Maharashtra Coronavirus LIVE Update : सांगली जिल्ह्यात दिवसभरात 901 नवे कोरोना रुग्ण, 20 रुग्णांचा मृत्यू

| Updated on: Jun 16, 2021 | 12:27 AM

आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : सांगली जिल्ह्यात दिवसभरात 901 नवे कोरोना रुग्ण, 20 रुग्णांचा मृत्यू
CORONA

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Jun 2021 10:56 PM (IST)

    सांगलीत आटपाडी तालुक्यातील करगणीच्या सरपंचाला लाच घेताना अटक

    सांगली : आटपाडी तालुक्यातील करगणीच्या सरपंचाला लाच घेताना अटक ४० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

  • 15 Jun 2021 10:20 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात दिवसभरात 901 नवे कोरोना रुग्ण, 20 रुग्णांचा मृत्यू

    सांगली कोरोना अपडेट

    जिल्ह्यात आज दिवसभरात 901 नवे कोरोना रुग्ण

    म्युकरमायकोसिस – एकूण रुग्ण 251 , आज आढळलेले रुग्ण 4

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 20 रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यातील कोरोनामुळे एकूण 3777 जणांचा मृत्यू वर

    सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 9032 वर

    तर उपचार घेणारे 889 जण आज कोरोनामुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 119366 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 132175 वर

  • 15 Jun 2021 08:19 PM (IST)

    भिंवडीमध्ये 75 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    भिवंडी : पालिका क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असताना ग्रामीण तालुक्यात पुन्हा रुग्णसंख्येत वाढ

    14 जून – 61 रुग्ण, मृत्यू – 1

    15 जून – 75 रुग्ण, मृत्यू – 4

    ग्रामीण भागात रुग्ण वाढत असल्यामुळे चिंता वाढली

  • 15 Jun 2021 07:40 PM (IST)

    दि. बा. पाटलांच्या स्मृतिदिनी 24 जूनला सिडकोला घेराव, आंदोलकांचा इशारा

    पनवेल :

    दिबा पाटलांच्या स्मृतिदिनी 24 जूनला सिडकोला घेराव

    आंदोलनात किमान एक लाखाचा घेराव घालणार

    सिडकोला घेराव आंदोलनाची जय्यत तयारी

    चांगले करता येत नसेल तर वाईट करू नका

    महाविकास आघाडीच्या नेत्यांना सल्ला वजा दिला इशारा

    आज पनेवलमध्ये झालेल्या बैठकीतून केले स्पष्ट

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने घेतली बैठक

    बैठकीला दशरथ पाटील, रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, संजीव नाईक, महेश बालदी, दशरथ भगत यांच्यासह असंख्य नेते उपस्थित

    विमानतळाला दि बा पाटील नाव देण्यासाठी जोरदार लढा सुरू

    यामध्ये भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, स्थानिक, कृती समिती, संस्था संघटना, विविध राजकीय पक्षाचे गाव ते शहरातील किमान ०१ लाख जणांचा समावेश असणार

  • 15 Jun 2021 07:26 PM (IST)

    नागपुरात आज फक्त 46 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    नागपूर कोरोना अपडेट

    नागपुरात आज फक्त 46 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    281 जणांनी केली कोरोनावर मात

    तर 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    एकूण रुग्णसंख्या – 476491

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 466949

    एकूण मृत्यूसंख्या 9010

  • 15 Jun 2021 07:25 PM (IST)

    नाशिकमध्ये दिवसभरात 155 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    नाशिक कोरोना अपडेट

    आज रोजी पूर्णपणे बरे झालेले रुग्ण- 155

    आज रोजी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झालेली वाढ – 155

    नाशिक मनपा- 91 नवे रुग्ण

    नाशिक ग्रामीण- 53 नवे रुग्ण

    मालेगाव मनपा- 04 नवे रुग्ण

    जिल्हा बाह्य- 07 नवे रुग्ण

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 6865

  • 15 Jun 2021 05:50 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 246 कोरोना रुग्णांची वाढ, 351 रुग्णांना डिस्चार्ज  

    पुणे कोरोना अपडेट

    – दिवसभरात 246 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

    – दिवसभरात 351 रुग्णांना डिस्चार्ज

    – पुण्यात करोनाबाधित 21 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 11

    – 483 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू

    – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 474545

    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या- 2773

    – एकूण मृत्यू -8492

    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 463280.

    – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 4748

  • 15 Jun 2021 05:42 PM (IST)

    अकोल्यात आज दिवसभरात 29 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

    अकोला कोरोना अपडेट

    अकोल्यात आज दिवसभरात 29 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला आहे

    आतापर्यंत 1116 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 54874 जणांनी कोरोनावर मात केली आहे

    तर सध्या 1233 रुग्ण उपचार घेत आहेत

    दिवसभरात 118 जण कोरोनामुक्त झाले

  • 15 Jun 2021 05:41 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात आढळले 27 नवे कोरोना रुग्ण 

    वाशिम कोरोना अपडेट

    जिल्ह्यात आज आढळले 27 नवे कोरोना रुग्ण

    तर आज 86 जणांना देण्यात आला डिस्चार्ज

    तसेच 01 रुग्णाचा झाला मृत्यू

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 41100

    सध्या सक्रिय रुग्ण रुग्ण – 539

    आतापर्यंत डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 39958

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 602

  • 15 Jun 2021 02:57 PM (IST)

    अमरावती : अखेर रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्या मुख्य आरोपीचं आत्मसमर्पण

    अमरावती : अखेर रेमडेसिवीरचा काळा बाजार प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. पवन मालुसरे याचे न्यायालयात आत्मसमर्पण. 12 मे रोजी आर्थिक गुन्हे शाखेने रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड केला होता. जामीन रद्द झाल्यावर डॉ मालुसरे एक महिन्यापासून फरार होता. अन्य ५ आरोपी १२ मे पासून तुरुंगाची हवा खात आहेत .

  • 15 Jun 2021 01:00 PM (IST)

    शिर्डीत सहा महिन्याच्या मुलीचा म्युकर मायकोसिसने मृत्यू

    शिर्डी –

    शिर्डीत सहा महिन्याच्या मुलीचा मृत्यू, म्युकर मायकोसीसने घेतला बळी

    सहा महिन्याच्या मुलीला म्युकर मायकोसिस

    लोणी येथील प्रवरा हाॅस्पिटलमध्ये सुरू होते उपचार

    अनेक प्रयत्नांनरतही डाॅक्टरांना अपयश

    सहा महिन्याच्या मुलीच्या मृत्यूची पहिलीच घटना

    शिर्डीतील सहा महिन्याच्या मुलीचा मृत्यू

    म्युकर मायकोसिसने मृत्यू झाल्याची प्रवरा हाॅस्पिटलचे डिन राजवीर भालवार यांची माहिती

  • 15 Jun 2021 12:58 PM (IST)

    पंढरपुरात धनगर आरक्षण कृती समितीची बैठक, आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक

    पंढरपूर –

    धनगर आरक्षण कृती समितीची बैठक, आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक

    मुख्यमंत्र्यांच्या आषाढी एकादशीच्या दिवशी होणार्या शासकीय महापुजेला धनगर समाज करणार विरोध

    मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवून श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला यावे

    अन्यथा धनगर समाज मुख्यमंत्र्यांना विरोध करणार

  • 15 Jun 2021 11:25 AM (IST)

    पालघर जिल्ह्यात निर्बंध उठवल्यानंतर बाजरपेठेत खरेदी साठी नागरिकांची गर्दी

    पालघर

    पालघर जिल्ह्यात निर्बंध उठवल्या नंतर आदिवासी ग्रामीण भागात असलेल्या तलासरी, डहाणू, कासा ,चारोटी परिसरात बाजरपेठेत खरेदी साठी नागरिकांची गर्दी होत आहे.

    पावसाने तीन दिवसांपासून उसंत घेतल्याने शेती कामाना वेग आला असून शेती उपयोगी, घर दुरुस्ती व जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारपेठेत येऊ लागले आहेत.

    अद्याप ही ग्रामीण भागात हवे तसे लशी करणं झाले नसल्याने तसेच बाजारपेठेत ही दुकानदारांकडून कसली ही खबरदारी  घेतली जात नसल्याने कोरोना पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

  • 15 Jun 2021 10:13 AM (IST)

    लसीकरणाचा शहापूर पॅटर्न, आज होणार 25 आरोग्य उपकेंद्रावर लसीकरण

    शहापूर तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या अटोक्यात येत आसून सध्या मितीस रुग्ण संख्या घटत असल्यामुळे तालुक्यात दिलासादायक वातवरण आहे

    परंतु ओसरलेल्या दुसऱ्या लाटेत लसीकरणाचा वेग वाढवून जास्तीत नागरीकांना सुरक्षीत करुन संक्रमन आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशिल आहे

