Maharashtra Coronavirus LIVE Update : सांगली जिल्ह्यात दिवसभरात 812 नवे कोरोनाबाधित, 20 रुग्णांचा मृत्यू
आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत | Corona Cases and Lockdown News LIVE
महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत | Corona Cases and Lockdown News LIVE
LIVE NEWS & UPDATES
-
सातारा जिल्ह्यात दिवसभरात 856 नवे कोरोनाबाधित
सातारा कोरोना अपडेट :
आज 856 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 16 बाधितांचा मृत्यू
738 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
आज अखेर सातारा जिल्हा कोरोना आकडेवारी
एकूण बाधित – 180607 घरी सोडण्यात आलेले – 165945 मृत्यू -4048 उपचारार्थ रुग्ण-10708
सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुभाष चव्हाण यांनी दिली माहिती
-
सांगली जिल्ह्यात दिवसभरात 812 नवे कोरोनाबाधित, 20 रुग्णांचा मृत्यू
सांगली कोरोना / म्युकर अपडेट –
जिल्ह्यात आज दिवसभरात 812 कोरोना रुग्ण
म्युकर मायकोसीस – एकूण रुग्ण 240 , आज आढळलेले रुग्ण 1
जिल्ह्यात आज कोरोनामुळे 20 रुग्णाचा मृत्यू
जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 3738 वर
ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 8951 वर
तर उपचार घेणारे 878 जण आज कोरोना मुक्त
आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 117512 वर
जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 130201 वर
-
-
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ, दिवसभरात 700 नवे कोरोनाबाधित
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे. दिवसभरात 700 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच 19 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 704 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
-
अकोल्यात दिवसभरात 29 नवे कोरोनाबाधित
अकोल्यात कोरोना अपडेट :
अकोल्यात आज दिवसभरात 29 रुग्ण पॉझिटिव्ह, दिवसभरात एकाचा मृत्यू
आतापर्यंत 1112 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, आतापर्यंत 54612 जणांनी कोरोनावर मात
तर सध्या 1422 रुग्ण उपचार घेत आहेत
तर दिवसभरात 199 जण कोरोनामुक्त झाले आहेत
-
नागपुरात दिवसभरात 72 नवे कोरोनाबाधित, 3 जणांचा मृत्यू
नागपूर :
नागपुरात आज 72 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
195 जणांनी केली कोरोना वर मात
तर 3 जणांचा कोरोना मुळे मृत्यू
-
-
वर्ध्यात सोमवारपासून काय सुरु, काय बंद?
वर्धा जिल्ह्यात सोमवारपासून निर्बंध शिथिल
नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करून उद्योग व्यवसाय करावा – जिल्हाधिकारी
मॉल्स, चित्रपटगृहे, नाटयगृहे पुर्णपणे बंद
सुरू करण्यात आलेली दुकाने :
*अत्यावश्यक वस्तु व सेवा संबधी व्यवसाय व दुकाने दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजे पर्यंत * अत्यावश्यक वस्तु व सेवा व्यतिरिक्त इतर सर्व व्यवसाय व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजे पर्यंत
* रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळी सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 4.00 या वेळेत 50 टक्के आसन क्षमतेनुसार डाईन-इन व शनिवार आणि रविवार फक्त पार्सल व घरपोच सुविधा.
सार्वजनिक ठिकाणे क्रिडांगणे, मोकळ्याजागा. उद्याने, बगीचे, मॉर्निंग व इव्हीनिंग वॉक, सायकलिंग दररोज सकाळी 5 ते सकाळी 9 वाजे पर्यंत.
खाजगी आस्थापना सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत अपवाद – खाजगी बँका, विमा, औषध कंपनी, सुक्ष्म वित्त संस्था व गैर बँकींग वित्त संस्था यांची कार्यालये नियमीतपणे सुरु राहतील)
कार्यालयीन उपस्थिती शासकीय/निमशासकीय/खाजगी – क्षमतेच्या 50टक्के (कोरोना विषयक कामे करणाऱ्या आस्थापना, कृषी, बँक, मान्सुनपुर्व कामांशी संबंधित यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत यंत्रणा, कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरु राहतील)
क्रिडा व मनोरंजन बाहेर मोकळया जागेत सकाळी 5 ते सकाळी 9 व सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत.
