Corona Cases and Lockdown News LIVE : नागपुरात आज 82 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, नव्या 7485 रुग्णांची नोंद

| Updated on: Apr 23, 2021 | 11:55 PM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Corona Cases and Lockdown News LIVE : नागपुरात आज 82 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, नव्या 7485 रुग्णांची नोंद
MAHARASHTRA Corona

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Apr 2021 11:55 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 719 नवे रुग्ण, 16 जणांचा मृत्यू, 881 जणांना डिस्चार्ज

    उस्मानाबाद कोरोना अपडेट

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 719 नवे रुग्ण

    16 जणांचा मृत्यू, 881 जणांना डिस्चार्ज

    उस्मानाबाद तालुक 277 रुग्ण, तुळजापूर 82 रुग्ण, उमरगा 93 रुग्ण, लोहारा 46रुग्ण, कळंब 58रुग्ण, वाशी 55रुग्ण, भूम 41 रुग्ण, परंडा 67 रुग्ण

    उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 6185 सक्रिय  रुग्ण

    एकूण रुग्ण- 32 हजार 966

    आतापर्यंत 25 हजार 955 रुग्ण बरे

    रुग्ण बरे होण्याचा दर 80.22 टक्के

    आतापर्यंत 816 रुग्णांचा मृत्यू

    मृत्यूदर 2.28

  • 23 Apr 2021 08:10 PM (IST)

    वसई- विरामध्ये 24 तासात 1047 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

    वसई-विरार कोरोना अपडेट

    वसई विरारमध्ये  नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी वाढ

    मागच्या 24 तासात 1047 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

    आज दिवसभरात 16 जणांचा मृत्यू

    तसेच 509 जणांची आज कोरोनावर मात

    वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 48481 वर

    कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 37100 वर

    आतापर्यंत एकूण 1015 जणांचा मृत्यू

    कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 10366 वर

  • 23 Apr 2021 08:06 PM (IST)

    वाशिममध्ये दिवसभरात 718 नवे रुग्ण, आज 9 जणांचा मृत्यू 

    वाशिम कोरोना रिपोर्ट

    जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक

    जिल्ह्यात आज 9 रुग्णांचा झाला

    एकाच दिवशी आढळले नवे 718 नवे रुग्ण

    दिवसभरात 542 जणांना देण्यात आला डिस्चार्ज

    जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 23 दिवसात एकूण 67 रुग्णांचा झाला मृत्यू

    मागील 22 दिवसात आढळले एकूण 8401 नवे कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 24476

    सध्या सक्रिय रुग्ण – 4212

    आतापर्यंत एकूण कोरोनामुक्त – 20009

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 254

  • 23 Apr 2021 07:03 PM (IST)

    जालन्यात 24 तासात कोरोनाचे 809 नवे कोरोना रुग्ण, 16 रुग्णांचा मृत्यू 

    जालन्यात 24 तासात कोरोनाचे 809 नवे रुग्ण

    24 तासात 16 कोरोना रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 41 हजार 10 वर

    आतापर्यंत 33 हजार 753 रुग्णांना डिस्चार्ज

    सध्या 6 हजार 584 रुग्णांवर उपचार सुरु

    आतापर्यंत जिल्ह्यात 673 जणांचा कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू

  • 23 Apr 2021 07:01 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासांत 1511 नव्या रुग्णांची नोंद

    चंद्रपूर: गेल्या 24 तासात 1511 नव्या रुग्णांची नोंद

    24 तासांत 34 जणांचा मृत्यू

    एकूण कोरोनारुग्ण : 49494

    एकूण कोरोनामुक्त : 34579

    सक्रिय रुग्ण : 14182

    एकूण मृत्यू : 733

    एकूण नमूने तपासणी : 349036

  • 23 Apr 2021 07:00 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 4465 नव्या रुग्णांची वाढ, 5634 रुग्णांना डिस्चार्ज 

    पुणे कोरोना रुग्ण

    – दिवसभरात 4465 नव्या रुग्णांची वाढ

    – दिवसभरात  5634 रुग्णांना डिस्चार्ज

    – पुण्यात करोनाबाधित80 रुग्णांचा मृत्यू. 22 रूग्ण पुण्याबाहेरील

    – 1328 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू

    – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3,91495

    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 50322

    – एकूण मृत्यू -6388 वर

    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज झालेले-  3,34,782

  • 23 Apr 2021 06:57 PM (IST)

