Corona Cases and Weekend Lockdown News LIVE : महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिवसभरात 461 नवे कोरोना रुग्ण

| Updated on: Apr 11, 2021 | 12:11 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Weekend Lockdown News LIVE

Corona Cases and Weekend Lockdown News LIVE : महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिवसभरात 461 नवे कोरोना रुग्ण
mumbai corona

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदीआणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे.| Corona Cases and Weekend Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Apr 2021 10:30 PM (IST)

    महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिवसभरात 461 नवे कोरोना रुग्ण

    मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे

    महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज  461 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.

    मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत 34हजार 635 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत

    त्यापैकी 29 हजार 794 रुग्ण बरे होऊन घरी

    मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 3 हजार 983 रुग्णावर उपचार सुरु

    मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत 858 रुग्णांचा मृत्यू

  • 10 Apr 2021 09:43 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 4953 नवे रुग्ण, 61 कोरोनाबाधितांचा मृत्यू

    पुणे कोरोना अपडेट : – दिवसभरात ४९५३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ४३८९ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ६१ रुग्णांचा मृत्यू. १५ रूग्ण पुण्याबाहेरील. – १०१४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३२२९८२. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५०४७३. – एकूण मृत्यू -५७००. -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २६६८०९. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २५५०४.

  • 10 Apr 2021 09:40 PM (IST)

    राज्यात दिवसभरात 55 हजार 411 नवे रुग्ण, तर दिवसभरात 309 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू

    राज्यात दिवसभरात 55 हजार 411 नवे रुग्ण, तर दिवसभरात 309 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू, दिवसभरात 53 हजार 5 रुग्णांना डिस्चार्ज, राज्यात रुग्ण बरे होण्याचंप्रमाण 82.18 टक्के, तर राज्यातील सध्याचा मृत्यूदर 1.72 टक्के

  • 10 Apr 2021 09:13 PM (IST)

    ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दिवसभरात 1,464 जणांना कोरोनाची बाधा

    ठाणे महानगरपालिका कोरोना संसर्ग संख्या अपडेट

    # आज 1,464 जणांना कोरोनाची बाधा, आजपर्यंत कोरोना संसर्ग झालेले एकूण रुग्ण  94,026

    # आज 1,104 रुग्ण कोरोनातून बरे

    # आतापर्यंत एकूण 77,389 जण कोरोनामुक्त

    रुग्ण बरे होण्याचं प्रमाण  83%

    # 15,197 रुग्णांवर सध्या उपचार सुरु

    # आज 5 जणांचा मुत्यू झाला, आतापर्यंत एकूण  1,440 जणांचा मृत्यू

  • 10 Apr 2021 08:35 PM (IST)

    उद्यापासून पुण्यात रेमेडिव्हीर इंजेक्शन रुग्णालयातच मिळणार 

    उद्यापासून पुण्यात रेमेडिव्हीर इंजेक्शन रुग्णालयातच मिळणार

    रेमेडिव्हीरचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

    पुण्यात सध्या रेमेडिव्हीरचा पुरेसा साठा उपलब्ध

    उद्यापासून रुग्णांच्या नातेवाइकांना धावपळ करण्याची गरज नाही

    खासगी केमिस्ट दुकानात इंजेक्शन मिळणार नाही

  • 10 Apr 2021 08:32 PM (IST)

    नागरिकांचा जीव महत्वाचा, जास्त रूग्ण झाले तर उपचार कसे करणार?- बाळासाहेब थोरात

    मुंबई : नागरिकांचा जीव महत्वाचा

    कटू निर्णय घेण्याची वेळ आलीय

    जास्त रूग्ण झाले तर उपचार कसे करणार?

    महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे वक्तव्य

    मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत थोरातांनी आपलं म्हणणं मांडलं

    सर्वांनी एकत्र येवून निर्णय घेण्याची वेळ

    महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे वक्तव्य

  • 10 Apr 2021 08:15 PM (IST)

    कल्याण डोंबिवलीत 1996 नवे कोरोना रुग्ण तिघांचा मृत्यू

    कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी 93 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज  1996 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या 24 तासांत 862 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या रुग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या 93773 इतकी झाली आहे. यामध्ये  14634 रुग्ण उपचार घेत असून 77850 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत 1289 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • 10 Apr 2021 08:09 PM (IST)

    कोरोनामुळे दिवसभरात 18 जणांचा मृत्यू, जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1077 वर

    सोलापूर – कोरोनामुळे आज दिवसभरात 18 जणांचा मृत्यू

    आज सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1077 वर

    शहरात 363 तर ग्रामीणमध्ये 714 असे एकूण 1077 नवे पॉझिटिव्ह रुग्ण

    शहरातील 11 तर ग्रामीण भागातील 7 जणांचा मृत्यू

  • 10 Apr 2021 07:54 PM (IST)

    दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय जाहीर होणार, मुख्यमंत्र्यांची उद्या टास्क फोर्ससोबत बैठक

    दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर जाहीर केलं. उद्या टास्क फोर्सची बैठक होईल. या बैठकीनंतर निर्णय जाहीर केला जाईल. आठ दिवस किंवा 14 दिवसांचा लॉकडाऊनची शक्यता आहे. त्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. येत्या 15 ते 30 एप्रिल दरम्यान भयानक परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. याबाबत सर्वसमावेश असा प्लॅन तयार करावा, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री उद्या प्रसासकीय अधिकारी चर्चा करतील. त्यानंतरच याबाबत भूमिका मांडण्याची शक्यता आहे.

