Corona Cases and Lockdown News LIVE : नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 4099 नव्या कोरोना रुग्णांची वाढ, मृतांचा आकडा 2283 वर

| Updated on: Mar 27, 2021 | 6:39 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Corona Cases and Lockdown News LIVE : नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 4099 नव्या कोरोना रुग्णांची वाढ, मृतांचा आकडा 2283 वर

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय.| Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Mar 2021 11:12 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 4099 नव्या कोरोना रुग्णांची वाढ, मृतांचा आकडा 2283 वर

    नाशिक :  नाशिकमध्ये दिवसभरात 4099 नव्या कोरोना रुग्णांची वाढ. आज दिवसभरात  2158 रुग्ण कोरोनामुक्त

    नाशिक मनपा भागात- 2090 नवे रुग्ण

    नाशिक ग्रामीण भागात- 1706 नवे रुग्ण

    मालेगाव मनपा भागात- 0231 नवे रुग्ण

    जिल्हा बाह्य भागात-  72 नवे रुग्ण

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2283

    आज दिवसभरात कोरोनामुळे 09 जणांचा मृत्यू

    नाशिक मनपा- 04

    मालेगाव मनपा- 00

    नाशिक ग्रामीण- 04

    जिल्हा बाह्य- 01

  • 26 Mar 2021 08:42 PM (IST)

    इंग्लंडच्या 35 षटकात 281 धावा

    इंग्लंडच्या 35 षटकात 281 धावा, बेयरस्टो 123 तर बेन स्टोक्सच्या 99 धावा

  • 26 Mar 2021 08:35 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 3594  कोरोना रुग्णांची वाढ, 312 रुग्णांची प्रकृती गंभीर

    – पुण्यात दिवसभरात 3594  कोरोना रुग्णांची वाढ

    – दिवसभरात 2165 रुग्णांना डिस्चार्ज

    – पुण्यात दिवसभरातील 31 करोनाबाधित रुग्णांचा मृतयू 7 जण  पुण्याबाहेरील रुग्ण

    – 312 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत

    – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 251223 वर

    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या- 29983

    पुण्यात आतापर्यंत 5161 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

    पुण्यात आतापर्यंत कोरोग्रस्तांचा आकडा 216079 वर

  • 26 Mar 2021 08:30 PM (IST)

    बीडमधील पोलीस अधीक्षक कार्यालयातील 12 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

    बीड: दिवसभरात कोरोनाचे 383 नवे कोरोना रुग्ण आढळले

    बीड आणि अंबाजोगाईत सर्वांत जास्त रुग्ण

    पोलीस अधीक्षक कार्यालयातील 12 पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ

    जिल्हा कारागृह आणि महसूल विभागातील कर्मचारीही बाधित

    लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी 383 रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली

  • 26 Mar 2021 08:21 PM (IST)

    ठाण्यात कोरोनाचे थैमान दिवसभरात 990 जणांना कोरोनाची बाधा, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89 टक्क्यांवर

    ठाणे महानगरपालिका कोरोना संसर्ग संख्या अपडेट

    आज दिवसभरात 990 जणांना कोरोनाची बाधा, आजपर्यंत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 72,932 वर

    आतापर्यंत 64,810 जणांची कोरोनावर मात, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89 टक्क्यांवर

    6,746 सक्रिय कोरोना रुग्णांवर सध्या  उपचार सुरु आहेत

    आज दिवसभरात 369 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

    आज कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झाला त्यामुळे आतापर्यंत 1,376 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

  • 26 Mar 2021 07:54 PM (IST)

    कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शनिवार, रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद

    कल्याण डोंबिवली : महापालिका क्षेत्रात शनिवार, रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद

    भाजी मंडई 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास मुभा, फेरीवाल्यांना बंदी

    मेडिकल, दूध, हॉस्पिटल, पेट्रोल पंप आदी सुरू राहणार

    हॉटेल्स, रेस्टॉरंट बारमध्ये फक्त पार्सल सुविधा, मॉलमध्ये 50 टक्के उपस्थिती

  • 26 Mar 2021 06:33 PM (IST)

    वसई विरार नालासोपारा क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांत मोठी वाढ, 200 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

    मुंबई : वसई विरार नालासोपारा क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांत मोठी वाढ

    मागच्या 24 तासात 200 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह.

