे किती रुग्ण? वाचा…

| Updated on: Apr 10, 2021 | 12:41 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Corona Cases and Lockdown News LIVE : राज्यातील कोरोनाच्या अपडेट्स, कुठे किती रुग्ण? वाचा...
सांकेतिक फोटो

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदीआणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे.| Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Apr 2021 12:36 AM (IST)

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत कोरोना बाधित

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत कोरोना बाधित, आरटीपीसीआर कोरोना चाचणी पॉझिटीव्ह, किंग्जवे हॉस्पीटल येथे भरती, शुक्रवारपासून (9 एप्रिल) सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवल्याने चाचणी करुन रुग्णालयात दाखल

  • 10 Apr 2021 12:24 AM (IST)

    राज्याच्या महासंचालक आणि महानिरीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार संजय पांडे यांच्याकडे

    राज्याच्या महासंचालक आणि महानिरीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार संजय पांडे यांच्याकडे देण्यात आलाय. संजय पांडे सध्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या पोलीस महासंचालक आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त आहेत. महासंचालक आणि महानिरीक्षप पदावर नव्या नियुक्ती होऊपर्यंत हा अतिरिक्त कार्यभार पांडे यांच्याकडे राहणार आहे.

  • 09 Apr 2021 10:42 PM (IST)

    मीरा भाईंदरमध्ये दिवसभरात 397 नवे पॉझिटिव्ह रुग्ण

    मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ

    महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज चोवीस तासात 397 पॉझिटिव्ह रुग्ण

    मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

    मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत 34हजार 174 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 29 हजार 518 रुग्ण बरे होवून घरी परतले आहे.

    मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 3 हजार 804 रुग्णावर उपचार सुरु आहे.

    मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता पर्यंत 852 रुग्णांणचा मृत्यू झाला आहे.

  • 09 Apr 2021 10:23 PM (IST)

    नागपूरच्या वाडी परिसरात कोव्हिड रुग्णालयाला भीषण आग

    नागपूरच्या वाडी परिसरातील वेल सीट हॉस्पिटलला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. संबंधित रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु होता. संबंधित रुग्णालय हे 30 बेड्सचं होतं. यापैकी तीन रुग्णांना आज सकाळीच डिस्चार्ज देण्यात आला. तर उरलेल्या 27 रुग्णांना दुसरीकडे सुखरुप दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलं. रुग्णालयाच्या आयसीयूत आग लागली होती. ही आग लागताच क्षणी एकच खळबळ उडाली. तातडीने अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी रवाना करण्यात आली. तसेच रुग्णवाहिकेच्या साहाय्याने रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करण्याचं काम सुरु झालं.

  • 09 Apr 2021 09:52 PM (IST)

    वीकेंड लॉकडाऊनमध्ये मुंबई एपीएमसीच्या पाचही बाजारपेठ सुरू राहणार

    राज्यात आजपासून दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन सुरू झाला आहे. या लॉकडाऊन काळात शहरात बहुतेक आस्थापना बंद राहणार आहेत. मात्र मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य, भाजीपाला, फळ, मसाला आणि कांदा बटाटा मार्केट सुरू राहणार असल्याचे माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी दिली आहे. मार्केटमध्ये गर्दी राहणार नसून जास्त समान डिलीव्हरी देण्यात येईल असे व्यपाऱ्याने सांगितले. दोन दिवस लॉकडाऊन नंतर सोमवारी बाजार आवारात येणाऱ्या प्रत्येक घटकांना अँटिझन टेस्ट निगेटिव्ह रिपोर्ट दाखवल्यानंतर मार्केटमध्ये प्रवेश देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया डक यांनी दिली .

  • 09 Apr 2021 09:49 PM (IST)

    वसई-विरारमध्ये दिवसभरात 700 नवे कोरोनाबाधित

    वसई-विरार कोरोना अपडेट

    मागच्या 24 तासात 700 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

    आज दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू

    283 जणांनी केली कोरोनावर मात

    वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या – 37,791

    कोरोना मुक्त झालेली रुग्ण संख्या – 31,961

    आजपर्यंत कोरोनाने मृत्यू झालेली रुग्ण संख्या – 932

    कोरोनावर उपचार घेत असलेली रुग्ण संख्या – 4898

  • 09 Apr 2021 08:25 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात दिवसभरात 363 नवे कोरोना रुग्ण, 5 बाधितांचा मृत्यू

    सांगली कोरोना अपडेट 

    जिल्ह्यात आज दिवसभरात 363 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 5 रुग्णाचा मृत्यू

    जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 1836 वर

    ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 3385 वर

    तर उपचार घेणारे 214 जण आज कोरोना मुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 49434 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 54656 वर

  • 09 Apr 2021 08:22 PM (IST)

    राज्यात वीकेंड लॉकडाऊनला सुरुवात, मुंबईत अनेक दुकानं तात्काळ बंद

    राज्य सरकारच्या आदेशानंतर शुक्रवार रात्री आठ वाजल्यापासून ते सोमवार सकाळ सात वाजेपर्यंत लॉकडाऊन जारी झालाय. गिरगाव, चर्नीरोड परिसरामध्ये दुकान तात्काळ बंद करण्यात आली आहेत. पोलिसांच्या या कडक कारवाईमुळे गिरगाव परिसरामध्ये दुकानदारांनी दुकान बंद केली आहेत.