सामाजीक, सांस्कृतीक कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार 50 टक्के उपस्थितीत (सभागृहाच्या क्षमतेच्या) सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत.
विवाह समारंभ 50 लोकांच्या उपस्थितीत
अंत्यविधी 20 लोकांच्या उपस्थितीत
सभा/निवडणुका,स्थानिक प्राधिकरण व सहकारी संस्था यांचे आमसभा- क्षमतेच्या 50 टक्के
बांधकाम फक्त इन-सितु किंवा बाहेरुन मजुर आणण्याचे बाबतीत सायंकाळी 4 वाजेपर्यंत
कृषी संबंधीत बाबी दररोज सायंकाळी 4 वाजेपर्यंत
ई-कॉमर्स वस्तु व सेवा –नियमीतपणे पुर्ण वेळ (कोवीड विषयक मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन) जमावबंदी/संचारबंदी जमावबंदी सायंकाळी 5वाजेपर्यंत, संचारबंदी सायंकाळी 5 नंतर.
जीम / सलुन / ब्युटी पार्लर / स्पा / वेलनेस सेंटर दररोज सायंकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेसह पुर्व परवानगीसह,वातानुकूलित वापरास मनाई.
सार्वजनिक बस वाहतुक पुर्ण आसन क्षमतेने परंतु प्रवासींना उभ्याने प्रवास करण्यास मनाई आहे.
कार्गो वाहतुक सव्हीसेस (जास्तीत जास्त तीन व्यक्तींसह) — नियमीतपणे पुर्ण वेळ (कोवीड विषयक मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन)
आंतर जिल्हा प्रवासी वाहतुक खाजगी कार,टॅक्सी,बस नियमीतपणे पुर्णवेळ तथापी जर प्रवासी लेवल 5 मधील भागातुन येत असेल तर ई-पास आवश्यक.
उत्पादन क्षेत्र (निर्यात प्रधान उद्योग) नियमीतपणे पुर्ण वेळ (कोवीड विषयक मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन)
उत्पादन क्षेत्र
1.अत्यावश्यक वस्तु व त्या करीता लागणारे कच्चा माल उत्पादक पॅकेजींग व संपुर्ण साखळीतील सेवा(कोवीड विषयक मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन) 2. निरंतर प्रक्रिया असलेले उद्योग, 3. संरक्षण संबधीत उद्योग. 4. डाटा सेंटर / क्लॉवुड सर्व्हिस प्रोवायडर /माहिती तंत्रज्ञान सेवा संबंधी, गुंतागुतीचे पायाभुत सेवा व उद्योग – नियमीतपणे पुर्ण वेळ सुरू
उत्पादन क्षेत्र ( अत्यावश्यक सेवा व निरंतर प्रकिया उद्योग,निर्यात प्रधान उद्योग व इतर उत्पादन क्षेत्रातील उद्योग व सेवा — 50 टक्के स्टाफचे हालचालींचे परवानगीसह.
कोरोना चाचणी बंधनकारक सर्व उद्योग, व्यवसाय व खाजगी आस्थापना व त्यांचे कर्मचाऱ्यांना निगेटीव्ह RTPCR चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील. (वैधता 15 दिवसांकरीता) निगेटीव्ह RTPCR चाचणी अहवालाशिवाय दुकान / व्यवसाय सुरु करता येणार नाही. या नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोना माहामारीच्या आपत्ती जोपर्यंत अस्तीत्वात आहे तो पर्यंत संबधीत दुकान बंद ठेवण्यात येईल, तसेच दंड आकारण्यात येईल.
सदर आदेशाचा आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 60 नुसार कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद केले आहे.
-
वाशिम जिल्ह्यात सोमवारपासून काय सुरु, काय बंद?
वाशिम :
जिल्ह्याचा ‘पॉझिटिव्हीटी रेट’ 2.25 टक्केपर्यंत असून फक्त 9.01टक्के ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत.जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात असून त्यामुळे ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हटविण्यात आले आहेत….