    नागपुरात आज 82 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, नव्या 7485 रुग्णांची नोंद

    नागपूर कोरोना अपडेट

    नागपुरात आज 82 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

    7485 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    तर 6531 रुग्णांनी केली कोरोनावर मात

    एकूण रुग्णसंख्या – 358418

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 278302

    एकूण मृत्यूसंख्या – 6767

  • 23 Apr 2021 06:56 PM (IST)

     पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात कोरोना संसर्ग वाढला, दिवसभरात 375 नवे रुग्ण

    पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात कोरोना संसर्ग वाढला

    1 एप्रिल रोजी 60 रूग्ण, 23 एप्रिल रोजी 375 रुग्ण

    मंगळवेढ्यात 66 नवे रुग्ण

    पंढरपुरात 309 नवे रुग्ण

    पंढरपूर  आतापर्यंत दोघांचा मृत्यू

    मंगळवेढ्यात आतापर्यंत दोघांचा मृत्यू

    सध्या 2115 जणांवर उपचार सुरु

  • 23 Apr 2021 06:04 PM (IST)

    ऑक्सिजन एक्स्प्रेस काही वेळात नागपुरात दाखल होणार

    नागपूर : विशाखापट्टणमहून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल

    काही वेळात नागपुरात दाखल होणार

    सात पैकी तीन ऑक्सिजन टँकर नागपूरमध्ये उतरविले जाणार

    त्यानंतर ही एक्स्प्रेस नाशिककडे निघणार

    नागपूर आणि विदर्भातील ऑक्सिजनचा तुटवडा कमी होण्यास होणार मदत

    महाराष्ट्रातील ही पहिली ऑक्सिजन ट्रेन असेल

  • 23 Apr 2021 06:03 PM (IST)

    साताऱ्यात पोहोचला ऑक्सिजनचा एक टँकर, हक्क सांगण्यासाठी दोन जिलहाधिकारी आमनेसामने

    सातारा जिल्हयात आलेला ऑक्सिजनचा टँकर नेमका कोणत्या जिल्हयासाठी ?

    सातारा पोलिसांच्या बंदोबस्तात मुंबईहून आणलेल्या ऑक्सिजनच्या टँकरवर  सातारा आणि कोल्हापुर जिल्हाधिकाऱ्यांनी दोखवला हक्क

    दोन्ही जिल्हयाच्या जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा

    सातारा जिल्ह्यातील वाढे फाटा चौकात टँकर पोलिसांनी थांबविला

  • 23 Apr 2021 05:58 PM (IST)

    आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर देणार

    नागपूर : आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर देणार

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्याशी केली होती बातचीत

  • 23 Apr 2021 05:32 PM (IST)

    ऑक्सिजन घेऊन निघालेली ‘ऑक्सिजन’ एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल

    गोंदिया : विशाखपट्टणमवरुन ऑक्सिजन घेऊन निघालेली रेल्वे महाराष्ट्रात दाखल

    या रेल्वेत ऑक्सिजनचे 60 कंटेनर आहेत.

    ही रेल्वेतून आणला जाणारा ऑक्सिजन नागपूर, नाशिक, मुंबई याठिकाणी ऑक्सिजन दिला करणार आहे

  • 23 Apr 2021 03:47 PM (IST)

    नाशिकमध्ये अनेक खासगी हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपला

    नाशिक – अनेक खासगी हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपले

    नवीन रुग्णांना दाखल करून घेण्यास खासगी रुग्णालयांचा नकार

    आहेत त्या रुग्णांनादेखील दुसरीकडे हलवण्याची तयारी

    नाशिकमध्ये ऑक्सिजन परिस्थिती बिकट

  • 23 Apr 2021 02:01 PM (IST)

    मुंबईत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची परवानगी असतानाही रस्त्यावर वाहनांची वर्दळ

    – मुंबईत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची परवानगी असतानाही रस्त्यावर वाहनांची वर्दळ