  • 09 Apr 2021 08:18 PM (IST)

    रत्नागिरीत वीकेंड लॉकडाऊनला सुरुवात

    रत्नागिरी : वीकेंड लाॅकडाऊनची रत्नागिरी जिल्ह्यात सुरुवात

    गेल्या वर्षातील लाॅकडाऊननंतर पहिल्यांदाच लाॅकडाऊनला सुरु

    अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त, रात्रीच्या संचारबंदीवर पोलिसांची नजर

    महत्वाच्या चेकपोस्टवर पोलिस बॅरिकेटिंग

    रात्री आठनंतरच्या संचारबंदीचे नियम कडक

    रात्रीपासून सुरु झालेला विकेंड लाॅकडाऊनची कडक अमंलबजावणी

    शहरातील मुख्य रस्त्यांवरती गाड्यांची ये जा अजूनही सुरूच

    कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाचे ठोस पावले

  • 09 Apr 2021 08:15 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात तब्बल 51 रुग्णांचा मृत्यू, 5647 नवे कोरोनाबाधित

    पुणे कोरोना अपडेट : – दिवसभरात ५६४७ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ४५८७ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ५१ रुग्णांचा मृत्यू. ०७ रूग्ण पुण्याबाहेरील. – १००३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३१८०२९. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४९९५५. – एकूण मृत्यू -५६५४. -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २६२४२०. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २७९८६.

  • 09 Apr 2021 07:23 PM (IST)

    वसई विरार महापालिकेतील लसीचा साठा संपला

    – वसई विरार महापालिकेतील लसीचा साठा संपला

    – रविवार 11 एप्रिल 2021 रोजीपासून ते पुढील आदेश /sईपर्यत महानगरपालिकेतील लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस तसेच कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस देण्यात येणार नाही.

    – मात्र महानगरपालिकेतील खासगी सिद्धीविनायक हॉस्पिटल, विजयवल्ल्लभ हॉस्पिटल आणि कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटल येथील लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस सोमवारी म्हणजेच 12 एप्रिल  2021 रोजी पासून देण्यात येणार आहे.

    वसई विरार महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती

  • 09 Apr 2021 07:09 PM (IST)

    विकेंड लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी अंबरनाथमध्ये गर्दीचा महापूर

    विकेंड लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी अंबरनाथमध्ये गर्दीचा महापूर

    अंबरनाथ शहराच्या पूर्वेला छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि पश्चिमेच्या बाजारपेठेत नागरिकांची गर्दी

    सोशल डिस्टंसिंग तर सोडाच पण संचारबंदीचाही फज्जा

    विशेष म्हणजे व्यापार्‍यांनी सगळी दुकानं उघडी ठेवली आहेत

  • 09 Apr 2021 07:05 PM (IST)

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या होम आयसोलेशनचा निर्णय रद्द 

    सिंधुदुर्ग: जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या होम आयसोलेशनचा निर्णय रद्द

    जिल्ह्या पुरता प्रायोगिक तत्वावर निर्णय.

    दोन दिवस असणाऱ्या  लाॅकडाऊनची कडक अमंलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

    जिल्हावासियांनी सहकार्य करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आवाहन

    घरी आयसोलेशन करण्यात आलेल्या रूग्णांना जर कोरोना सेंटरमध्ये दाखल केलं तर आकडा कमी होऊ शकतो. त्यामुळे आता होम आयसोलेशनचा निर्णय जिल्ह्यापुरता रद्द

    उदय सामंत यांची माहिती

  • 09 Apr 2021 05:42 PM (IST)

    मुख्यमंत्री भांबावले, राज्यपालांनी महाराष्ट्राला वाढीव लसी मिळवून देण्यासाठी हस्तक्षेप करावा : प्रविण दरेकर

    “केंद्राने 1 कोटी 6 लाखांच्या वर लसी दिल्या. पण राज्यातील कोरोना परिस्थिती भयानक आहे. त्यामुळे आम्ही राज्यपालांना विनंती केली. मुख्यमंत्री भांबावले आहेत. त्यामुळे राज्यपालांनी वाढीव लसी कसे मिळतील यासाठी हस्तक्षेप करावा अशी विनंती केली आहे”, असं प्रविण दरेकर म्हणाले.

    “सरकारला लॉकडाऊनची घाई होती. आज आमची बैठक होती. या बैठकीत एमपीएससी परीक्षेवर चर्चा झाली. या बैठकीत अचानक लॉकडाऊन विषयावर चर्चा सुरु झाली. त्यामुळे सर्व पक्षीय नेत्यांचे मत घेऊन याबाबत निर्णय घेण्याची मागणी आम्ही केली”, असं दरेकर यांनी सांगितलं

    “राज्य सरकार लॉकडाऊन घोषित करुन व्यापाऱ्यांना काय दिलासा देणार? हे स्पष्ट करा. इतर राज्यांनी कोरोना काळात विविध पॅकेज जाहीर करा. असंघटीत कामगारांच्या बँक खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये टाका. सरसकट लॉकडाऊन केल्यास व्यापारी, शेतकरी आणि कष्टकरींचा उद्रेक होईल”, असं मत त्यांनी मांडलं.