    तर 3 जणांचा मृत्यू,  55 जणांनी केली कोरोनावर मात

    वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 32,122 वर

    कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 29,995 वर

    आजपर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 912 वर

    सध्या 1215 रुग्णांवर उपचार सुरु

  • 26 Mar 2021 06:26 PM (IST)

    चंद्रपुरात 212 नव्या रुग्णांची नोंद, सध्या 1742 जणांवर उपचार सुरु

    चंद्रपूर : गेल्या 24 तासांत 212 नव्या रुग्णांची नोंद

    24 तासात 2 जणांचा मृत्यू

    एकूण कोरोना रुग्ण : 26701

    एकूण कोरोनामुक्त : 24542

    सध्या  1742 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु

    चंद्रपूरमध्ये आतापर्यंत 417 जणांचा मृत्यू

    एकूण नमूने तपासणी : 265962

  • 26 Mar 2021 06:18 PM (IST)

    लसीसंदर्भात अडचणी सोडविण्यासाठी पुण्यात ‘ट्रबल शूट’ ही हेल्पलाईन सुरु, नागरिकांना मांडता येणार अडचणी

    पुणे – लसीसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी महापालिकेकडून ‘ट्रबल शूट’ ही हेल्पलाइन सुरू

    020-25502114 या हेल्पलाईनवर मांडता येणार अडचणी

    अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची माहिती

  • 26 Mar 2021 05:22 PM (IST)

    नाशिकमध्ये कोरोनाचा धोका वाढला, नागरिका नियम पाळत नसतील तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही- छगन भुजबळ

    – नाशिकमध्ये कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जनजागृती करण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ स्वतः रस्त्यावर

    – नागरिकांना मास्क घाला असे भुजबळ समजावून सांगत आहेत.

    – नागरिक नियम पाळत नसल्यामुळे कोरोनामध्ये वाढ

    – नागरिकांनी शहराची परिस्थिती बघता नियम पाळण्याची गरज असल्याचे भुजबळ यांचे आवाहन

    – नागरिक सांगूनही ऐकत नसतील तर मग शेवटी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय- छगन भुजबळ

  • 26 Mar 2021 05:19 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात दिवसभरात 96 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू

    गोंदिया जिल्हा कोरोना अपडेट

    आज वाढलेले रुग्ण – 96

    आज झालेले मृत्यू – 01

    आज बरे झालेले – 50

    तालुक्यानुसार रुग्णसंख्या

    गोंदिया—————54

    तिरोडा—————14

    गोरेगाव—————04

    आमगाव————–08

    सालेकसा————-03

    देवरी——————04

    सडक अर्जुनी ———–04

    अर्जुनी मोरगाव——–04

    इतर राज्य————–01

    एकूण रुग्ण – 15426

    एकूण मृत्यू – 188

    एकूण बरे झालेले – 14615

    एकूण उपचार घेत असलेले रुग्ण – 623

  • 26 Mar 2021 05:17 PM (IST)

    कोरोना परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, पुण्यात खासगी रुग्णालयांत 50 टक्के बेड राखीव

    पुणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

    नियम पाळा अन्यथा पुढील आठवड्यात “लॉकडाऊन” बाबत निर्णय घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

    बैठकीतील ठळक मुद्दे-

    लॉकडाऊन टाळण्यासाठी नागरिकांनी कडक नियम पाळावेत

    जम्बो हॉस्पिटल्स पूर्ण क्षमतेने सुरु करा

    खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी 50 टक्के राखीव बेड ठेवण्याच्या सूचना

    लसीकरण केंद्रे 600 पर्यंत वाढवण्यात येणार

    शाळा, महाविद्यालये 30 एप्रिल पर्यंत बंद

    लग्न समारंभ 50 व्यक्तींच्या उपस्थितीतच

    अन्य सार्वजनिक, राजकीय, खाजगी कार्यक्रमांना बंदी

    सार्वजनिक उद्याने फक्त सकाळी सुरु

    मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा- अजित पवार

    होळी व अन्य सण समारंभ घरगुती स्वरुपात साजरे करा- अजित पवार

  • 26 Mar 2021 12:23 PM (IST)

    जनतेच्या मनात भीती राहिलेली नाही : अजित पवार

    मी सर्वांशी चर्चा केलीय, जनतेला मला सांगायचं आहे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर 2 एप्रिलला निर्णय घ्यावा लागेल. जनतेच्या मनात भीती राहिली नाही, सगळे निर्णय एकमताने घेतले आहेत : अजित पवार

  • 26 Mar 2021 11:13 AM (IST)

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी आणि शब-ए-बारात उत्सवाबाबत नागपूर महानगर पालिकेचे नवीन आदेश जारी

    नागपूर –

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी आणि शब-ए-बारात उत्सवाबाबत नागपूर महानगर पालिकेचे नवीन आदेश जारी