अत्यावश्यक सेवा व इतर सेवांची दुकाने नियमित सुरु राहतील….
सिनेमागृहे 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यास मुभा देण्यात आली..
रेस्टॉरंट नियमित सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली..
जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पामध्ये गर्दी होणार नाही, याची दक्षता म्हणून ग्राहकांना टोकन पद्धतीचा वापर करण्याचा सल्ला…
मैदाने सुरु ठेवण्यास मुभा मात्र नियमांचे पालन बंधनकारक….
लग्न समारंभात 50 व्यक्ती अंत्यविधीला 20 व्यक्तींना उपस्थित राहण्यास मुभा…
अत्यावश्यक सेवा व इतर सेवांची दुकाने, सिनेमागृहे, मॉल, रेस्टॉरंट, सभागृह, मंगल कार्यालये, लॉन, जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आदी ठिकाणी दर्शनी भागात ‘नो मास्क, नो एन्ट्री’ (मास्क नाही, प्रवेश नाही) असे बोर्ड, फलक लावण्याचे आदेश…
-
सोमवारपासून जळगावात काय सुरु, काय बंद?
जळगावात काय सुरु, काय बंद ?
-अत्यावश्यक व इतर सर्व प्रकारच्या सेवा (रात्री 9 वाजेपर्यंत, सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानात 5 पेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये, दुकानाच्या दर्शनी भागात काच किंवा पारदर्शक शीट लावावी, सॅनिटायझेशनची व्यवस्था करावी)
-शॉपिंग मॉल, थिएटर्स, नाट्यगृह, सिंगल स्क्रिन मल्टिप्लेक्स (50 टक्के ग्राहक, प्रेक्षक क्षमतेसह)
-हॉटेल, रेस्टॉरंट व बार (50 टक्के ग्राहक क्षमतेसह सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत)
-सार्वजनिक ठिकाणे, मॉर्निंग वॉक, सायकलिंग, सर्व प्रकारच्या बैठका, ग्रामपंचायत निवडणूक/को-ऑपरेटिव्ह निवडणुका, बांधकामे, कृषी संबंधित कामे, सार्वजनिक वाहतूक, माल वाहतूक, सर्व कंपन्या, औद्योगिक आस्थापना (दिवसभर सुरू)
-आंतरजिल्हा प्रवासासाठी ई पासची गरज नाही (लेव्हल 5 मध्ये समावेश असणाऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी ई पास मात्र आवश्यक)
-खासगी कार्यालये व सरकारी कार्यालये 100 टक्के उपस्थितीसह सुरू असतील
-क्रीडा प्रकार, तत्सम स्पर्धा (50 टक्के प्रेक्षक क्षमतेसह)
-जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा तसेच वेलनेस सेंटर्स (50 टक्के ग्राहक क्षमतेसह)
….अन्यथा पुन्हा निर्बंध
जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निबंधांमध्ये सूट दिली आहे. परंतु, भविष्यात जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी दर हा 5 टक्क्यांपेक्षा अधिक झाला किंवा ऑक्सिजन बेडची उपलब्धता 25 टक्केपेक्षा जास्त झाल्यास नव्याने सुधारित आदेश जारी केले जातील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
-
नागपुरात पुढच्या आठवड्यात नेमकं काय सुरु, काय बंद? वाचा सविस्तर
नागपूर :
नागपूर जिल्हयातील निर्बंध कायम, काही बाबींमध्ये शिथिलता
जिल्हा पहिल्या श्रेणीत कायम
जिल्हा अद्यापही पहिल्या श्रेणीमध्ये समाविष्ट असला तरी जुने निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी कायम ठेवले आहे.
तथापि, आजपासून काही निर्बंध शिथील केले आहेत.
यामध्ये आधार कार्ड सेंटर, सायंकाळी 5 पर्यत,
तसेच टायपिंग इन्स्टिटयुट,कम्युटर इन्स्टिटयुट आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कौशल्य विकास इन्स्टिटयुट(एकावेळी 20 विदयार्थी किंवा क्षमतेपेक्षा 50 टक्कयापेक्षा कमी उपस्थितीत देता येणार प्रशिक्षण
शॉपिग मॉलमधील रेस्टाँरंट आणि बार 50 टक्के क्षमतेने रात्री 10 पर्यंत मुभा,
मॉलमधील बार मात्र सायंकाळी पाचपर्यतच सुरू राहतील.