  • 09 Apr 2021 05:35 PM (IST)

    पुण्यासाठी केंद्राकडून आज रात्री 2 लाख 48 हजार लसींचे डोस

    पुणे : पुण्यासाठी केंद्राकडून आज रात्री 2 लाख 48 हजार लसींचे डोस येणार, 1 लाख 25 लसीचे डोस शनिवारी येणार, एकूण 3 लाख 73 हजार लसीचे डोस उपलब्ध होणार, यातले 40 टक्के ग्रामीणला, 40 टक्के पुणे शहराला तर पिंपरी चिंचवडला 20 टक्के लसीचे डोस मिळणार, राज्याला डावलून केंद्राने दिले थेट पुणे जिल्ह्याला डोस, पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता

  • 09 Apr 2021 05:32 PM (IST)

    अमरावतीत तब्बल 425 नवे कोरोनाबाधित, तीन रुग्णांचा मृत्यू

    अमरावती जिल्हात आज 425 नवीन कोरोना बाधित रुग्

    आज तीन रुग्णांचा कोरोनाने उपचारा दरम्यान मृत्यू

    आज 320 रुग्णांनी केली कोरोनावर मात

    जिल्हात कोरोना बधितांची संख्या 51525

    जिल्हात आतापर्यंत 47837 रुग्णांनी केली कोरोनावर मात

    जिल्हात 700 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू

    जिल्हात 2988 रुग्णांवर उपचार सुरू

  • 09 Apr 2021 05:30 PM (IST)

    नागपुरात दिवसभरात 64 रुग्णांचा मृत्यू, 6489 नवे कोरोनाबाधित

    नागपुरात आज 64 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    6489 नवीन कोरोना रुग्णांची नोंद तर 2175 जणांनी केली कोरोनावर मात

    सध्या सक्रीय रुग्ण-49,347

    दिवसभरातील टेस्टची संख्या – 22,797

    एकूण रुग्णसंख्या – 266224

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 211236

    एकूण मृत्यूसंख्या – 5641

  • 09 Apr 2021 05:07 PM (IST)

    वाशिममध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ

    वाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसागणीक  कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनच्यावतीने कोरोना संर्सग रोखण्याकरीता तातडीच्या  उपाययोजना करण्यात येत आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ज्या गावात रुग्णसंख्या वाढत आहे त्या परीसरात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून बॅरीकेट लावून पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. वाशिम तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील सात दिवसात 369 रुग्ण आढळले आहेत. त्यात तालुक्यातील उकळीपेन येथे आतापर्यंत गावात 100 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे येथे कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. आरोग्य विभागाने या गावातील कोरोना चाचण्यात वाढ केली आली आहे.
  • 09 Apr 2021 05:05 PM (IST)

    सांगली जेडपी कार्यालयात कोरोनाता शिरकाव, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

    सांगली : सांगली जिल्हापरिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकरी अधिकारी आणि प्रभारी प्रकल्प संचालक यांचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. तसेच वित्त विभागातील एका  महिला सहाय्यक लेखाधिकाऱ्यांनाही कोरोना लागण झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी जिल्हापरिषद मुख्यालयातील जबाबदार अधिकाऱ्यांनाच कोरोना झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर जिल्हापरिषद प्रशासनाने तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून पाणी व स्वच्छता विभाग, वित्त विभाग आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे कार्यालय  सॅनिटाइझरिंग करून ते सील केले आहेत.
  • 09 Apr 2021 05:03 PM (IST)

    औरंगाबाद परिस्थितीतवर जिल्हाधिकारी काय म्हणाले?

    औरंगाबादेतील कोरोना परिस्थितीतवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली. ते काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

    औरंगाबाद परिस्थितीतवर जिल्हाधिकारी काय म्हणाले?

    रेमडेसिव्हीर बाबत आम्ही पूर्वीपासून चांगलं प्लॅनिंग केलं होतं. त्यामुळे आज आमच्याकडे 19 हजार पेक्षा जास्त रेमेडिसिव्हिअर इंजेक्शनचा साठा आहे. आणि हा साठा खूप काळजीपूर्वक वापरणार आहोत. दररोज 4 हजार पेक्षा जास्त इंजेक्शन वापरले जातात, आणि यापुढेही रेमेडिसिव्हिअरची अडचण येणार नाही.

    लसीबाबत आमचं टार्गेट मोठं आहे. 14 लाख लोकांना आम्ही लस दिली. आम्ही 2 लाखांपेक्षाही जास्त लोकांना लस दिली आहे. सध्या तरी लसीमुळे लसीकरण थांबलेलं नाही. आम्ही सरकारकडे जवळपास 9 लाख लसींची मागणी केली आहे. आणि येत्या काळात आम्हाला टप्प्याटप्प्याने पुरवठा होईल

    ऑक्सिजन सुद्धा गरजेपेक्षा जास्त ऑक्सिजन उपलब्ध आहे. आम्हला दिवसाला 52 हजार केएल ऑक्सिजन लागतं आणि आमच्याकडे 72 केएल इतकं ऑक्सिजन उपलब्ध आहे आणि आणखी 33 केएल ऑक्सिजन प्लांटचे काम सुरू आहे ते काम येत्या 20 दिवसात पूर्ण होईल.

    उद्यापासून औरंगाबाद शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच सेवा बंद असणार आहेत. शहरात लोकांचा होणार संचार थांबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी नागरिकांना विनंती करतो शनिवार रविवारच्या नियमांना साथ द्यावी, सध्या सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे औरंगाबाद शहरातील कोरोना कमी व्हायला मदत झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावं.