  • 10 Apr 2021 07:36 PM (IST)

    तात्याराव लहाणेंचं काय जातंय? आमदारांचे 2 कोटी कापा, 700 कोटी मिळतील : चंद्रकांत पाटील

    “आजच्या बैठकीत निर्णय झाला नाही. कोरोनावर नियंत्रण मिळवायचा असेल तर कडक लॉकडाऊन करावा, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका दिसतेय. देवेंद्र फडणवीस यांनी आग्रह धरलाय, लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या घटकांचा काय विचार केलाय, याबाबत प्लॅन केला नाहीत तर उद्रेक होईल, असं त्यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांनी तो मुद्दा मान्य केला. अजित पवार यांनी सोमवारी हातावरती पोट असणाऱ्यांसाठी काय पॅकेज देता येईल, याबाबत विचार करु, असं म्हटलं आहे. पण त्यांनी एक अडचण सांगितली. ती अडचण बरोबर नाही. याबाबत नेमक्या संख्या नसतात. तर सगळे रिक्षाचालक, टॅक्सीचालक, घरकाम करणारे, फुटपाथविक्रेते रजिस्टर असतात. सगळे कामगार रजिस्टर असतात. त्यामुळे प्रश्न पडण्याचं काही कारण नसतं. इच्छाशक्ती असलं तर सगळं शक्य होतं”, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

    चंद्रकांत पाटील आणखी काय म्हणाले?

    मुख्यमंत्र्यांच्या कोरोना नियंत्रण आणण्यासाठी आमचा पाठिंबा आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी काही प्रॅक्टिकल विचार केला असेल. व्यापार, छोटे दुकानदार यांचा विचार केला जावा. देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले मुद्दे हे सर्वसामान्यांच्या पोटापाण्यासंबंधित आहे. सर्वसामान्यांना दुकान भाडं, कर्जाचा हफ्ता असतो. त्यामुळे सगळ्यांचा विचार केला पाहिजे.

    दोन दिवसात मुख्यमंत्री विचार घेऊन निर्णय घेतील, अशी अपेक्षा. घरी बसवून शिवथाळीचे पॅकेट पाठवून देणार का घरात? पैसे नाही म्हणता आणि आमदारांना 2 कोटी कसे देता? एका वेळी 700 कोटी वापरायला मिळतील. 14 दिवसाचा कडकडीत लॉक डाऊन लावा म्हणणाऱ्या तात्याराव लहाणे यांचे काय जाताय. त्यांनी झोपडपट्टी मध्ये जाऊन गरिबांची अवस्था पहा

  • 10 Apr 2021 07:29 PM (IST)

    राज्यात संपूर्ण लॉकडाऊनला मनसेचा विरोध

    कडक निर्बंध आणि लॉकडाऊनला मनसेचा विरोध, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भूमिका मांडली आहे. मनसेने याआधीही याबाबत भूमिका मांडली आहे. आजच्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित नाहीत. त्यांच्या कंबरेचा स्नायू दुखत असून त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.

  • 10 Apr 2021 07:27 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घ्यावा, आमचा त्यांच्या निर्णयाला पाठिंबा : अजित पवार

    “आताच बैठक झाली. आताच काही सांगायचं नाही. सर्वच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक झाली. सर्वांनी आपले मुद्दे मांडली. बैठक संपल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना काय निर्णय घ्यायचा तो घ्या. आम्ही तुमच्या निर्णयाच्या पाठीशी आहोत, असं सांगितलं”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

  • 10 Apr 2021 07:23 PM (IST)

    आम्ही लॉकडाऊन करण्याबाबत सांगितलंय, पण : नाना पटोले

    “गेल्या वर्षाचा अनुभव फार भयानक आहे. या वेळेस ताटं वाजवू शकत नाही किंवा दिवेही पेटवू शकत नाही. देशाच योग्य प्रमाणात लसीकरण झालं असतं तर आज आपल्याला एवढ्या मोठ्या कोरोना उद्रेकाला सामोरे जावे लागलं नसतं. पण आता आपण लॉकडाऊन करु तर लोकांना मदत करण्याच्या विषयाला गांभीर्याने घेणं जरुरीचं आहे. कोरानाची चेन तुटली पाहिजे. ज्याचं जळतं त्याला कळतं. आज तरुणांता या आजारामुळे मृत्यू होतोय. त्यामुळे त्या परिवारांचं काय होतं असेल याची जाणीव आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन लागू करण्याबाबत सांगितलं आहे. पण गेल्या वेळी लागू केलेल्या लॉकडाऊनसारखा लागू करु नये. छोटे दुकानदारांना बघून, गरिब, होतकरुंचाही विचार करुन लॉकडाऊन करण्याबाबत सांगितलं आहे. याबाबत चर्चा अजून सुरु आहे”, असं काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.