    – लॉकडाऊन असल्याची कुठलीच चिन्ह रस्त्यावर नाहीत

    – ठाण्याच्या दिशेनं मुंबईत दाखल होणाऱ्या गाड्यांमध्ये वाढ

    – मुंबईच्या दिशेनं ठाण्याकडे जाणार्या वाहतूकीचा वेग मात्र मंदावला

    – केवळ ४० ते ५० टक्के वाहनं कमी

    – बाईकस्वार, मोठ्या गाड्या, खाजगी गाड्यांचीही वाहतूक जोमानं सुरु

    – पोलिसांकडून बॅरिकेटींग आणि तपासणीच होत नसल्याने रस्तायवर वाहनांची ये जा सुरु

  • 23 Apr 2021 01:14 PM (IST)

    राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आवाहन

    – राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आवाहन

    – वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून साखर कारखान्यांना पत्र

    – राज्यातील सहकारी आणि खाजगी 190 कारखान्यांना पत्र पाठवण्यात आले

    – शिवाय जे कारखाने बंद आहेत त्यांनी ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयाना पुरवावे, असंही आवाहन

    – शरद पवारांच्या सूचनेनुसार पत्र पाठवण्यात आलेत

  • 23 Apr 2021 12:59 PM (IST)

    विशाखापट्टणम येथून राज्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस निघाली

    लासलगाव

    – विशाखापट्टणम येथून राज्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस निघाली

    – कोरोना बाधित ऑक्सिजनवरील रुग्णांना मिळणार मोठा दिलासा

    – ऑक्सिजन एक्सप्रेसवरील टँकर उतरविण्यासाठी लासलगाव रेल्वे स्थानकात रॅम्पच्या कामाची जोरदार तयारी सुरू

    – ऑक्सिजन एक्स्प्रेसवरील टँकर उतरविण्याबाबत माहिती देण्यासाठी रेल्वेकडून कमालीची गुप्तता पाळली जाते

  • 23 Apr 2021 12:38 PM (IST)

    साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी, शरद पवारांचं सर्व कारखान्यांना पत्र

    – राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आवाहन,

    – वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून साखर कारखान्यांना पत्र,

    – राज्यातील सहकारी आणि खाजगी 190 कारखान्यांना पत्र पाठवण्यात आले,

    – शिवाय जे कारखाने बंद आहेत त्यांनी ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयाना पुरवावे, असही आवाहन,

    – शरद पवारांच्या सूचनेनुसार पत्र पाठवण्यात आलेत

  • 23 Apr 2021 12:26 PM (IST)

    भुसावळ पाठोपाठ जळगावातही रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार, 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    जळगाव –

    भुसावळ पाठोपाठ जळगावातही रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची बाब समोर आली

    जळगावात पोलिसांची मोठी कारवाई,11 जणांना घेतले ताब्यात

    2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

  • 23 Apr 2021 12:22 PM (IST)

    मुंबईतील कुर्ला एसटी स्टॅंडवर पुर्णपणे शुकशुकाट

    – मुंबईतील कुर्ला एसटी स्टॅंडवर पुर्णपणे शुकशुकाट

    – सकाळपासून एसटी स्टॅंड रिकामा

    – केवळ ५० टक्के क्षमतेसह प्रवस सुरू राहणार

    – जिल्हांतर्गत किंवा आंतरजिल्हा सेवा देणाऱ्या बस प्रवासासाठी एसटी बस अधिकाऱ्यांना विशेष सुचना

    – थांब्यावर उतरल्यावर प्रवाशांच्या हातावर १४ दिवस होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाणार

    – प्रवाशांची कोरोना चाचणी झाल्यास चाचणीचा खर्च संबंधित प्रवाशाकडूनच घेतला जाईल

    – तसेच, विशिष्ठ ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांना हातावर शिक्का मारला जाणारेय

  • 23 Apr 2021 11:30 AM (IST)

    कोल्हापुरात लॉकडाऊन नियमांना ठेंगा, करवीर तालुक्यातील येवती गावात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

    कोल्हापूर

    कोल्हापुरात लॉकडाऊन नियमांना ठेंगा

    करवीर तालुक्यातील येवती गावात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

    गावात धार्मिक कार्यक्रमात ग्रामस्थाची मोठी गर्दी

    मास्क न वापरता अनेक ग्रामस्थ धार्मिक कार्यक्रमात

    नाक्यावर उभं असणाऱ्या पोलिसांची बघ्याची भूमिका

    पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येवू नये त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमाला बंदी असताना गावात जोरदार कार्यक्रमाच आयोजन.