इनडोअर गेमलाही सायंकाळी पाच वाजेपर्यत परवानगी राहील.
हे आदेश सोमवार 14 जून सकाळी 7 वाजतापासून तर 21 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यत लागू राहतील.
-
सांगलीच्या आयसोलेशन ॲटिकोविड सिरम या इंजेक्शनला मानवी चाचणीसाठी परवानगी
सांगली :
सांगली जिल्ह्यातल्या शिराळ्याच्या आयसोलेशन ॲटिकोविड सिरम या इंजेक्शनला मानवी चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे
पुढील आठवड्यात चाचण्या सूरू होणारं
शिराळ्याच्या आयशर बायोलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने प्लाजमा थेरेपी जर यशस्वी होते तर घोड्याच्या रक्तामध्ये प्रतिपिंडे तयार करून ती रुग्णास दिल्यास कोरोनाचा रुग्ण हमखास बरा होईल, याचा अभ्यास करून अँटिकोविड सिरम या नावाचे इंजेक्शन बनवलेले आहे
शिराळ्याच्या एमआयडीसीमध्ये असणारे या कंपनीने चीनमध्ये प्रतिजैविकांच्या वापराने बचतीचे प्रमाण रोखण्यात यश आले होते. त्याचाच वापर करून हे इंजेक्शन बनवले आहे. याची मानवी चाचणी करायला परवानगी देण्यात आली आहे
बायोलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सिरम इन्स्टिट्यूट प्रीमियम सिरम यांच्या संयोगाने हे इंजेक्शन बनवलेले आहे
-
वाशिम जिल्ह्यात आढळले 33 नवे रुग्ण, 83 जणांना देण्यात आला डिस्चार्ज
वाशिम कोरोना अपडेट
जिल्ह्यात आज आढळले 33 नवे रुग्ण
तर आज 83 जणांना देण्यात आला डिस्चार्ज
तसेच 02 रुग्णांचा झाला मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 41029
सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण – 642
आतापर्यंत डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 39786
आतापर्यंत एकूण मृत्यू – 600
-
पुण्यात दिवसभरात 242 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ, 388 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे कोरोना अपडेट
दिवसभरात 242 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
– दिवसभरात 388 रुग्णांना डिस्चार्ज
– पुण्यात करोनाबाधित 16 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 7 रुग्ण
– 511 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 474113
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या- 3027
– एकूण मृत्यू -8475
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 462610
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5532
-
नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमध्ये मोठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा
नागपूर :
नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमध्ये मोठी गर्दी
आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने नागपूरकरांनी केली गर्दी
अनलॉक नंतर बाजारपेठा उघडल्या, पाच वाजेपर्यंतच बाजार सुरू असल्याने मोठी गर्दी
सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे उडाला फज्जा
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देणारी ठरणार का ही गर्दी?
-
परराज्यातून येणाऱ्यांटी कोविड टेस्ट, पॉझिटिव्ह येणाऱ्यांना ठाणे महापालिकेकडून क्वारंटाईन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पॉझिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेड क्षमता बघता ठाणे महापालिका क्षेत्रात नियम शिथिल करण्यात आलेले आहे. त्यामुळे ठाणे शहर हे लेव्हल 2 मध्ये मोडत असल्याने सर्वकाही सुरळीत आहे. तर दुसरीकडे परराज्यातून येणारे लोकांसाठी ठाणे महापालिका स्थरावर अँटीजेन आणि rt-pcr टेस्ट करत आहे. त्यामुळे लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र ठाणे स्थानक बाहेर दिसत आहे. यामध्ये पॉझिवटिव्ह आढळल्यास त्यांना घोडबंदर येथील भाईंदर पाडा या ठिकाणी क्वारंटाईन केले जात आहे. त्यासाठी देखील व्यवस्था पालिका वैद्यकीय कक्षाकडून केली गेली आहे. आतापर्यंत जवळपास दोन लाख लोकांची तपासणी पालिकेकडून करण्यात आलेली आहे. अशा तपासणीमुळे पॉझिव्टिव्ह आणि निगेटिव्ह कोण हे समोर येत आहे.