  • 09 Apr 2021 04:59 PM (IST)

    जळगावात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध, वीकेंड लॉकडाऊन दरम्यान मेडिकल आणि अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद राहणार

    राज्यासह जळगाव जिल्ह्यात वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी 30 एप्रिल पर्यत कडक निर्बंध लागू करण्यात आले असून शनिवार आणि रविवार हे दोन दिवस संपूर्ण लॉक डाऊन असून मेडिकल आणि अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, कुणीही विनाकारण बाहेर पडू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.

  • 09 Apr 2021 04:58 PM (IST)

    चंद्रपुरातील 34 व्यापारी संघटनांचा ‘ब्रेक द चेन’ नियमावलीतील तरतुदींना विरोध

    चंद्रपुरात 34 व्यापारी संघटनांनी एकत्र येत सरकारला सध्याच्या ‘ब्रेक द चेन’ नियमावलीतील तरतुदींना विरोध दर्शवत सोमवारपासून यात सूट न दिल्यास संपूर्ण दुकाने उघडू, असा इशारा दिला आहे. चंद्रपुरात घेतलेल्या एका पत्रपरिषदेत व्यापारी मंडळाने कोरोनासाठी संपूर्ण लॉकडाऊन आवश्यक असून अर्धवट लॉकडाऊनमुळे परिस्थिती बिकट होत चालल्याचे म्हटले. व्यापाऱ्यांना द्याव्या लागणाऱ्या दुकान भाडे -व्याज- पगार- टॅक्स- विज बिल -जीएसटी बंद झालेले नाही. मात्र सरकार  बँकेचे हप्ते- इन्शुरन्स- दारू दुकाने- आरटीओ- महसुली उत्पन्नाची सर्व संस्थाने सुरू ठेवत स्वतःचा व्यापार सुरू ठेवत आहे. कापड-बांधकाम साहित्य-सोने यासह केवळ 15 टक्के दुकानदारांना बंद करून काय साधले जात आहे? असा सवाल विचारत यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला. सोमवारपर्यंत यावर निर्णय न झाल्यास संपूर्ण दुकाने उघडू आणि पोलिस कारवाईला सामोरे जाऊ, असाही निर्धार व्यापाऱ्यांनी केला आहे.

  • 09 Apr 2021 04:55 PM (IST)

    नांदेडमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा

    नांदेडमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा होत असल्याने रुगणांचे हाल होत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती नेमलीय. या समितीच्या मार्फतच आता रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे वितरण करण्यात येणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष संजय कदम यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना भेटून ही मागणी केली होती. त्यानंतर रेमडीसीवर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी समिती नेमण्यात आलीय.

  • 09 Apr 2021 04:54 PM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये किती बेड्स उपलब्ध?

    पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनारुग्ण बेड्स उपलब्ध आणि शिल्लक आकडेवारी
    बेड्स                    उपलब्ध        शिल्लक
    ऑक्सिजन बेड्स-   1998             541 आयसीयू बेड्स-     502                116 व्हेंटिलेटर बेड्स-     188                00

    -सध्या शहरात सक्रिय रुग्ण- 25 हजार

    -दिवसाला किती वाढत आहे ते रुग्णसंख्या -2500 ते 3000

  • 09 Apr 2021 04:53 PM (IST)

    सांगलीत संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पोलिसांचा लॉंगमार्च

    सांगली : शनिवार आणि रविवार संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पोलिसांचा लॉंगमार्च.  आज शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदीच्या धर्तीवर सांगलीच्या ग्रामीण भागात पोलिसांनी लॉंगमार्च काढण्यात येत आहे. राज्य सरकारच्या नियमाचे आणि जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या संख्या पाहता पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे.
    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यामध्ये शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी चे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने नागरिकांना सूचना देण्यासाठी आज स्थानिक प्रशासना मार्फत ग्रामीण भागातील मुख्य बाजारपेठेतून लॉंगमार्च काढण्यात आला. या काळामध्ये फक्त आरोग्य सेवा सुरू राहणार असून किराणा दुकानांसह सर्व आस्थापने बंद राहणार आहेत. या काळामध्ये कडक निर्बंध लागणार असून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
  • 09 Apr 2021 04:51 PM (IST)

    चंद्रपुरातही व्हेटिंलेटर बेड मिळेना, शहरातील केबल ऑपरेटरचा बेड न मिळाल्याने मृत्यू

    चंद्रपूर : चंद्रपुरात कोरोना उद्रेकामुळे व्हेंटिलेटरयुक्त खाटांची तीव्र टंचाई, शहरातील केबल ऑपरेटरचा बेड न मिळाल्याने झाला मृत्यू, होळीपासून शहरातील खाजगी इस्पितळात उपचार घेणारा या रुग्णाची ऑक्सिजन पातळी खालावली होती. रुग्णाचे नातेवाईक 48 तासांपासून बेडच्या शोध घेत होते. अखेर त्यांना बेड मिळाला. मात्र, बेड मिळाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटात रुग्णाचा मृत्यू झाला.
    चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात  668 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. तर नऊ बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 31 हजार 168 वर पोहोचली आहे. सध्या 3794 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 2 लाख 91 हजार 853 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. कोरोना उद्रेकाची  ही परिस्थिती असताना कोरोनाबाधित रुग्णांना मात्र बेड मिळत नसल्याचे चित्र आहे. 
  • 09 Apr 2021 04:42 PM (IST)