    “आम्ही लॉकडाऊनची भूमिका घेतली आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक, मात्र विरोधक अजूनही राजकारण करत आहे. आधी मदत मग लॉकडाऊन असं विरोधकांचं म्हणणं आहे. पण सध्या जीव वाचवणं आवश्यक आहे. सध्याची राज्यात परिस्थिती बिकट आहे. भयानक स्थितीला सामोरं जावं लागत आहे. आता ताटं आणि दीवे पेटवण्याची वेळ नाही. केंद्राने राष्ट्रीय महामारी घोषित केलीय. गुजरात हायकोर्टाने त्या सरकारला फटकारलं. पण महाराष्ट्रात राजकारण होत आहे. मदतीचा प्रश्न आहे, त्याला काँग्रेसचं समर्थन आहे. 20 लाख कोटींचा रुपया कुणाला मिळाला नाही. राज्याने विशेष पॅकेज तयार करावं. आम्ही केंद्राकडे बोट दाखवत नाही. मदतीची भूमिका राज्याची आहे. केंद्राने सर्वात मोठं पाप केलं, लसीकरणात भाजपविरोधी राज्यांना कमी लस दिली. रोज जवळपास ६ लाख लसीकरणाचं टार्गेट होतं. पण लसी अत्यल्प पुरवल्या. त्यावर आरोप केला राज्याने लसी खराब केल्या. उत्तर प्रदेशात ९ टक्के वेस्ट, महाराष्ट्रात ३ टक्के वेस्ट झाल्या. केवळ राजकारण सुरु आहे”, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

  • 10 Apr 2021 07:13 PM (IST)

    नाशिकमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढली : छगन भुजबळ

    नाशिक : “ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. 158 मेट्रिक टन पैकी 96 मेट्रिक टन उपलब्ध आहे. बँकेच्या ताब्यात आलेल्या सिन्नरच्या काही ऑक्सिजन कंपन्या सुरू करत आहोत. 1 ते 7 एप्रिल पर्यंत रेमडिसिव्हरचे 28800 इंजेक्शन प्राप्त झाले आहेत. व्हेंटिलेतर आणि ऑक्सिजनवर 2500 पेशंट आहेत. तर मग 28000 रेमडिसिव्हर कुठे गेले? रेमडिसिव्हरचं सर्रास वाटप झालं. आवश्यकता नाही अशांनी देखील घेतले. उद्या परवा पर्यंत रेमडिसिव्हर देतो असं राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं”, असं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं.

  • 10 Apr 2021 07:07 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आठ दिवस लॉकडाऊनचे संकेत

    राज्यातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लॉकडाऊन लागू करण्याच्या तयारीत आहे. याबाबतचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. आठ दिवस लॉकडाऊन ठेवू. त्यानंतर एक एक गोष्टी सोडू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र, तज्ज्ञांच्या मते कमीतकमी 14 दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता आहे. पण विरोधी पक्षाचा पूर्ण लॉकडाऊनला विरोध आहे.

    ऑनलाईन होणाऱ्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण,  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे. संध्याकाळी 5 वा. या बैठकीला सुरुवात झाली.

  • 10 Apr 2021 04:49 PM (IST)

    टाळेबंदीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री अस्लम शेख उतरले रस्त्यावर

    मुंबई : शनिवारी आठवडा समाप्ती टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दक्षिण मुंबईतील विविध भागांचा दौरा करत टाळेबंदीच्या अंमलबजावणीची प्रत्यक्ष पाहणी केली.

    वाळकेश्वर येथील आपल्या शासकीय निवासस्थानाहून दौऱ्याची सुरुवात करत तिन बत्ती सिग्नल, मरीन लाईन्स, गेटवे ऑफ इंडिया व नागपाडा परिसराला भेट देत त्यांनी दक्षिण प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त श्री सत्य नारायण व झोन १ पोलीस उपायुक्त श्री शशी कुमार मीना यांच्याशी चर्चा केली.

    यंदाच्या आयपीएल हंगामातील वानखडे स्टेडियमवर होत असलेल्या पहिल्या मॅचच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वानखडे स्टेडियम बाहेरील परीसराची देखील पाहणी केली.

    यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं.

  • 10 Apr 2021 04:23 PM (IST)

    नागपूरात लवकरंच येणार रेमडेसवीर इंजेक्शन, नितीन गडकरी यांची सन फार्मा कंपनीच्या मालकाशी चर्चा

    – नागपूरात लवकरंच येणार रेमडेसवीर इंजेक्शन

    – सन फार्मा कंपनीच्या मालकाशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची चर्चा

    – १० हजार इंजेक्शन येणार असल्याची माहिती

    – आज ५ हजार रेमडेसवीर इंजेक्शन येणार, उर्वरीत पाच हजार इंजेक्शन दोन दिवसांत येणार

  • 10 Apr 2021 03:42 PM (IST)

    बीड जिल्ह्यात लसींचा तुटवडा

    बीड: बीड जिल्ह्यामध्ये लसींचा तुटवडा

    लस मिळत नसल्यामुळे लसीकरण केंद्र पडली बंद

    जिल्ह्यातील 38 लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की

    जिल्ह्यामध्ये केवळ 3800 लसीचे डोस उपलब्ध

    128 केंद्रावर जिल्ह्यामध्ये लसीकरण केंद्र होते सुरू

    आज लस उपलब्ध झाली नाही तर सर्वच केंद्र बंद होण्याची भीती

  • 10 Apr 2021 03:41 PM (IST)

    गडचिरोलीत कोरोनाची परिस्थिती काय?

    गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड, एटापल्ली, अहेरी, सिरोंचा या भागातही कोरोनाचे प्रमाण वाढलेले आहे. गडचिरोली जिल्ह्यात जवळपास प्रत्येक दिवशी दोनशेच्यावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असून या दहा दिवसात पंधरा कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. काल रात्रीपासून सोमवारपर्यंत विकेंट लॉकडाऊन असल्यामुळे बाजारपेठ आणि दुकाने पूर्णपणे बंद आहेत. रस्ते पूर्ण शुकशुकाट असून एमर्जन्सी सेवा म्हणून औषधे दुकाने किंवा मेडिकल सुरू आहेत. नागरीक लाकडाऊन चांगला प्रतिसाद देत असून बाजार पूर्णपणे बंद दिसली.