  • 23 Apr 2021 11:26 AM (IST)

    मोदींच्या तीन महत्त्वाच्या बैठका, ऑक्सिजन आणि रेमडेसीव्हीरच्या तुटवड्याबाबत या बैठकीत चर्चा

    मोदींच्या तीन महत्त्वाच्या बैठका

    या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपेही उपस्थित

    ऑक्सिजन आणि रेमडेसीव्हीरच्या तुटवड्याबाबत या बैठकीत चर्चा

    ऑक्सिजन बनवणाऱ्या कंपनीसह बैठक

  • 23 Apr 2021 09:25 AM (IST)

    लाॅकडाऊनची रत्नागिरी जिल्ह्यात कडक अंमलबजावणी

    रत्नागिरी –

    लाॅकडाऊनची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी

    ड्रोनच्या माध्यमातून रत्नागिरीतल्या मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट

    शहरातील एन्ट्री पाॅईंटचे रस्ते माणसावीना ओस

    शहरात ठिकठिकाणी पोलिस बॅरिकेटिंग

    अनावश्यक फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून होतेय कारवाई

  • 23 Apr 2021 09:24 AM (IST)

    मुंबईच्या कुर्ला रेल्वे स्थानकात आज पहाटेपासून सर्वसामान्यांनी प्रवासाला सुरवात केलीये

    – मुंबईच्या रेल्वेतून सर्वसामान्य मुंबईकरांना प्रवासाची परवानगी नाहीये

    – अत्यावश्यक सेवेतील केवळ १५ टक्के लोकांनाच ही परवानगी आहे

    – मात्र मुंबईच्या कुर्ला रेल्वे स्थानकात आज पहाटेपासून सर्वसामान्यांनी प्रवासाला सुरवात केलीये

    – प्रवाश्याची एकच गर्दी पाहायला मिळतेय त्यामुळे सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा ऊडतोय

    – रेल्वेतून प्रवासाला परवानगी द्यायला हवी होती अशी प्रतिक्रिया मुंबईकरांनी दिलीये,

    – रेल्वेत सर्वसामान्यांची कुठलीच चेकिंग सध्या होत नाहीये, सर्व गेट बहूतेक ठिकाणी खूलेच आहेत, त्यामुळे कोरनाचा प्रसार कसं थांबणार हा मुळ मुद्दा ऐरणीवर

  • 23 Apr 2021 09:19 AM (IST)

    नवे नियम लागून काही तास उलटले तरी अद्याप जिल्ह्यांच्या सीमांवर तपासणी नाके नाहीत

    कोल्हापूर –

    राज्यात जिल्हा बंदीच्या नियमाची कडक अंमलबजावणी

    कोल्हापूर जिल्हा प्रशासनाची मात्र उदासीनता

    नवे नियम लागून काही तास उलटले तरी अद्याप जिल्ह्यांच्या सीमांवर तपासणी नाके नाहीत

    किणी टोल नाक्यावर पोलिसांकडून फक्त चौकशीचा फार्स

    बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची कोणतीही नोंद नाही

    जिल्‍ह्यात रूग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनाच्या उदासीनते बाबत मात्र प्रश्नचिन्ह

  • 23 Apr 2021 08:50 AM (IST)

    नागपूरच्या बस स्थानकावर कडक लॅाकडाऊनचे नियम धाब्यावर

    – नागपूरच्या बस स्थानकावर कडक लॅाकडाऊनचे नियम धाब्यावर

    – सर्व प्रवाशांना मिळते बस मध्ये प्रवास

    – बस स्थानकावर सर्वसामान्य प्रवाशांची गर्दी

    – सरकारी नियमानुसार फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच बसमे प्रवास

    – टीव्ही ९ चा कॅमेरा दिसताच वाहक आणि चालकांची धडपड सुरु

  • 23 Apr 2021 08:37 AM (IST)

    पुण्यातील 50 च्या आतील नागरिकांच्या लसीकरणासाठी 52 लाख लसींची गरज

    पुणे –

    – पुण्यातील 50 च्या आतील नागरिकांच्या लसीकरणासाठी 52 लाख लसींची गरज,

    – पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात मिळून वयाच्या पन्नाशीच्या आतील ५२ लाख १५ हजार ३०९ मतदार आहेत.

    – कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी या मतदार यादीचा आधार घेतल्यास शहर व जिल्ह्याला किमान लसीकरणासाठी किमान ५२ लाख डोस लागणार आहेत,

    – पहिल्या टप्प्यात तरी या लसीकरणासाठी मतदार यादीचा आधार जिल्हा प्रशासन घेणार.

  • 23 Apr 2021 08:36 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील 828 रुग्णालयांना गेल्या दोन दिवसांमध्ये 13 हजार 257 रेमडेसीव्हीरचा पुरवठा

    पुणे –

    – पुणे जिल्ह्यातील 828 रुग्णालयांना गेल्या दोन दिवसांमध्ये 13 हजार 257 रेमडेसीव्हीरचा पुरवठा

    – त्यापैकी बुधवारी सहा हजार ८५७ आणि गुरुवारी सहा ४०० अशा प्रकारे १३ हजार २५७ इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे.

    – जिल्ह्यात शुक्रवारपासून या इंजेक्शनचा उपलब्ध साठा रोजच्या रोज रुग्णालयांपर्यंत पोचविण्यात येत आहे,

    – पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ८२८ रुग्णलयांमधील २१ हजार ७८१ खाटांवर रुग्णांना उपचार देण्यात येत आहे,

    – त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे,

    – या इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी शहरी भागात सहा व ग्रामीण भागात १२ भरारी पथके स्थापन,

    – अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांची माहिती.

  • 23 Apr 2021 08:03 AM (IST)

    दादर भाजी मार्केटमध्ये लोकांची मोठी गर्दी

    दादर भाजी मार्केटमध्ये लोकांची मोठी गर्दी

    सोशल डिस्टनसिंगच पालन होत नसल्याचं उघड

    कोरोनाच प्रसार कसा थांबणार मोठा प्रश्न

    एकच हवालदार कस करणार गर्दीवर नियंत्रण

    मनपा आणि पोलीस प्रशासन लक्ष कधी देणार

  • 23 Apr 2021 07:59 AM (IST)

    कोरोनाविरोधात लढण्यासाठी पंकजा मुंडे ‘बाबांच्या’ दर्शनाला

    कोरोनाविरोधात लढण्यासाठी पंकजा मुंडे ‘बाबांच्या’ दर्शनाला, कोरोनाशी लढण्यात कार्यकर्ते आणि जनतेच्या पाठीशी उभारण्यासाठी बळ द्या बाबा, अशी पंकजा मुंडेची प्रार्थना

  • 23 Apr 2021 07:18 AM (IST)

    नागपुरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट

    – नागपुरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट

    – कोरोना नियंत्रणासाठी नागपूर पोलीसांचा उपक्रम

    – दोन दिवसांत ५०० पेक्षा जास्त जणांची रस्त्यावर कोरोना चाचणी

    – दोन दिवसांच्या चाचणीत रस्त्यावर फिरणारे २५ पेक्षा जास्त जण निघाले पॅाझीटीव्ह

    – पोलीस नाकाबंदीच्या ठिकाणी कोरोना टेस्ट

    – नागपूर महानगरपालिका आणि पोलीसांचा उपक्रम

  • 23 Apr 2021 07:17 AM (IST)

    नाशकात सॅनिटायझर प्राशन करून कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

    नाशिक –

    सॅनिटायझर प्राशन करून कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

    संचित रजा नामंजूर केल्याचा राग आल्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

    कारागृहातील अधिकारी त्रास देत असल्याची सुसाईड नोट केली होती तयार

    बंदी अविनाश जाधव यांच्यावर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

    कारागृह प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू

  • 23 Apr 2021 07:08 AM (IST)