    ठाण्यातही अनेक भागांमध्ये लसीकरण केंद्र बंद

    लसीचा तुटवडा राज्यभरात आहे. मुंबई नंतर आता ठाण्यातही लसीकरण केंद्र बंद होताना दिसत आहेत. ठाण्यातील महत्त्वाचे लसीकरण सेंटर म्हणजे कैवशल्या  इस्पितळ लसीकरण केंद्र हे आज बंद झालं आहे. असे अनेक ठाण्यातील छोटे-मोठे लसीकरण केंद्र आज बंद झाली. नागरिकांना फोन येतात की लसीकरण घेण्यासाठी या आणि लसीकरण केंद्रावर गेल्यावर त्यांना कळतंय कि लसच नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे. एकीकडे करोना प्रचंड वाढतोय तर दुसरीकडे अशाप्रकारे लसीकरण बंद झालेलं दिसत आहे.

  • 09 Apr 2021 04:39 PM (IST)

    धक्कादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाही

    पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा कहर सुरू असताना आता शहरात एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती आरोग्य प्रमुख अनिल रॉय यांनी दिली आहे. जम्बो कोविड सेंटरमध्ये येत्या तीन दिवसात 50 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

  • 09 Apr 2021 04:04 PM (IST)

    राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याचे संकेत, मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

    राज्यात लॉक डाऊन लावण्याबाबत सरकारची चर्चा, मुख्यमंत्र्यांनी बोलावली उद्या दुपारी सर्व पक्षीय बैठक, वाढती रुग्णसंख्या आणि कडक निर्बंध लादूनही परिस्थितीत बदल नाही, त्यामुळे कोरोनाबाबत करावयाच्या उपाययोजनाबाबत उद्या पुन्हा चर्चा होणार, त्यामुळे सरकार लॉकडाऊनच्या बाबत विचार करत असल्याची चर्चा, उद्या बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, जयंत पाटील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, राज ठाकरे बैठकीला उपस्थित असणार आहेत.

    “राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनबाबत चर्चा होणार आहे. सध्याची रुग्णसंख्या ही पाच लाख आहे. पुढच्या काही दिवसात ही संख्या दहा लाखांवर गेली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. त्यामुळे लॉकडाऊनबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत विरोधी पक्षाचं मत घेतलं जाईल”, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

  • 09 Apr 2021 04:01 PM (IST)

    सांगलीत केंद्रीय पथकाची वॉररुमला भेट

    सांगली : केंद्रीय पथकाची महापालिकेच्या वॉररुमला भेट, वॅाररूमच्या कामकाजाबद्दल केली पाहणी , मनपा क्षेत्रात अनेक रुग्णालयांनाही दिल्या भेटी

  • 09 Apr 2021 02:33 PM (IST)

    पुण्यातील अनेक लसीकरण केंद्रांवर लसीकरणाचा साठा संपलाय

    पुणे –

    – पुण्यातील अनेक लसीकरण केंद्रांवर लसीकरणाचा साठा संपलाय,

    – लस उपलब्ध नसल्यामुळे शहरातील अनेक लसीकरण केंद्र बंद,

    – सकाळपर्यंत लसीकरण सुरू होते, आता लसीकरण बंद करण्यात आलेत,

    – लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केलेल्या नागरिकांना घरी परतावे लागतंय,

    – लस उपलब्ध झाल्यावर लसीकरण केंद्र सुरू करणार

  • 09 Apr 2021 02:20 PM (IST)

    नाशकातील वोकहार्ट हॉस्पिटलची मुजोरी, बिल भरलं नाही म्हणून तीन दिवसांपासून कोरोना रुग्णाची ट्रीटमेंट बंद

    नाशिक –

    वोकहार्ट हॉस्पिटलची मुजोरी

    बिल भरलं नाही म्हणून तीन दिवसांपासून कोरोना रुगणाची ट्रीटमेंट बंद

    महापालिका अधिकाऱयांनी धाड टाकून केली रुगणाची सुटका

    नाशिकच्या अशोका हॉस्पिटल पाठोपाठ वोकहार्ड हॉस्पिटल वर कारवाई करणार – मनपा अधिकाऱयांची माहिती

  • 09 Apr 2021 01:27 PM (IST)

    4 हजार रुपयाला रेमडेसीव्हीर विकल्याप्रकरणी बार्शीतील मेडिकल सील

    सोलापुर –

    4 हजार रुपयाला रेमडेसीव्हीर विकल्याप्रकरणी बार्शीतील मेडिकल सील

    डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय शहा हॉस्पिटल मधील मेडिकल मध्ये चार हजार रुपयाला विकले जात होते रेमडीसिव्हर

    होलसेल विक्रेते राजन ठक्कर यांनी केले होते स्टिंग ऑपरेशन

    बार्शी तहसीलदार आणि अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केले मेडिकल सील

  • 09 Apr 2021 01:17 PM (IST)

    नाशिकमध्ये रुग्णांची हेळसांड सुरुच, व्हेंटीलेटर बेड न मिळाल्याने रुग्णांची वणवण

    नाशिक – शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड सुरूच..

    व्हेंटिलेटर बेड मिळत नाल्याने रुग्ण फिरतात हॉस्पिटलच्या दारोदार ..