  • 10 Apr 2021 03:29 PM (IST)

    गडचिरोलीत 15 एप्रिलपर्यंत पुरेल इतका लसींचा साठा

    गडचिरोली जिल्ह्यात लसीकरणाचा तुटवडा नसून सध्या गडचिरोली जिल्ह्यात 15 एप्रिलपर्यंत पुरेल इतक्या लस उपलब्ध आहेत. गडचिरोली जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढत असून गडचिरोली जिल्ह्यात 15 तारखेनंतर लसीकरणाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    काल 1 मृत्यूसह जिल्हयात 229 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच काल 71 जणांनी कोरोनावर मात केली यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 11831 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10513 वर पोहचली. तसेच सद्या 1193 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 125 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

  • 10 Apr 2021 03:27 PM (IST)

    नागपूरात व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध नाहीत

    – कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने बेड उपलब्ध नाहीत

    – नागपूरात ५३१ व्हेटीलेटर्स बेड आहेत, सध्या सर्व बेड फुल्ल झालेय

    – जिल्ह्यात सध्या ४९३४७ सक्रीय कोरोना रुग्ण

    – नागपूरात आरोग्य व्यवस्था व्हेटिंलेटरवर

    – सरकारीसह खाजगी रुग्णालयांतही व्हेंटिलेटर्स बेड नाही

  • 10 Apr 2021 03:26 PM (IST)

    ठाण्यात वीकेंड लॉकडाऊनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद

    विकेंड लॉकडाऊन असल्याने ठाणे शहर सध्या शांत झाल्याचे चित्र आहे. नेहमी ट्राफिक जाम असणाऱ्या माजिवडा नाका येथे तुरळक वाहने दिसून येत आहेत. मुंबई-नाशिक महामार्ग असो किंवा गुजरातला जाणार रस्ता या मार्गावर तुरळक प्रमाणात वाहने दिसत आहे. तसेच पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून अनावश्यक कारणासाठी बाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांना घरी पाठवले आहे. नेहमी दिसणारी वर्दळ ही ठाण्याच्या रस्त्यांवर दिसून येत नाही. त्यामुळे ठाणेकरांनी कडक लॉकडाऊनचे पालन केल्याचे चित्र दिसत आहे. तर उद्या रविवारचा दिवस कसे पालन करणार हेच पाहणे गरजेचे आहे.

  • 10 Apr 2021 03:23 PM (IST)

    रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हा स्तरावर कंट्रोल रूम होणार

    रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हा स्तरावर कंट्रोल रूम होणार

    आरोग्य सेवाच्या आयुक्तांचे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

    रेमडेसिव्हीरची मागणी वाढत आहे. त्यात खासगी दुकानदार जास्त किंमत लावत आहेत.

    त्यामुळे सध्या ऑक्सिजन कंट्रोल रूममध्ये रेमडेसिव्हीरबाबत तक्रारी स्वीकारल्या जाणार

    त्याचे निराकरण स्थानिक FDA च्या कार्यालयमार्फत होणार

    जिल्हा स्तरावर तांत्रिक समिती गठीत करून त्यामार्फत रँडम पद्धतीने खासगी रुग्णालयात रेमडेसिव्हीर उपयोग नीट होत आहे की नाही याची तपासणी करावी

    रेमडीसीविर गरज भासल्यास राज्य स्तरावरील FDA च्या कंट्रोल रूमशी संपर्क करून कारवाई होणार

    जिल्हा स्तरावर यासाठी कंट्रोल रूम स्थापन होणार

  • 10 Apr 2021 02:51 PM (IST)

    ठाण्यात 21 रेमेडेसिविर इंजेक्शन जप्त, 2 जणांना अटक

    ठाण्यात पकडले 21 रेमेडेसिविर इंजेक्शन, 2 जणांना पोलिसांकडून अटक, ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई, प्रत्येक इंजेक्शन 5 ते 10 हजार रुपयांना विकणार होते

  • 10 Apr 2021 02:31 PM (IST)

    लाॅकडाऊनच्या भीतीपोटी दारूच्या साठेबाजीला सुरुवात

    चेंबूर नवजीवन सोसायटीच्या बाहेरील वाईन शाॅपबाहेर तळीरामांची एकच गर्दी… – सोशल डिस्टंन्सिंग फज्जा. – लाॅकडाऊनच्या भीतीपोटी दारूच्या साठेबाजीला सुरुवात – दहा ते वीस लिटर दारू घेऊन जाताना मद्यपी कॅमेर्यात कैद… – कॅमेरा पाहून पळाले मद्यपी… – काऊंटरवर दारू विक्रीस आहे बंदी…

    केवळ ऑनलाईन विक्रीला परवानगी दिलाचं वाईन शाॅप मालकाची माहीती…

  • 10 Apr 2021 02:08 PM (IST)

    बीकेसीतील जम्बो कोविड सेंटरमध्ये पुन्हा कोरोना लसीकरणाला सुरुवात

    बिकेसी जम्बो कोविड सेंटरमध्ये पुन्हा लसीकरणाला सुरुवात

    लसीकरण सुरळीत सुरु…. – आज ९ हजार लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत…. – १२ वाजल्यापासून लसीकरणाला सुरवात झाली आहे – नऊ हजार डोस उपलब्ध झाल्याने उद्याही लसीकरण सुरू राहणार, दोन दिवस पुरेल इतका लसींचा साठा आहे… – काल फक्त १६० लसीचे डोस उपलब्ध होते