    त्यासाठी जि.प. ठाणे आणि आरोग्य विभाग शहापूर या दोन्ही मार्फत आज 15 जून रोजी शहापूर तालुक्यातील 25 आरोग्य उपकेंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे

  • 15 Jun 2021 10:12 AM (IST)

    बिबट्याचे दर्शन झाल्याने सांगलीतील कवठेमहांकाळ तालुक्यात भीतीचे वातावरण

    सांगली –

    बिबट्याचे दर्शन झाले ने कवठेमहांकाळ तालुक्यातील नागरिकांत भीतीचे वातावरण

    3 दिवसा पूर्वी बिबट्याचे मिरज तालुक्यातील दडोबा येथे झाले दर्शन

    पुढे नागरिक मागे लागले मुळे बिबट्या आपले पिल्ला सह कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड परिसरात शिरला

    कवठेमहांकाळ तालुक्यात झाडे झुडपे खूप आहेत दोन मोठे तलाव आहेत

    त्यामुळे बिबट्या पिलासह कुठेतरी लपून बसला असणे ची दाट शक्यता

    वन विभागाने पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरूच ठेवलेत

    मात्र बिबटया सापडे पर्येंत कवठेमहांकाळ तालुक्यातील नागरिकांनी आपले लहान मुलांना बाहेर एकटे सोडू नये आणि स्वतःबाहेर एकटे पडू नये

    असे आवाहन तहशीलदार बी जे गोरे आणि वन विभाग प्रमुख विजय माने यांनी नागरिकांना केले आहे

  • 15 Jun 2021 09:39 AM (IST)

    बुलडाणा जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

    बुलडाणा

    जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट घसरला आणि रुग्णसंख्याही घटली, दरम्यान सोमवारपासून निर्बंध उठवले असल्याने बाजारात चैतन्य पसरले, जिल्ह्यात सध्या 257 रुग्णावर उपचार सुरू असून 86 हजार 08 कोरोनाबधित रुग्णापैकी 85 हजार 102 रुग्णांनी कोरोनवर मात केल्याने सुटी देण्यात आलीय, तर आतापर्यंत 649 कोरोना रुग्णचा मृत्यू झालाय

  • 15 Jun 2021 09:32 AM (IST)

    देशात गेल्या 24 तासात 60 हजार 471 नवे रुग्ण

    देशात गेल्या 24 तासात 60 हजार 471 नवे रुग्ण

    देशात गेल्या 24 तासात 1 लाख 17 हजार 525 रुग्ण कोरोना मुक्त

    देशात गेल्या 24 तासात 2 हजार 726 रुग्णांचा मृत्यु

  • 15 Jun 2021 09:04 AM (IST)

    नाशकात कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी विध्यार्थ्यांना मिळणार पुस्तक

    नागपूर –

    कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी विध्यार्थ्यांना मिळणार पुस्तक

    जिल्हा परिषद शाळेतील विधर्थ्यांना मिळणार पुस्तक

    जिल्हा परिषद ने बालभारती कडे केली 8 लाख 2 हजार पुस्तकांची मागणी

    मात्र केव्हा पर्यन्त मिळणार हे अजून निश्चित नाही

  • 15 Jun 2021 09:03 AM (IST)

    नाशकात कोरोनानंतर चिकनगुनिया आणि डेंग्यूचा फैलाव

    नाशिक – कोरोना नंतर चिकनगुनिया आणि डेंग्यूचा फैलाव

    नाशिक शहरात चिकनगुनिया चे 36 रुग्ण

    तर डेंग्यूचे 65 रुग्ण आढळल्याने खळबळ

    अस्वच्छता आणि दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांना बजावल्या मनपाने नोटीस

    पाणी साचून डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी मनपाची मोहीम सुरू

  • 15 Jun 2021 08:13 AM (IST)

    नाशकात घरपट्टीच्या बड्या थकबाकीदारांची मालमत्ता होणार जप्त

    नाशिक – घरपट्टीच्या बड्या थकबाकीदारांची मालमत्ता होणार जप्त

    1 जुलै पासून जप्तीची कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश

    कोरोना काळात मनपाला 300 कोटींचा मोठा फटका

    आतालर्यंत फक्त 30 कोटींची थकबाकी वसूल

    बड्या थकबाकीदारांची यादी तयार

  • 15 Jun 2021 08:12 AM (IST)

    उस्मानाबाद शहरात 15 जून ते 19 जून या 5 दिवस दरम्यान 18 ठिकाणी राबविली जाणार विशेष लसीकरण मोहीम