    रुग्णाच्या नातेवाईकांकडून व्हिडीओच्या माध्यमातून मदतीची मागणी

    नाशिकमध्ये रुग्ण रामभरोसे .

  • 09 Apr 2021 12:30 PM (IST)

    अजित पवार यांच्या जाहीर सभेत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

    मंगळवेढा –

    अजित पवार यांच्या जाहीर सभेत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

    राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी अजित पवाराची हुलजंती येथे जाहिरसभा

    कोरोनामुळेच झाला होता आमदार भारत भालके यांचा मृत्यू

    भालके यांच्या मृत्यूमुळे लागली आहे पोटनिवडणूक

    मात्र लोकप्रतिनिधी बरोबर सर्वसामान्य लोकांना कसलच गांभीर्यच नाही

    कित्येक नागरिकाच्या तोंडावर मास्क नाही

  • 09 Apr 2021 12:30 PM (IST)

    बारामतीत एकाच दिवसात 255 जणांना कोरोना

    बारामती :

    बारामतीत एकाच दिवसात 255 जणांना कोरोना

    काल झाली होती 750 जणांची तपासणी

    बारामतीतील कोरोना रुग्णांची संख्या गेली 11 हजार 208 वर

    काल दिवसभरात चौघांचा झाला कोरोनामुळे मृत्यू

    बारामतीत कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस होतेय विदारक

  • 09 Apr 2021 12:17 PM (IST)

    मुलुंड येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये नागरिकांची लस घेण्यासाठी झुंबड

    – मुलुंड येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये नागरिकांची लस घेण्यासाठी झुंबड

    – लसीचा साठा संपतोय या भीतीने नागरिकांची गर्दी

    – कोविड सेंटर मध्ये शेवटचे काही डोस उपलब्ध होते, जे काही वेळातच संपले, त्यामुळे आता येणाऱ्या नागरिकांची गैरसोय

    – सोमवारपर्यंत कोणाचेही लसीकरण होणार नाही, अशा ऊद्धोषणा सुरु

    – एकीकडे कोरोनाची भीती दुसरीकडे लसही ऊपलब्ध नाही, त्यामुळे नागरीक हतबल

  • 09 Apr 2021 12:07 PM (IST)

    बारामतीत कोरोनाचा हाहाकार, एकाच दिवसात 255 जणांना लागण

    बारामती : बारामतीत एकाच दिवसात 255 जणांना कोरोना

    काल झाली होती 750 जणांची तपासणी

    बारामतीतील कोरोना रुग्णांची संख्या गेली 11 हजार 208 वर

    काल दिवसभरात चौघांचा झाला कोरोनामुळे मृत्यू

    बारामतीत कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस होतेय विदारक..

  • 09 Apr 2021 12:05 PM (IST)

    पुण्यापाठोपाठ बारामतीतील व्यापारीही सोमवारी सुरु करणार दुकाने, बैठकीत निर्णय

    बारामती : पुण्यापाठोपाठ बारामतीतील व्यापारीही सोमवारी सुरु करणार दुकाने… – सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत सुरु करणार दुकाने.. – कोरोना नियमांचे पालन करत व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय.. – बारामती व्यापारी महासंघाच्या बैठकीत झाला निर्णय..

  • 09 Apr 2021 10:58 AM (IST)

    पनवेल महानगरपालिका हद्दीतील लसीकरण 6 एप्रिलपासून बदं

    रायगड पनवेल

    पनवेल महानगरपालिका हद्दीतील लसीकरण 6 एप्रिलपासून बदं.

    पनवेल हद्दीतील 21 केद्रांवरील लसीकरण बदं

    खाजगी आणि शासकीय लसीकरण केद्रांचा समावेश आहे

  • 09 Apr 2021 10:54 AM (IST)

    रायगड जिल्ह्यातील 25 केद्रांवरील लसीकरण बदं

    रायगड

    जिल्ह्यातील 25 केद्रांवरील लसीकरण बदं

    59 केद्रांवर आज शेवटचा साठा.

    जिल्हा प्रशासनकडे कोवीशिल्ड 100 तर कोवँक्सीन 3680 लस साठा उपलब्ध

  • 09 Apr 2021 10:35 AM (IST)

    यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभियारण्य 30 एप्रिलपर्यंत बंद

    यवतमाळ : व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभियारण्य 30 एप्रिलपर्यंत बंद, वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर घेतला वन विभागाने निर्णय

  • 09 Apr 2021 09:40 AM (IST)

    नाशकात अशोका मेडिकव्हर रुग्णालयाला महापालिकेची नोटीस

    नाशिक –

    नाशकात अशोका मेडिकव्हर रुग्णालयाला महापालिकेची नोटीस

    अतिरिक्त आयुक्तांच्या तपासणीत नियमांचे उल्लंघन होत असल्याचं आलं समोर

    80 टक्के बेड कोरोना साठी राखीव न ठेवणे यासोबत अनेक नियमांची पायमल्ली

    चूक करणाऱ्यांची गय क्रमार नाही

    आयुक्त कैलास जाधव यांच्या खाजगी रुग्णालयांना इशारा

  • 09 Apr 2021 09:38 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यातील सीपीआर, आयजीएम आणि गडहिंग्लज सेवा रुग्णालय कोरोनासाठी राखीव

    कोल्हापूर :

    जिल्ह्यातील सीपीआर, आयजीएम आणि गडहिंग्लज सेवा रुग्णालय कोरोनासाठी राखीव

    वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    या रुग्णालयांमधील इतर आजारांच्या सेवा अन्य रुग्णालयात मिळणार

  • 09 Apr 2021 09:01 AM (IST)

    नंदुरबारमध्ये सर्व ॲक्सिजन बेड फुल्ल

    नंदुरबार –

    – जिल्ह्यात 550 ॲक्सिजन बेड आहेत सर्व बेड फुल्ल आहेत एक ही रिक्त नाही…

    – जिल्ह्यात 94 व्हेंटिलेटर बेड आहेत त्यापैकी सर्व फुल आहेत….