    त्यामुळे 160 डोस नंतर लसीकरण थांबवण्यात आले होते

  • 10 Apr 2021 02:05 PM (IST)

    शहापूरमध्ये वीकेंड लॉकडाऊनला उस्फूर्त प्रतिसाद

    शहापूर

    शहापूरमध्ये वीकेंड लॉकडाऊनला उस्फूर्त प्रतिसाद पहायला मिळत आहे. शुक्रवारच्या रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉक डाऊन असल्याने रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

    अत्यावश्यक सेवे मध्ये मेडिकल व दवाखाने वगळता दूध डेअरी, भाजीपाला आणि अन्य सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत

    बंद मुळे कोणता ही अनिश्चित प्रकार घडू नये म्हणून नाक्या नाक्यांवर पोलीस अधिकारी, होमगार्ड, व त्याच्या सोबत नगरपंचायत आणि ग्रामपंचायत कर्मचारी सुद्धा तैनात ठेवण्यात आले हेत

    इमर्जीनशी कामा निमित्त जाणाऱ्या प्रत्यक वाहनाला चेक करूनच सोडले जात आहे

  • 10 Apr 2021 01:04 PM (IST)

    मुंबई गोवा महामार्गावर शुकशुकाट, वाहनांची तुरळक वर्दळ

    रत्नागिरी- कोकणाची लाईफलाईन असलेल्या मुंबई गोवा महामार्गावर शुकशुकाट

    वळणावळणाच्या घाटात वाहनांची तुरळक वर्दळ

    मुंबई गोवा महामार्गावर विकेंड लाॅकडाऊन मुंबई गोवा महामार्गावर धावतायत अत्यावश्यक सेवांच्या गाड्या

    मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर लाॅक डाऊनचा मोठा परिणाम

  • 10 Apr 2021 12:36 PM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा रेमडेसिव्हरचा काळाबाजार उघड

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा रेमडेसिव्हरचा काळाबाजार उघड झालाय.

    4800 रुपयांचे इंजेक्शन 11 हजारांना विक्री करताना कारवाई

    -याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे

  • 10 Apr 2021 11:57 AM (IST)

    Kolhapur Weekend Lockdown | कोल्हापुरात वीकेंड लॉकडाऊनमधून एमआयडीसींना सूट

    कोल्हापूर :

    वीकेंड लॉकडाऊन मधून एमआयडीसी ना सूट

    कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली गोकुळ शिरगाव आणि कागल या तीन ही एमआयडीसी सुरळीत सुरू

    कोरोनाचे नियम पाळत कंपन्या सुरू

    बाहेर गावातील कामगारांना आणण्यासाठी कंपनी मालकांनी केली सोय

    कंपन्या सुरू असल्यानं एमआयडीसी आवारात नेहमीची वर्दळ

    हॉटेल,नाश्ता सेंटर आणि टपऱ्या मात्र बंदच

  • 10 Apr 2021 11:56 AM (IST)

    नाशिकमध्ये रेमडेसिव्हर इंजेक्शन मिळत नसल्याने नागरिक आक्रमक

    नाशिक -रेमडेसिव्हर इंजेक्शन मिळत नसल्याने नागरिक आक्रमक

    प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलनाला नागरिकाडून सुरवात

    तासंतास रांगेत उभे राहून देखील इंजेक्शन मिळत नसल्याने नागरिक रस्त्यावर

    सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

  • 10 Apr 2021 11:55 AM (IST)

    मनमाडमध्ये वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद, दुकाने कडकडीत बंद

    मनमाड :- वीकेंड लॉकडाऊनला मनमाड, मालेगाव, नांदगावला चांगला प्रतिसाद

    सकाळपासूनच प्रमुख बाजारपेठेसह इतर सर्व दुकाने कडकडीत बंद

    दुकाने बंद असल्याने सगळीकडे पसरला शुकशुकाट

  • 10 Apr 2021 11:02 AM (IST)

    Solapur Lockdown Update | सोलापुरातल्या दत्त चौक परिसरात शुकशुकाट, सर्व दुकाने बंद

    सोलापूर : सोलापुरातल्या दत्त चौक परिसरात शुकशुकाट

    विकेंड लॉकडाऊन असल्यामुळे सर्व आस्थापना बंद

    वैद्यकीय सेवा ,मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद

  • 10 Apr 2021 10:37 AM (IST)

    Aurangabad Lockdown Update | औरंगाबाद शहरातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत शुकशुकाट

    औरंगाबाद :-

    औरंगाबाद शहरातील गुलमंडीवर कडकडीत लॉकडाऊन

    औरंगाबाद शहरातल्या सर्वात मोठ्या बाजारपेठेत शुकशुकाट

    गुलमंडीवरली सर्वच दुकाने कडकडीत बंद

    जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता सर्वच व्यवहार ठप्प

    नागरिकांचा लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद

    दोन दिवस सुरू राहणार औरंगाबाद शहरातील कडक लॉक डाऊन

  • 10 Apr 2021 10:34 AM (IST)

    Ratnagiri Lockdown Update | रत्नागिरीत विकेंड लाॅकडाऊनची कडक अमंलबजावणी, ठिकठिकाणी पोलिसांची कारवाई