    उस्मानाबाद – शहरात 15 जून ते 19 जून या 5 दिवस दरम्यान 18 ठिकाणी राबविली जाणार विशेष लसीकरण मोहीम , 45 वर्ष वरील नागरिकांना दिली जाणार लस

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत घट, पॉझिटिव्हीटी दर 4 टक्क्यांवर आला असून जिल्ह्यात 690 रुग्णावर उपचार सुरू

    शेतकऱयांचा माल, किराणा दुकान यात धान्याची चोरी करणारया 9 चोरट्यांना उस्मानाबाद पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवत केली अटक , कंटेनर पलटी झाल्यानंतर माल चोरणाऱ्या 4 जणांना अटक

  • 15 Jun 2021 07:56 AM (IST)

    नाशकातील पर्यटन स्थळांवर गर्दी करणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांची थेट कारवाई

    नाशिक – पर्यटन स्थळांवर गर्दी करणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांची थेट कारवाई

    हरिहर गड, कश्यपी धरणावर गर्दी करणाऱ्यांवर पोलिसांनी दाखल केला गुन्हा

    त्रंबकेश्वर पोलिसांकडून तब्बल 50 पर्यटकांवर गुन्हा दाखल

    कोरोना काळात गर्दी करणार्यांना ग्रामीण पोलीस अधीक्षकांचा दणका

  • 15 Jun 2021 07:43 AM (IST)

    कोरोना पाठोपाठ आता कोल्हापूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर

    कोल्हापूर :

    कोरोना पाठोपाठ आता जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर

    काल दिवसभरात आढळले नवे आठ रुग्ण

    जिल्ह्यात सध्या 133 रुग्णांवर सुरू आहेत उपचार

    तर आतापर्यंत 22 जणांचा झालाय म्युकरमायकोसिस मूळे मृत्यू

    सिपीआर रुग्णालयातील पाच कक्षात उपचाराची सोय

    कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना म्युकरमायकोसिस चा संसर्गही वाढत असताना बेड उपलब्ध करून देताना प्रशासनाची दमछाक

  • 15 Jun 2021 07:22 AM (IST)

    वर्षभरानंतर नागपूरात सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद

    नागपूर :

    वर्षभरानंतर नागपूरात सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद,

    शहरात 18 तर ग्रामीणमध्ये 10 रुग्णांची नोंद,

    मृत्युसंख्याही घटली, शहरात 1 तर ग्रामीणमध्ये शून्य मृत्यु,

    जिल्ह्यात पॉझिटिव्हीचा दर 0.43 टक्क्यांवर,

    जिल्ह्यात 1770 सक्रिय रुग्ण,

    रुग्ण बरे होण्याचा दर 97.74 वर

  • 15 Jun 2021 06:38 AM (IST)

    दिल्लीत आजपासून बालकांवर लस चाचण्या

    नवी दिल्ली : कोव्हॅक्सिन या स्वदेशी लशीच्या ६ ते १२ वयोगटातील मुलांवरील चाचण्या येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत मंगळवारपासून सुरू होत आहेत. त्यासाठी स्वयंसेवक पात्र मुलांची निवड आधीच करण्यात आली होती.

  • 15 Jun 2021 06:38 AM (IST)

    करोनाकाळातील मरगळ काही प्रमाणात दूर

    नागपूर : टाळेबंदीमुळे शहरातील इलेक्ट्रॉनिक बाजारपेठा बंद असल्याने व्यवसायिकांना जवळपास शंभर कोटींवर फटका बसला. मोठे सण हातातून गेल्याने इलेक्ट्रॉनिक व्यवसायिक मोठय़ा आíथक अडचणीत सापडले होते. मात्र आता टाळेबंदीतून शिथिलता मिळाल्याने नागपूरकरांनी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठय़ा प्रमाणात खरेदी केल्याने बाजापेठात परत चतन्य परतले आहे.

  • 15 Jun 2021 06:37 AM (IST)

    लसीकरणाची राजकीय जाहिरात केल्यास खबरदार; केंद्राची मान्यता रद्द होणार, पालिका आयुक्तांचा इशारा

    मुंबई: सरकारी व महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर बॅनरबाजी करून श्रेय लाटणार्‍या लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांना पालिका प्रशासन चाप लावणार आहे. राजकीय फायद्यासाठी अशी अनुचित जाहिरात एखाद्या केंद्रावर आढळून आल्यास त्या केंद्राला कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांची मान्यता तात्काळ रद्द करण्यात येईल, असा इशारा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सुधारित परिपत्रकाद्वारे दिला आहे

Published On - Jun 15,2021 6:30 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.