Maharashtra Coronavirus LIVE Update :नागपुरात 14 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकाही रुग्णाचा मृत्यू नाही

| Updated on: Jul 06, 2021 | 12:21 AM

कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi July 05 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates

Maharashtra Coronavirus LIVE Update :नागपुरात 14 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकाही रुग्णाचा मृत्यू नाही
corona

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. काल दिवसभरात राज्यात 9 हजार 336 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. तर 3 हजार 378 जणांनी कोरोनावर मात केलीय. एकूण 58,48,693 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर 1 लाख 23 हजार 225 रुग्ण सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.91% झाले आहे. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi July 05 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Jul 2021 09:20 PM (IST)

    सांगलीचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी कोरोना पॉझिटिव्ह, कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

    सांगली : सांगलीचे महापौर कोरोना पॉझिटिव्ह

    महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांना कोरोनाची लागण

    महापौर सुर्यवंशी होम आयसोलेशनमध्ये

    संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी

    नागरिकांनीही कोरोना त्रिसूत्रीचं पालन करावे

    महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांचे आवाहन

  • 05 Jul 2021 08:05 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात 91 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    उस्मानाबाद जिल्ह्यात 91 रुग्णांपैकी 22 बालके कोरोना पॉझिटिव्ह

    आज 91 नवे रुग्ण तर 2 जणांचा मृत्यू , जिल्ह्यात 559 सक्रिय रुग्ण

    2 हजार 211 तपासणीपैकी 91 रुग्ण पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्हीटी दर 4.11 टक्के

  • 05 Jul 2021 07:40 PM (IST)

    नागपुरात 14 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकाही रुग्णाचा मृत्यू नाही

    नागपूर कोरोना अपडेट

    नागपुरात दोन दिवसानंतर आज पुन्हा कोरोनामुळे शून्य मृत्यूची नोंद

    प्रशासनाला काहीसा दिलासा

    आज नागपुरात 14 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    तर 26 जणांनी केली कोरोनावर मात

    एकूण रुग्ण संख्या – 477209

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 868026

    एकूण मृत्यू संख्या 9031

  • 05 Jul 2021 07:39 PM (IST)

    नाशिकमध्ये दिवसभरात 124 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    नाशिक कोरोना अपडेट

    आज रोजी पूर्ण बरे झालेले कोरोना रुग्ण- 277

    आज रोजी पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 124

    नाशिक मनपा- 058

    नाशिक ग्रामीण- 063

    मालेगाव मनपा- 000

    जिल्हा बाह्य- 003

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8385

    आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू : 07

    नाशिक मनपा- 03

    मालेगाव मनपा- 00

    नाशिक ग्रामीण- 04

  • 05 Jul 2021 05:29 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 150 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ, 249 रुग्णांना डिस्चार्ज

    पुणे कोरोना अपडेट

    दिवसभरात 150 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

    – दिवसभरात 249 रुग्णांना डिस्चार्ज

    – पुण्यात करोनाबाधीत 15 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 10

    -290 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

    – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या  479882

    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2679

    – एकूण मृत्यू -8617

    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 468586

  • 05 Jul 2021 12:44 PM (IST)

    आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपूरसह 9 गावात संचारबंदी, मुख्यमंत्री महापूजेला पंढरपूरला येणार

    सोलापूर –

    आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपूरसह 9 गावात संचारबंदी

    मुख्यमंत्री महापूजेस पंढरपूरला येणार

    17 ते 25 जुलै दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी काढले संचारबंदीचे आदेश

    19 ते 25 जुलै दरम्यान कुणालाही दर्शन घेता येणार नाही

    आषाढी वारीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार

    जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

    वाखरी ते इसबावी दरम्यान प्रत्येक पालखी सोबत 40 वारकऱ्यांना मान्यता

    वारकऱ्यांचे RTPCR करण्यात येणार

  • 05 Jul 2021 10:00 AM (IST)