    रत्नागिरी- विकेंड लाॅकडाऊनची जिल्ह्यात कडक अमंलबजावणी रत्नागिरी शहरातील रस्ते निर्मनुष्य, शहरात आठ ठिकाणी बॅरिकेटिंग ड्रोनच्या सहाय्याने रत्नागिरीतील कडक लाॅकडाऊनची दृष्ये ठिकठिकाणी पोलिस चेंकिंग, नगरपरिषदेचे कर्मचारी पोलिसांच्या मदतीला आवश्यक कामाशिवाय बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

  • 10 Apr 2021 10:30 AM (IST)

    Sindhudurg Lockdown Update | लॉकडाऊनला सिंधुदुर्गकरांचा पूर्ण पाठिंबा, संपूर्ण बाजारपेठ बंद

    सिंधुदुर्ग लॉकडाऊनला सिंधुदुर्गकरांचा पूर्ण पाठिंबा.

    जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा झाल्या ठप्प.

    नेहमीची गर्दीची गजबजणारी ठिकाणे झाली निर्मनुष्य.

    शहरी बाजारपेठाबरोबरच ग्रामीण भागातील दुकाने ही बंद.

    रस्ते निर्मनुष्य.

    विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांची कारवाई.

  • 10 Apr 2021 10:27 AM (IST)

    नागपूरच्या ग्रामीण भागात एकही ॲाक्सीजन बेड नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

    चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

    – नागपूरच्या ग्रामीण भागात कोरोनाची विदारक स्थिती

    – ग्रामीण भागात RTPCR रिपोर्ट पाच ते सात दिवस मिळत नाही

    – RTPCR रिपोर्ट वेळेत न आल्यामुळे रुग्णांकडून इतरांना संक्रमण वाढलं

    – १४ महिन्यात ग्रामीण भागात RTPCR चाचणीची सोय नाही

    – रिपोर्ट येईपर्यंत रुग्णांवर उपचार सुरु होत नाही

    – सुपर स्प्रेडरचं टेस्टींग झालं नाही, प्रशासनाचा दावा फोल आहे

    – नागपूरच्या ग्रामीण भागात एकंही ॲाक्सीजन बेड नाही

  • 10 Apr 2021 09:58 AM (IST)

    वाशिम जिल्ह्यात केवळ अर्धा दिवस पुरेल एवढाचा लसीचा साठा शिल्लक

    वाशिम : जिल्ह्यात केवळ अर्धा दिवस पुरेल एवढीच लस शिल्लक

    जिल्ह्यात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन 1000 डोस शिल्लक.

    लस तुटवड्यामुळे जिल्ह्यातील 130 केंद्रांपैकी 97 केंद्र बंद करण्यात आली आहेत

    तर आज 33 केंद्रावरच लसीकरण सुरु

    जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 95 हजार जणांचे लसीकरण झाले असून कित्येक इच्छूक केंद्रावर लस नसल्याने वापस जात आहेत

    जिल्ह्यातील लसीकरण केंद्राचा केंद्रीय पथकातील सदस्य डॉ पुनीत अरोरा यांनी घेतला होता आढावा …..

    जिल्हा आरोग्य अधिकारी अविनाश आहेर याची माहिती…

  • 10 Apr 2021 09:56 AM (IST)

    नाशिकमध्ये रुग्णाला बनावट रेमडेसिव्हर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर

    नाशिक – रुग्णाला बनावट रेमडेसिव्हर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर

    गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात रेमडेसिव्हर इंजेक्शन चा तुटवडा

    याच गोष्टीचा गैरफायदा घेत विकण्यात येत आहे बनावट रेमडेसिव्हर

    रेमडेसिव्हर इंजेक्शन चा काळाबाजार सुरू असल्याच्या अनेक तक्रारी

    बनावट रेमडेसिव्हर इंजेक्शन चा काळाबाजार होत असल्याची धक्कादायक बाब उघड

  • 10 Apr 2021 09:13 AM (IST)

    नागपूरच्या कॅाटनमार्केट भाजी मंडीत मोठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

    नागपूरच्या कॅाटनमार्केट भाजी मंडीत मोठी गर्दी

    – भाजी बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

    – भाजी खरेदीसाठी आलेले निम्मे लोक विनामास्क

    – भाजीविक्रेतेही सर्रास वावरतात विनामास्क

    – अत्यावश्यक सेवा म्हणून विकेंड लॅाकडाऊन असतानाही भाजीविक्रीला परवानगी

    – भाजीविक्रेत्यांकडून कोरोनाचे नियम धाब्यावर

    – … या बेजबाबदार लोकांवर कारवाई कधी होणार

    – नागपूर मनपाची बघ्याची भुमीका

  • 10 Apr 2021 09:12 AM (IST)

    सोलापूर शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाईच सत्र सुरू

    सोलापूर शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकावर पोलिसांकडून कारवाईच सत्र सुरू आहे, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विकेन्ड लॉकडाऊन जाहीर केला आहे, विकेंड लॉकडाउनच्या दिवशी नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही असे सूचना वारंवार प्रशासनाकडून देण्यात येत होती,मात्र तरीही आज नागरिक बाहेर पडत आहेत,अश्यावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

  • 10 Apr 2021 09:04 AM (IST)