-
मंगळवारपासून औरंगाबादचे न्यायालय 100 टक्के क्षमतेने सुरू
औरंगाबाद ब्रेकिंग :-
मंगळवारपासून औरंगाबादचे न्यायालय 100 टक्के क्षमतेने सुरू..
जिल्हा न्यायालयासह इतर न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून सुरू..
शहरातील न्यायालयाचे कामकाज 100 टक्क्यांनी तर ग्रामीण भागातील न्यायालयाचे कामकाज 50 टक्के राहणार सुरू..
मुंबई उच्च न्यायालयाच्या जिल्हा आणि तालुका न्यायालयांसाठी नव्या रूपरेषा..
शहरातील जिल्हा न्यायालय आणि इतर प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयात न्यायिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य..
सकाळी साडेदहा ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळ..
न्यायिक कामकाज सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश
-
सोलापूर शहरात उद्यापासून लग्न सोहळ्यावरील निर्बंध हटणार
सोलापूर– सोलापूर शहरात उद्यापासून लग्न सोहळ्यावरील निर्बंध हटणार
तर हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरू होणार
संसर्गाचा दर 0.75 टक्के वर तर अक्षर बेडचा वापर 30 टक्क्यांच्या आत आल्याने शहराचा समावेश पकडून शिथिलकरणाच्या पहिल्या टप्प्यात
त्यानुसार शहरात सर्व काही नियमित सुरू राहील
सोमवारपासून शाळा, महाविद्यालये, प्रार्थनास्थळे वगळता सर्व सुरळीत होणार
-
सांगली जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरात समावेश, कोरोना पॉझिटिव्हीटी रेट घसरला
सांगली जिल्ह्यात कोरोना पोजीटीव्हीटी दर कमी
सांगली जिल्हाचा तिसऱ्या स्तरात समावेश
सोमवार पासून बाजारपेठ सुरू अत्यावश्यक सेवेत नसलेली सर्व दुकाने होणार सुरू
त्यामुळे व्यापारी वर्गात फिलगुड वातावरण आहे
मात्र तब्बल 70 दिवसाच्या टाळेबंदी ने झालेले नुकसान भरून कसे निघणार याची चिंता कायम
शासनाने व्यापारी वर्गाला वीजबिल भरण्यासाठी 6 महिने मुदत वाढ देयावी
मनपाने ही मदत करावी अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे
-
बुलडाणा जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता
बुलडाणा
जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता,
कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस होतेय कमी,
सध्या जिल्हा प्रथम श्रेणीत, मागील 24 तासांत फक्त 45 कोरोना रुग्ण आढळले,
तर जिल्ह्यात 367 रुग्णावर उपचार सुरु,
आजपर्यंत जिल्ह्यात 85923 कोरोनाबधित रुग्ण आढळले असून 84912 रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज
आजपर्यंत 644 कोरोनाबधित रुग्णांचा मृत्यू झालाय,
-
नागपुरात कोरोना मृत्यूच्या संख्येत घट, नागरिकांना मोठा दिलासा
नागपूर
नागपुरात कोरोना मृत्यू पासून मोठा दिलासा
गेल्या 24 तासात शहरात 1 तर ग्रामीण भागात 2 मृत्यू ची नोंद तर 3 जिल्ह्या बाहेरील मृत्यू
जिल्ह्यात आता पर्यंत 9001 मृत्यू
30 मे ते 5 जून या आठवड्यात 1667 रुग्ण आणि 70 मृत्यू झाले होते
या आठवड्यात 6 जून ते 12 जून दरम्यान 747 रुग्ण तर 52 मृत्यू ची नोंद
नागपूर जिल्ह्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.15 टक्के वर आला
तर जिल्ह्यात सक्रिय रुग्ण संख्या 2062 आहे
नागपूर ला दिलासा मात्र नियम पाळण्याचे आवाहन
-
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या कोल्हापुरात, कोरोना स्थितीचा आढावा घेणार
कोल्हापूर
रुग्ण संख्या कमी होत नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या कोल्हापुरात
कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा
आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित राहणार
सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार बैठक
राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येत असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र अजूनही परिस्थिती जैसे थे
-
नागपूर जिल्हयातील निर्बंध कायम, काही अंशी शिथिलता
नागपूर –
नागपूर जिल्हयातील निर्बंध कायम ; काही बाबी ना शिथिलता
जिल्हा पहिल्या श्रेणीत कायम नागरिकांनी गर्दी करू नये जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच आवाहन
राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हयातील पॉझीटिव्हीटी रेट,ऑक्सिजन बेडची उपलब्धता व दैनंदिन रूग्णांची परिस्थिती लक्षात घेता सुधारीत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
जिल्हा अद्यापही पहिल्या श्रेणीमध्ये समाविष्ट असला तरी जुने निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी कायम ठेवले आहे.