    तब्बल तीन महिन्यानंतर कोल्हापूर शहरातील दुकानांचे शटर उघडलं

    कोल्हापूर

    तब्बल तीन महिन्यानंतर कोल्हापूर शहरातील दुकानांच शटर उघडलं

    व्यापाऱ्यांच्या मागणीला अखेर यश

    कोल्हापूर शहरातील सर्व दुकान उघडायला राज्य शासनाकडून परवानगी

    आजपासून नऊ जुलै पर्यंत सकाळी सात ते सायंकाळी चार या वेळेत उघडता येणार

    परवानगी मिळताच व्यापाऱ्यांनी फटाके फोडून व्यक्त केला आनंद

    शहरातील महाद्वार रोड राजारामपुरी अशा मुख्य बाजारपेठेतील दुकाने उघडायला सुरुवात

  • 05 Jul 2021 09:00 AM (IST)

    पुणे शहरात आज कोविशिल्ड लस उपलब्ध नाही

    पुणे

    पुणे शहरात आज कोविशिल्ड लस उपलब्ध नाही

    तर फक्त 6 केंद्रावर मिळणार कॉव्हॅक्सिन लस..

    या 6 केंद्रांवर प्रत्येकी २०० डोस उपलब्ध

  • 05 Jul 2021 08:55 AM (IST)

    नाशिक बेळगावसह सर्वच विमानसेवा सुरू होणार

    नाशिक –

    नाशिक बेळगावसह सर्वच विमानसेवा सुरू होणार

    नाशिकहून अहमदाबाद, दिल्ली साठी देखील लवकरच निर्णय होणार

    नाशिकमधून स्टार एअर ची विमानसेवा लवकरच होणार सुरू

    तर नाशिक-पुणे-बेळगाव विमानसेवा देखील लवकरच सुरू होण्याची चिन्ह

    दुसऱ्या लाटेमुळे पूर्णपणे बंद होती विमानसेवा

  • 05 Jul 2021 08:53 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 21 टक्केच लसीकरण

    अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 21 टक्केच लसीकरण

    दुसरा डोस घेणारे फक्त 5 टक्केच नागरीक

    जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 6,46,013 नागरिकांचे लसीकरण

    डेल्टा प्लसचा संसर्ग कसा रोखणार?

    वेळेवर लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाची मोहीम मंदावली

    जिल्ह्यात कोरोनाचे 365 ऍक्टिव्ह रुग्ण

  • 05 Jul 2021 07:33 AM (IST)

    नागपुरात कोरोना लसीचा मोठा तुटवडा

    – नागपूरात कोरोना लसीचा मोठा तुटवडा

    – आज नागपूरात कोव्हिशिल्ड लसीचे लसीकरण नाही

    – ‘लसीच्या वाटपाबाबत नागपूरवर अन्याय’

    – ‘मुंबई, पुण्यात जास्त लसीचा साठा पुरवला जातोय’

    – भाजप नेते आ. कृष्णा खोपडे यांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप

    – लस नसल्याने नागपूरकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय

  • 05 Jul 2021 06:53 AM (IST)

    कोल्हापूर शहरातील निर्बंध पाच दिवसांसाठी हटवले, 5 ते 9 जुलै या कालावधीत अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकान खुली होणार

    कोल्हापूर

    कोल्हापूर शहरातील निर्बंध पाच दिवसांसाठी हटवले

    5 ते 9 जुलै या कालावधीत अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकान खुली होणार

    सकाळी 7 ते सायंकाळी चार पर्यंत दुकान खुली करायला राज्य सरकारकडून परवानगी

    मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती

    पाच दिवसानंतर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेऊन पुढचा निर्णय घेतला जाणार,त्यामूळे नियमांचं पालन करण्याचं प्रशासनाच आवाहन

    गर्दीचे प्रकार घडल्यास पुन्हा निर्बंध कडक करण्याचा ही दिला इशारा

    राज्य सरकारच्या निर्णयाने व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा

    ग्रामीण भागात मात्र निर्बंध कायम

  • 05 Jul 2021 06:44 AM (IST)

    लसींअभावी नागपूरमध्ये सोमवारी लसीकरण बंद

    नागपूर मनपा केंद्रांमध्ये सोमवारी कोव्हिशिल्डचे लसीकरण होणार नाही

    शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला कोव्हिशिल्ड लसींचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपाच्या कोव्हिशिल्ड लसीकरण केंद्रांवर सोमवारी कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

Published On - Jul 05,2021 6:43 AM

Follow us
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.