    नागपूरच्या भाजी मार्केटमध्ये मोठी गर्दी, निम्मे लोक विनामास्क

    नागपूरच्या कॅाटनमार्केट भाजी मंडीत मोठी गर्दी

    – भाजी बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

    – भाजी खरेदीसाठी आलेले निम्मे लोक विनामास्क

    – भाजीविक्रेतेही सर्रास वावरतात विनामास्क

    – अत्यावश्यक सेवा म्हणून विकेंड लॅाकडाऊन असतानाही भाजीविक्रीला परवानगी

    – भाजीविक्रेत्यांकडून कोरोनाचे नियम धाब्यावर

    – या बेजबाबदार लोकांवर कारवाई कधी होणार

    – नागपूर मनपाची बघ्याची भुमीका

  • 10 Apr 2021 09:03 AM (IST)

    धारावीत लाॅकडाऊनला संमिश्र प्रतिसाद

    मुंबई : धारावी 90 फिट रोड इथे लाॅकडाऊनला संमिश्र प्रतिसाद – स्थानिक रस्त्यावर विनामास्क फिरत आहेत – धारावी लेदर मार्केटमध्ये दोन्ही बाजूची दुकाने सध्या बंद – रस्त्यावरची वर्दळही कमी

    पण लोकांमध्ये लाॅकडाऊनचं तितकसं गांभीर्य नाही

  • 10 Apr 2021 09:01 AM (IST)

    सोलापुरात नियम मोडणाऱ्यावर पोलिसांची कारवाई, लॉकडाऊनदरम्यान पेट्रोलपंप, किराणा दुकान सुरु राहणार

    सोलापुरात नियम मोडणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

    विनाकारण फिरणाऱ्या लोकांची वाहने पोलिसांकडून केली जात आहेत जप्त

    शहराच्या विविध भागात पोलिसांची कारवाई सुरू

    सोलापूर – विकेंड लॉकडाऊनला रात्री 8 पासून सुरुवात

    पेट्रोलपंप, किराणा दुकान सुरू

    वैद्यकीय सेवा, हॉस्पिटल्स आणि मेडिकल सुरू

  • 10 Apr 2021 08:32 AM (IST)

    पुण्यात विकेंड लॉकडाऊनदरम्यान काय सुरु, काय बंद?

    पुणे –

    – विकेंड लॉकडाऊन या कालावधीत नेमकं काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार त्याबाबत तपशीलवार माहिती…

    – नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी वावरणे –

    – सोमवार ते शुक्रवार – कोविड निर्देशांचे पालन करून जास्तीत जास्त पाच जणांनी एकत्र फिरण्यास परवानगी (सकाळी सात ते सायंकाळी सहा)

    – विकेंड लॉकडाऊन – अत्यावश्यक कारण, अत्यावश्यक सेवा याशिवाय नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध

    – फक्त अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय आस्थापना कर्मचारी

    – सोमवार ते शुक्रवार – ओळखपत्रासह संचार करण्यास परवानगी

    – विकेंड लॉकडाऊन – ओळखपत्रासह संचार करण्यास परवानगी

    – संचारबंदीमधून हॉस्पिटल, मेडिकल शॉप्स, इन्शुरन्स कार्यालय, औषध विक्रेते व कंपन्या, वैद्यकीय सेवेशी संबंधित घटक वगळण्यात आले आहेत.

  • 10 Apr 2021 08:31 AM (IST)

    कोल्हापुरात विनाकारण आणि विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

    कोल्हापूर

    विकेंड लॉकडाऊनला कोल्हापूरकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

    शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये शुकशुकाट

    अत्यावश्यक सेवेतील वाहन आणि लोकच रस्त्यावर

    लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीसाठी पोलीस ही रस्त्यावर

    वाहनधारकांची पोलिसांकडून केली जाते चौकशी

    विनाकारण आणि विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर होणार कारवाई

  • 10 Apr 2021 08:04 AM (IST)

    कोरोना नियमांचे उलल्ंघन करणाऱ्या 286 जणांवर कारवाई, 1 लाख 12 हजाराची दंड वसुली

    नवी मुंबई

    कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणा-या 286 जणांकडून 1 लाख 12 हजार दंड वसूली

    महापालिका क्षेत्रात कोव्हीड काळात 1 कोटी 78 लक्षहून अधिक दंडात्मक वसूली

    सामाजिक आरोग्याला धोका पोहचविणाऱ्यांन विरोधात दंडात्मक कारवाई

    प्रत्येक वॉर्डमध्ये नियुक्त पोलीसांसह दक्षता पथकांव्यतिरिक्त 155 कर्मचा-यांची 31 विशेष दक्षता पथके तैनात

    नागरिकांमध्ये मास्क वापराचे गांभीर्य यावे याकरिता विविध माध्यमांतून जनजागृती

    मिशन ब्रेक द चेन ची अंमलबजावणी करताना बेड्स सह रुग्णालयीन सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ

  • 10 Apr 2021 07:59 AM (IST)

    वसई विरार नालासोपाऱ्यात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी, शहरातील नाकानाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त

    नालासोपारा:- वसई विरार नालासोपाऱ्यात कडक लॉकडाऊनची अमलबजावणी

    -शुक्रवारी रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा

    – शहरातील नाक्या नाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवला

    प्रत्येक वाहनांची तापासनी करण्यात येत आहे

    – अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त नागरिकांनी, आपले वाहन घेऊन घराबाहेर पडू नये असे आवाहन ही करण्यात आले आहे

    – वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येने 37 हजाराचा आकडा पार केला असून काल दिवसभरात 700 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत

    – कोरोनाची साखळी तोडायची असेल तर या कडक लॉकडाऊनला नागरिकांनी ही सहकार्य करने गरजेचे आहे..