कोरोना अद्याप संपला नसून नागरिकांनी रस्त्यांवर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
तथापि ,आजपासून काही निर्बंध शिथील केले आहेत. यामध्ये शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात लागू असलेल्या बाबींना 14 जूनपासून सकाळी 7 वाजेपासून ते पुढील आदेशापर्यत मुभा देण्यात येत आहे.
यामध्ये आधार कार्ड सेंटर, सायंकाळी 5 पर्यत, टायपिंग इन्स्टिटयुट,कम्युटर इन्स्टिटयुट आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कौशल्य विकास इन्स्टिटयुट(एकावेळी 20 विदयार्थी किंवा क्षमतेपेक्षा 50 टक्कयापेक्षा कमी उपस्थितीत देता येणार प्रशिक्षण)
शॉपिग मॉलमधील रेस्टाँरंट आणि बार 50 टक्के क्षमतेने रात्री 10 पर्यत मुभा,
मॉलमधील बार मात्र सायंकाळी पाचपर्यतच सुरू राहतील.
इनडोअर गेमलाही सायंकाळी पाच वाजेपर्यत परवानगी राहील.
हे आदेश सोमवार 14 जून सकाळी 7 वाजतापासून तर 21 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यत लागू राहतील.
-
बीडमध्ये रुग्णसंख्येत वाढ; निर्बंध कायम
बीड : बीड जिल्ह्य़ात शनिवारी रुग्णसंख्येत शुक्रवारच्या तुलनेत ५० ने वाढ
करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण ५.२२ टक्कय़ांवर
जिल्ह्यतील निर्बंध सोमवारनंतरही कायम राहणार
जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांचे स्पष्टीकरण
-
नाशिक जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढताच, दररोज 350 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण
नाशिक जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढताच
सलग 12 दिवस लॉकडाऊन आणि निर्बंध कायम ठेवूनही रुग्णसंख्या वाढतीच
नाशिक जिल्ह्यात दररोज ३५० ते ४०० च्या दरम्यान नवीन रुग्ण
उपचाराधिन रुग्णांची संख्या पाच हजारच्या जवळपास आहे.
-
म्युकरमायकोसिसच्या 30 टक्के रुग्णांवर उपचार अशक्य, इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध नाही
मुंबईत म्युकरमायकोसिसचे ६३८ रुग्ण
यातील १३० हून अधिक रुग्णांवर केईएममध्ये उपचार
म्युकरमायकोसिस या बुरशीच्या संसर्गाचा वेग अधिक
वेळेवर निदान न झाल्याने सुमारे ३० टक्के रुग्णांवर कोणतेही उपचार होऊ शकत नसल्याचे केईएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या निदर्शन
अॅम्पोटेरेसिन बी इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध नाही
-
पश्चिम विदर्भात लसीकरणाचा वेग मंदावला, लसीकरणात महिला मागे
येत्या आठवडय़ात कोरोना लसीकरण मोहिमेला पाच वर्ष पूर्ण
पश्चिम विदर्भात लसीकरणाचा वेग मंदावला
लसीकरणातील लिंग गुणोत्तर प्रमाण लक्षात घेता महिला पुरुषांपेक्षा मागेच आहेत.
Published On - Jun 13,2021 6:21 AM