    सर्वजनिक व खासगी ठिकाणी होळी,धुलिवंदन, व शब ए बारात साजरी करण्यास मनाई

    मिरवणूक काढण्यास मनाई

    पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई

    29 मार्चला खासगी व सरकारी कार्यालये राहणार बंद

    दुकाने,मार्केट,वाचनालये,हॉटेल rstaurant डायनिंग बंद, 7 पर्यंत पार्सल सुविधा सुरू राहणार

    29मार्च ला किराणा,भाजीपाला, मटण,माँस दुपारी एक पर्यंत सुरू ठेवता येणार

  • 26 Mar 2021 09:49 AM (IST)

    खासगी रुग्णालयांनी कोरोना त्वरित बेड द्यावेत, अन्यथा…. पुण्याच्या महापौरांचा निर्वाणीचा इशारा

    पुणे –

    – खासगी रुग्णालयांनी त्यांच्या ताब्यातील बेडस्‌ स्वत:हून त्वरित करोना रुग्णांसाठी महापालिकेकडे द्यावेत,

    – अन्यथा कारवाई करायला कोणीही भाग पाडू नये,

    – महापौर मुरलीधर मोहोळ यांचा खासगी रुग्णालयांना इशारा,

    – बाधितांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी आता हेल्पलाइनवर सुरू झाल्या आहेत,

    – वाढती रुग्णसंख्या आणि बेडचे नियोजन ही महापालिकेच्या दृष्टीने आता जिकिरीची गोष्ट झाली आहे,

    – शहरातील रोजची तीन हजारांची वाढ पाहता यापैकी दोनशे ते तीनशे जणांना रूग्णालयांत दाखल करावे लागत आहे. त्यातील काही जणांना ऑक्‍सिजन बेडची आवश्‍यकता भासते.

  • 26 Mar 2021 09:21 AM (IST)

    पुणे जिल्ह्याच्या लॉकडाऊनचा आज निर्णय होण्याची शक्यता

    पुणे –

    – पुणे जिल्ह्याच्या लॉकडाऊनचा आज निर्णय होण्याची शक्यता

    – उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात आज कोरोना आढावा बैठक,

    – पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोनासंदर्भात अजितदादा घेणार आढावा,

    – कोरोना रुग्णसंख्या पाहता लॉकडाऊन होणार की कडक निर्बंध यावर आज निर्णय,

    – पुण्याचे महापौर लोकडाऊनच्या विरोधात तर प्रशासन लोकडाऊन लावण्याच्या मनस्थितीत,

    – विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि दोन्ही पालिकेचे आयुक्त बैठकीला उपस्थित राहणार,

    – 10 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक सुरू होणार

    – उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीच्या ठिकाणी पोहचलेत,

    – थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार

  • 26 Mar 2021 09:05 AM (IST)

    औरंगाबाद शहरात कोरोनाचा कहर कायम, 24 तासात शहरात 1,595 रुग्णांची वाढ

    औरंगाबाद –

    औरंगाबाद शहरात कोरोनाचा कहर कायम

    काल दिवसभरात शहरात 1595 रुग्णांची झाली वाढ

    आकडा पोचला 73848 वर

    तर सध्या रुग्णालयात 14189 रुग्णांवर उपचार सुरू

    आतापर्यंत 1505 रुग्णांचा झाला मृत्यू

  • 26 Mar 2021 09:04 AM (IST)

    पुण्यात कोरोना आढावा बैठक, लॉकडाऊनचा निर्णय होण्याची शक्यता

    पुणे :

    – पुणे जिल्ह्याच्या लॉकडाऊनचा आज निर्णय होण्याची शक्यता ?

    – उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात आज कोरोना आढावा बैठक,

    – पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोनासंदर्भात अजितदादा घेणार आढावा,

    – कोरोना रुग्णसंख्या पाहता लॉकडाऊन होणार की कडक निर्बंध यावर आज निर्णय,

    – पुण्याचे महापौर लोकडाऊनच्या विरोधात तर प्रशासन लोकडाऊन लावण्याच्या मनस्थितीत,

    – विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि दोन्ही पालिकेचे आयुक्त बैठकीला उपस्थित राहणार,

    – १० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक सुरू होणार

  • 26 Mar 2021 09:02 AM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, पाच दिवसात 24 जणांचा मृत्यू

    नंदूरबार :- नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढती, रोज अडीचशे ते तीनशे रुग्णांची भर पडत आहे तर दुसरीकडे चिंतेची बाब म्हणजे मृत्यूच्या आकडा देखील वाढत चालला आहे त्यामुळे प्रशासनासमोर मोठा आव्हान येऊन ठेपला आहे गेले पाच दिवसांमध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यू हा 24 वर गेला आहे त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय योजना केल्या जात आहे

  • 26 Mar 2021 09:01 AM (IST)

    नागपूरमध्ये कडक निर्बंध असतानाही अवैध दारुची विक्री, पोलिसांकडून दारुसाठा नष्ट

    नागपूर –

    वाढत्या कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी नागपूरमध्ये कडक निर्बंध प्रशासनाने लावले आहे.