  • 10 Apr 2021 07:15 AM (IST)

    विकेंड लॉकडाऊनमध्ये शहरातील वनविभागाच्या टेकड्या वनोद्याने बंद राहणार

    पुणे –

    – लॉकडाऊनमध्ये शहरातील वनविभागाच्या टेकड्या वनोद्याने अशी ठिकाणे या नियमानुसार बंद राहणार आहेत,

    – शुक्रवार संध्याकाळपासून ते सोमवारी सकाळ पर्यंत शहराच्या टेकड्या, गड, वनउद्याने बंद असणार आहे.

    – जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार ते शुक्रवार संध्याकाळ ते सकाळपर्यंत संचारबंदी आहे.

    – या वेळेत वन विभागात फिरता येणार नाही.

    – सोमवारी संचारबंदी संपल्यावर दहा वाजेपर्यंत उद्याने व्यायामासाठी सुरू राहणार आहेत,

    – उपवनसंरक्षक राहुल पाटील यांची माहीती

  • 10 Apr 2021 07:14 AM (IST)

    कोरोना रुग्णांसाठी डे केअर सुरु करा, नागपूर हायकोर्टाचे कोवीड 19 समितीला आदेश

    नागपूर : कोरोना रुग्णांसाठी डे केअर सुरु करा

    – उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे कोवीड 19 समितीला आदेश

    – न्यायालयाने कोवीड 19 समितीला दोन आठवड्याची दिली मुदत

    – नागपुरात कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्याने दिले आदेश

    – न्यायालयाने स्वतःहून दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना दिले आदेश

  • 10 Apr 2021 07:13 AM (IST)

    पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये नव्याने 100 बेड्स उपलब्ध

    पुणे –

    – जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये मध्ये नव्याने 100 बेड्स उपलब्ध,

    – यामध्ये ICU with Ventilator चे 20, ICU Without Ventilator चे 60 आणि Oxygen चे 20 बेड्स आहेत.

    – जम्बो आता पूर्ण क्षमतेने सुरु झाले असून एकूण बेड्स संख्या 700 वर गेली आहे,

    – जम्बो हॉस्पिटल अवघ्या 12 दिवसात फुल्ल झाले होते,

    – महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

  • 10 Apr 2021 07:11 AM (IST)

    नागपुरात विकेंड लॅाकडाऊनची कडक अंमलबजावणी, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद

    नागपुरात विकेंड लॅाकडाऊनची कडक अंमलबजावणी

    – शहरात वेगवेगळ्या भागात ६६ ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी

    – बाहेर फिरणाऱ्या रिकामटेकड्यांवर कारवाई होणार

    – विकेंड लॅाकडाऊनचा विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांवरंही होणार कारवाई

    – अत्यावश्यक सेवा सोडल्यास इतर आस्थापना असणार बंद

  • 10 Apr 2021 06:45 AM (IST)

    राज्यात विकेंड लॉकडाऊन, मुंबईत पोलिसांची ठिकठिकाणी नाकाबंदी

    मुंबईत शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्ण लॉक-डाऊन करण्यात आले आहे.
    या काळात आज रात्रीपासून मुंबईच्या रस्त्यावर पोलिसांची नाकाबंदी करण्यात आली आहे, मुंबई पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. सर्व गाड्या चेक केली जात आहेत. त्या गाड्यामध्ये बसलेल्या लोकांची चौकशी करूनच सोडण्यात येत आहेत.
  • 10 Apr 2021 06:42 AM (IST)

    नागपुरातील कोरोना स्थिती

    नागपुरात काल दिवसभरात 6 हजार 489 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 2 हजार 175 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. काल दिवसभरात 64 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नागपुरात सध्या 49 हजार 347 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नागपुरातील एकूण रुग्णसंख्या 2 लाख 66 हजार 224 वर पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 11 हजार 236 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नागपुरात आतापर्यंत 5 हजार 641 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • 10 Apr 2021 06:40 AM (IST)

    पुण्यातील कोरोना स्थिती

    पुण्यात काल दिवसभरात 5 हजार 647 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 4 हजार 587 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात पुण्यात 51 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यातील 7 रुग्ण पुण्याबाहेरील होते. पुण्यात सध्या 49 हजार 955 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 1 हजार 3 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

    नव्या आकडेवारीसह पुण्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 18 हजार 29 वर पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 62 हजार 420 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 654 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

  • 10 Apr 2021 06:39 AM (IST)

    मुंबईतील कोरोना स्थिती

    मुंबईत काल दिवसभरात 9 हजार 200 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 5 हजार 99 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 28 जणांना काही दीर्घकालीन आजारी होते. मृतांमध्ये 19 पुरुष तर 16 महिलांचा समावेश आहे.

    मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 79 टक्के झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 34 दिवसांवर येऊन ठेपलाय. 2 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान मुंबईतील कोविड वाढीचा दर 2 टक्क्यांवर पोहोचला आहे.

  • 10 Apr 2021 06:37 AM (IST)

    राज्यात कोरोनाचा हाहाकार, कोरोना रुग्णांची संख्या 32 लाखांच्या पार

    महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 58 हजार 993 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 301 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 45 हजार 391 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत.

    राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 32 लाख 88 हजार 540 वर पोहोचली आहे. त्यातील 26 लाख 95 ङजार 148 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 57 हजार 329 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या 5 लाख 34 हजार 603 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Published On - Apr 10,2021 10:30 PM

Follow us
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.