    – शहरी आणि ग्रामीण भागात लसीकरण केंद्र सुरू आहेत अजून सात दिवस पुरेल इतका लसींचा साठा शिल्लक आहे….

  • 09 Apr 2021 09:00 AM (IST)

    रत्नागिरीत मिनी लाॅकडाऊनचा रत्नागिरीतील बाजारपेठेला मोठा फटका

    रत्नागिरी-

    मिनी लाॅकडाऊनचा रत्नागिरीतील बाजारपेठेला मोठा फटका

    दैनंदिन आठ कोटींची उलाढाल ठप्प

    लग्नसराई आणि पाडव्याच्या खरेदीवर सुद्धा परिणाम

    सराफी पेढ्यांना जास्त फटका, दुकानामध्ये काम करणाऱ्यांना हि ब्रेक

  • 09 Apr 2021 08:44 AM (IST)

    पुण्यातील कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी उभारण्यात आलेले जम्बो कोविड हॉस्पिटल झाले फुल्ल

    पुणे –

    – कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी उभारण्यात आलेले जम्बो कोविड हॉस्पिटल झाले फुल्ल,

    – अवघ्या बारा दिवसांमध्ये पूर्ण क्षमतेने भरले,

    – जम्बो कोविड सेंटरमध्ये सहाशे रुग्ण उपचारासाठी दाखल,

    – गेल्या वर्षी सर्वाधिक या विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर तीनशे ते चारशे रुग्ण या हॉस्पिटलमध्ये दाखल होते.

    – शहरातील आणि जिल्ह्यातील रुग्णवाढीमुळे जम्बो हॉस्पिटल पुन्हा सुरू करण्यात आले.

  • 09 Apr 2021 08:25 AM (IST)

    कोरोना प्रतिबंधक लस संपली, आज पिंपरी-चिंचवडमध्ये सर्व लसीकरण केंद्रे बंद

    पिंपरी चिंचवड

    – कोरोना प्रतिबंधक लस संपली आज पिंपरी चिंचवड मध्ये सर्व लसीकरण केंद्रे बंद

    – महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी कोविड19 प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र कार्यरत आहेत मात्र लसीचा साठा उपलब्ध नसल्याने तूर्त आज महापालिकेचे सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे

    -महापालिका आरोग्य विभागाकडून पत्रक जारी

  • 09 Apr 2021 08:24 AM (IST)

    कोरोनच्या पार्शवभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात नागरिकांना येण्यास मनाई

    पिंपरी-चिंचवड

    – कोरोनच्या पार्शवभूमीवर पोलीस आयुक्त कार्यालयात नागरिकांना येण्यास मनाई; अत्यावश्यक असल्यास पूर्वनियोजित वेळ घ्यावी लागणार

    -अत्यावश्यक कामासोबतच अनावश्यक गर्दी देखील आयुक्त कार्यालयात होत असते.त्यामुळे कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी आयुक्त कार्यालयात न येण्याचे आवाहन

    -एखाद्या प्रकरणात पोलीस आयुक्तांची भेट घेणे अत्यावश्यक असेल,अशा नागरिकांनी पूर्वनियोजित वेळ घेऊन कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून भेट घ्यावी,असे आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.

  • 09 Apr 2021 08:06 AM (IST)

    सांगली महापालिकेच्या 15 केंद्रांमध्ये लस संपली

    सांगली –

    महापालिकेच्या 15 केंद्रांमध्ये लस संपली

    मनपा क्षेत्रात 45 वर्षावरील 1लाख 13 हजार व्यक्ती चे लसीकरण बाकी

    नागरिक लसी च्या तुटवड्यामुळे हैराण

    मनपा सह जिह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत सतत वाढ

    मनपा सह जिह्यासाठी शासनाकडे 2 लाख लसी ची केली मागणी

    मात्र सध्या तरी लस कधी येणार याबाबत शासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही

    लसीकरण अधिकारी डॉ विवेक पाटील यांनी दिली माहिती

    सांगलीकर सध्या लसी च्या प्रतीक्षेत

  • 09 Apr 2021 08:05 AM (IST)

    रत्नागिरी जिल्ह्यात नियमित लसीकरण बंद

    रत्नागिरी –

    जिल्ह्यात नियमित लसीकरण बंद

    लसीचा तुटवडा भासत असल्यााने जिल्हा आरोग्य यंत्रणेचा निर्णय

    पहिली लस घेण्यासाठी नागरिकांना दिन दिवस वाट पहावी लागणार

    अकराशे डोस दुसऱ्या टप्यातील लसीकरणासाठी ठेवले राखिव

  • 09 Apr 2021 08:04 AM (IST)