    नागपुरातील दहन घाटावर दोन-तीन दिवस पुरेल इतकाच लाकडाचा साठा

    – नागपुरातील दहन घाटावर दोन-तीन दिवस पुरेल इतकाच लाकडाचा साठा

    – लाकूड उपलब्ध न झाल्यास अंत्यसंस्कारासाठी येणार अडचण

    – नागपूरात कोरोनाबाधीत मृतांची संख्या दुपटीने वाढली

    – नागपूरातील १६ दहन घाटावर लाकडाचा तुटवडा

    – प्रमुख घाटावर दिवसाला ४० ते ५० अंत्यसंस्कार होतात

    – सहा महिन्याचा लाकडांचा साठ दोन महिन्यात संपला

  • 23 Apr 2021 07:01 AM (IST)

    मावळमध्ये कडक लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ

    पुणे

    – कडक लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ

    – खाजगी वाहनाची संख्या तुरळक

    – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील उर्से टोल नाक्यावर पोलिसांकडून वाहनांची कडक तपासणी

  • 23 Apr 2021 07:01 AM (IST)

    नागपुरातील मनपा कोव्हिड सेंटरमधील ॲाक्सिजन सिलिंडरचा कॅाक खराब झाला, तातडीने दुरुस्ती झाल्यामुळे टळला मोठा अनर्थ

    – नागपुरातील मनपा कोव्हिड सेंटरमधील ॲाक्सिजन सिलिंडरचा कॅाक खराब झाला

    – तातडीने दुरुस्ती झाल्यामुळे टळला मोठा अनर्थ

    – आयुष रुग्णालयात झाली असती नाशिकच्या घटनेची पुनरावृती

    – रुग्णालयात ४२ कोरोनाबाधीतांवर सुरु आहे उपचार

    – ॲाक्सीजन सुरळीत मिळत नसल्याने बाब उघड

  • 23 Apr 2021 06:57 AM (IST)

    उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर नागपूरला मिळाले 5899 रेमडेसीव्हीर इंजेक्शन

    – उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर नागपूरला मिळाले 5899 रेमडेसीव्हीर इंजेक्शन

    – जिल्हा प्रशासनाकडून रुग्णालयांना रेमडेसवीरचं वाटप

    – ५८९९ रेमडेसवीर मिळूनंही रुग्णांच्या नातेवाईकांची भटकंती सुरुच

    – नागपूर खंडपीठाने सोमवारी ६७५२ व्हायल्स पुरवठा करण्याचे आदेश दिले होते

    – काल ५८९९ रेमडेसवीर मिळाल्याने मोठा दिलासा

    – अजूनंही रेमडेसवीर इंजेक्शनची मागणी कायम

  • 23 Apr 2021 06:48 AM (IST)

    पुण्यात गेल्या 24 तासांत 4 हजार 851 जण कोरोनामुक्त 

    पुण्यात गेल्या 24 तासांत 4 हजार 851 जण कोरोनामुक्त

    तर 4 हजार 539 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

    पुण्यातील मृतांची संख्या चिंताजनक बनली

    पुण्यात आज दिवसभरात 80 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला

    त्यातील 24 जण पुण्याबाहेरील होते

    पुण्यात सध्या 51 हजार 552 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु

    त्यातील 1 हजार 313 जणांची प्रकृती चिंताजनक

  • 23 Apr 2021 06:46 AM (IST)

    मुंबईत गेल्या 24 तासांत 8 हजार 90 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले

    मुंबईत गेल्या 3 दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा कोरोनातूर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त

    मुंबईत 8 हजार 90 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले

    7 हजार 410 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

    बरे होणाऱ्या रुग्णांचा मुंबईतील दर 84 टक्के

    मुंबईत सध्या 83 हजार 953 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु

    मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 50 दिवसांवर पोहोचलाय

    मुंबईतील मृतांची संख्या मात्र चिंताजनक बनत चालली आहे

    मुंबईत आज दिवसभरात 75 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय

  • 23 Apr 2021 06:43 AM (IST)

    गेल्या 24 तासांत राज्यात 67 हजार 13 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली

    गेल्या 24 तासांत राज्यात 67 हजार 13 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली

    तर 62 हजार 298 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत

    गेल्या 24 तासांत 568 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे

Published On - Apr 23,2021 11:55 PM

Follow us
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.