    मात्र या कडक निर्बंधाचा गैरफायदा नागपूर शहरात अवैद्य दारू विक्रेते घेत आहे.

    काहीच दिवसांवर होळीचा सण आणि लवकर बंद होणारे दारू चे दुकान याचा फायदा घेण्यासाठी शहरातील गिट्टीखदान पोलीस स्टेशन च्या हद्दीत येणाऱ्या भिवसन खोरी भागातील विविध ठिकणी मोठ्या प्रमाणात अवैद्य पद्धतीने हातभट्टी ची दारू बनवत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.

    इथे सडलेल्या मोहफुलपासून आणि इतर वस्तूपासून दारू बनवून ती शहराच्या विविध भागात विकल्या जात असल्याची खात्री लायक माहिती मिळताच पोलिसांनी धडक कार्यवाही करत मोठ्या प्रमाणात दारुसाठा नष्ट केला.

    जवळ जवळ 7 लाख रुपयांचा दारूसाठा नष्ट करत 9 गुन्हेगारांवर विविध कालामांतर्गत 3 गुन्हे दाखल केले आहे.

    ऐन होळी च्या आधी झालेल्या इतक्या मोठ्या कार्यवाही मुळे अवैद्य दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

  • 26 Mar 2021 08:57 AM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा कहर, होळी, धुलीवंदन, रंगपंचमी साजरी करण्यास मनाई

    नंदूरबार –

    नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रतिबंधक उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यात होळी, धुलीवंदन, रंगपंचमी व तिथीनुसार शिवजयंती उत्सव, मिरवणूक, मेळावा रॅली व व्याख्याने हे कार्यक्रम सार्वजनिक स्वरूपात घेण्यास मनाई करण्याचे निर्देश देण्यात आले, जिल्ह्यात काठी येथील राजवाडी होळी व धडगाव तालुक्यातील होळी सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असतो त्यामुळे लोकांची गर्दी होत असते म्हणून येणारे सर्व उत्सव रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे

  • 26 Mar 2021 07:41 AM (IST)

    कोरोना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना नाशिक मनपा कर्मचारी, पोलिसांकडून दंडात्मक कारवाईचा दणका

    नाशिक

    – कोरोना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना मनपा कर्मचारी,पोलिसांकडून दंडात्मक कारवाईचा दणका

    – काल दिवसभरात 80 हजाराहून अधिक दंड केला वसूल

    – हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  • 26 Mar 2021 07:07 AM (IST)

    पुण्यातील कोरोनास्थिती अधिकाधिक चिंताजनक, दिवसभरात 3 हजार 286 जण पॉझिटि

    पुण्यातील कोरोनास्थिती अधिकाधिक चिंताजनक

    पुण्यात आज दिवसभरात 3 हजार 286 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

    1 हजार 200 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज

    दिवसभरात 31 रुग्णांचा मृत्यू , 8 जण पुण्याबाहेरील

    पुण्यात सध्या 28 हजार 578 रुग्णांवर उपचार सुरु

    पुण्यात आतापर्यंत 5 हजार 137 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  • 26 Mar 2021 07:05 AM (IST)

    मुंबईत 24 तासात दिवसभरात 5 हजार 504 नवे कोरोना रुग्ण

    मुंबईत 24 तासात दिवसभरात 5 हजार 504 नवे कोरोना रुग्ण

    दिवसभरात 2 हजार 281 रुग्ण कोरोनामुक्त

    मुंबईत आज 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला

    मुंबईत बरे होणाऱ्या रुग्णांचा दर 88 टक्के

    मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर 75 दिवसांपर्यंत खाली

  • 26 Mar 2021 07:03 AM (IST)

    राज्यात 24 तासात 35 हजार 952 कोरोना बाधित रुग्णांची वाढ

    राज्यात 24 तासात 35 हजार 952 कोरोना बाधित रुग्णांची वाढ

    नवीन 20 हजार 444 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत

    दिवसभरात 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    राज्यात सध्या एकूण 2 लाख 62 हजार 685 ऍक्टिव्ह रुग्ण

    राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.78%

    आतापर्यंत एकूण 22 लाख 83 हजार 037 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले

    राज्यात सध्या 13 लाख 62 हजार 899 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये

    13 हजार 770 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये

Published On - Mar 26,2021 11:12 PM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.