    औरंगाबाद शहरात 1,392 रुग्णांची वाढ

    औरंगाबाद –

    औरंगाबाद शहरात 1,392 रुग्णांची झाली वाढ

    कोरोनाबधितांचा आकडा पोचला 94035 वर

    तर आतापर्यंत 1895 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

    सध्या रुग्णालयात 14845 रुग्णांवर उपचार सुरू

  • 09 Apr 2021 08:03 AM (IST)

    सांगली नियम आणि निर्बंध मोडत मोर्चा काढल्याप्रकरणी 8 जणांवर गुन्हा

    सांगली –

    शासनाचे नियम आणि निर्बंध मोडत मोर्चा काढल्या प्रकरणी संयोजका सह 8 जणांवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

    जिह्यात सध्या जमावबंदी आदेश लागू आहे

    मोर्च्यात आमदार सुधीर गाडगीळ सुरेश खाडे

    माजी आमदार दिनकर पाटील शिवप्रतिष्ठान चे संभाजी भिडे

    जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे आदी चा मोर्चात होता सहभाग

  • 09 Apr 2021 07:29 AM (IST)

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा नागपूर विद्यापीठालाही फटका, दोन्ही दीक्षांत समारंभ पुढे ढकलले

    – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा नागपूर विद्यापीठालाही फटका

    – नागपूर विद्यापीठाचे दोन्ही दीक्षांत समारंभ पुढे ढकलले

    – ११ एप्रिल आणि २३ एप्रिलला होता दीक्षांत समारंभ

    – सरन्यायाधीश शरद बोबडेंना ‘एलएलडी’ मानद पदवीने सन्मानीत करण्यात येणार होते

    – ११ एप्रिलला सरन्यायाधीश बोबडे मानद पदवीने सन्मानीत करण्यात येणार होते

    – कोरोनाच्या लाटेमुळे विद्यापीठ प्रशासनाने दोन्ही दीक्षांत समारंभ पुढे ढकलले

  • 09 Apr 2021 07:03 AM (IST)

    राज्यात कोरोनाची सर्वाधिक भयावह स्थिती नागपुरात

    – 24 तासांत 72 कोरोना मृत्यूने नागपूर हादरलं

    – जिल्ह्यात 24 तासांत 5514 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    – ग्रामीण भागात कोरोना मृत्यूचं प्रमाण वाढल्याने चिंता वाढली

    – आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दोन लाखांच्या जवळ

    – राज्यात कोरोनाची सर्वाधिक भयावह स्थिती नागपुरात

  • 09 Apr 2021 07:00 AM (IST)

    राज्यात कोरोनाता उद्रेक, तब्बल 56 हजार 286 नवे रुग्ण

    राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 56 हजार 286 नवे कोरोनाबाधित आढळले

    376 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू

    राज्यात आज 36 हजार 130 रूग्णांना डिस्चार्ज

  • 09 Apr 2021 06:58 AM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासांत 2351 नवे कोरोना रुग्ण 

    पिंपरी चिंचवड –

    पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासांत 2351 नवे कोरोना रुग्ण

    आज दिवसभरात कोरोनामुक्त रुग्ण -1453

    आज दिवसभरात एकूण मृत्यू -21

    आतापर्यंत कोरोना रुग्ण -161119

    आतापर्यंत एकूण कोरोनामुक्त रुग्ण -133839

    आतापर्यंत एकूण मृत्यू -2122

  • 09 Apr 2021 06:57 AM (IST)

    पुण्यात गेल्या 24 तासांत तब्बल 7,010 नवे कोरोना रुग्ण

    पुणे कोरोना अपडेट

    – दिवसभरात उच्चांकी 7010 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

    – दिवसभरात 4099 रुग्णांना डिस्चार्ज

    – करोनाबाधित 43 रुग्णांचा मृत्यू,  16 रूग्ण पुण्याबाहेरील

    – 999 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत

    -एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3,12,382

    -ॲक्टिव्ह रुग्णसंख्या- 48939

    – एकूण मृत्यू – 5610

    -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज  – 257833

    – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 23595

  • 09 Apr 2021 06:55 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात कोव्हॅक्सीन लसीचा तुटवडा

    – नागपूर जिल्ह्यात कोव्हॅक्सीन लसीचा तुटवडा

    – कोव्हॅक्सीन संपल्याने मेडीकलमधील लसीकरण ठप्प

    – कोव्हॅक्सीन अभावी शहरातील सहा लसीकरण केंद्र बंद

    – कोवीशील्डचे दोन दिवस पुरेल येवढेच डोस

    – शहरात रोज १५ हजार नागरिकांचं सुरु होतं लसीकरण

    – कोव्हॅक्सीन संपल्याने अनेकांना मनस्ताप

  • 09 Apr 2021 06:54 AM (IST)

    मुंबईतील महत्त्वाच्या लसीकरण केंद्रावरील कोरोना लस संपलीय

    राज्यातील इतर ठिकाणांसोबतच आता मुंबईतील महत्त्वाच्या लसीकरण केंद्रावरील कोरोना लस संपलीय

    अनेक लसीकरण केंद्रावर शून्य लसीचा साठा आहे

    त्यामुळे शुक्रवारपासून (9 एप्रिल) अनेक लसीकरण केंद्रावर लस उपब्लध नसणार आहे

Published On - Apr 10,2021 12:39 AM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.