AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात 7 जिल्ह्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, प्रमाण 0.005 टक्के, पण गुणधर्म चिंताजनक – राजेश टोपे

टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेत डेल्टा प्लस प्रकाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कोणत्या प्रकारची काळजी घेत आहे, याची माहिती दिलीय. 15 मे पासून राज्य सरकारने याबाबत कार्यक्रम हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात 7 जिल्ह्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, प्रमाण 0.005 टक्के, पण गुणधर्म चिंताजनक - राजेश टोपे
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 10:17 PM

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकाराने चिंता वाढवली आहे. राज्यातील 7 जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकारातील 21 रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. राज्यात डेल्टा प्लस रुग्णांचं प्रमाण कमी असलं तरी त्याचा संक्रमणाचा दर जास्त असू शकतो, अशी भीती टोपे यांनी यावेळी व्यक्त केलीय. टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेत डेल्टा प्लस प्रकाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कोणत्या प्रकारची काळजी घेत आहे, याची माहिती दिलीय. 15 मे पासून राज्य सरकारने याबाबत कार्यक्रम हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलं. (21 patients of Delta Plus variant of Corona in 7 districts of Maharashtra)

राज्य सरकार दर आठवड्याला प्रत्येक जिल्ह्यातून काही नमुने प्रयोगशाळांना पाठवतो आहोत. आत्तापर्यंत 3 हजार 400 नमुन्यांपैकी 21 केसेसमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. हे प्रमाण 0.005 टक्के आहे. त्यामुळे कोरोनाचा डेल्टा प्लस प्रकाराची गंभीर वाढ अद्याप झालेली नाही. हा काळजी करण्यासारखा विषय नसला तरी त्याचे गुणधर्म गंभीर असल्याचं टोपे यांनी सांगितलं. त्यामुळे डेल्टा प्लस प्रकार आढळलेले 21 रुग्णांचं विलगीकरण आपण करत आहोत. त्यांचं निरीक्षण केलं जात असून, त्यांच्याबाबत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंग सुरु असल्याचंही टोपे यांनी सांगितलं. महत्वाची बाब म्हणजे सुदैवानं डेल्टा प्लसमुळे अद्याप एकही मृत्यू झालेला नाही. केंद्र सरकारला ही माहिती पाठवण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती टोपेंनी पत्रकार परिषदेत दिली.

डेल्टा प्लसपासून बचाव कसा करायचा?

व्हायरस काहीही असो, तो नेहमी त्याची अनुवांशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलते, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याचं रुप बदलत असतो. ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषधं घेतात त्यापासून वाचण्यासाठी विषाणूकडून रुप बदलं जातं. मात्र, आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत, असं तज्ज्ञांचं मत आहे.

नव्या वेरियंटवर लस प्रभावी आहे का?

आपण आतापर्यंत वापरत असलेली लस वेरियंटवर प्रभावी आहे. बर्‍याच वेळा अशा प्रकारे अनुवांशिक बदलांमुळे व्हायरस नष्ट होतात. सार्स कोरोना व्हायरस (Sars Cov 1) अशाप्रकारे संपला होता. म्हणूनच, जेव्हा जेव्हा व्हायरस बदलतो तेव्हा फक्त धोका असतो, असं म्हणता येत नाही. कधीकधी ते खूप कमकुवत देखील होतात आणि त्याचा प्रभाव कमी होतो. नागरिकांनी कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता लस घ्यावी.

संबंधित बातम्या :

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्‍यासाठी BMC सज्ज, प्रत्येक रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग

अमिताभ बच्चन यांच्याकडून शीव रुग्णालयाला 1.75 कोटींची वैद्यकीय यंत्रणा, आत्तापर्यंत अनेक रुग्णांवर प्रभावी उपचार

21 patients of Delta Plus variant of Corona in 7 districts of Maharashtra

लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल.
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल.
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?.
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर...
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर....
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?.