AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लहान मुलांना सांभाळा, दोन्ही फुप्फुसात न्युमोनाईटीस, औरंगाबादेत कोरोनाग्रस्त बालिकेचा मृत्यू

उपचारासाठी दाखल झाल्यानंतर दुर्दैवाने तिसऱ्याच दिवशी तिने अखेरचा श्वास घेतला (Corona Children Aurangabad Girl dies)

लहान मुलांना सांभाळा, दोन्ही फुप्फुसात न्युमोनाईटीस, औरंगाबादेत कोरोनाग्रस्त बालिकेचा मृत्यू
Corona Virus
| Updated on: Apr 19, 2021 | 10:21 AM
Share

औरंगाबाद : औरंगाबादेत लहान मुलांवरील कोरोनाचे संकट गहिरे होताना दिसत आहे. शहरातील आंबेडकरनगर भागात 13 वर्षीय बालिकेचा ‘घाटी’त उपचार सुरु असताना मृत्यू झाला. उपचारासाठी दाखल झाल्यानंतर दुर्दैवाने तिसऱ्याच दिवशी तिने अखेरचा श्वास घेतला. (Corona Effect on Children Aurangabad Girl dies of COVID in GHATI)

कोरोनाची लागण झाल्यामुळे संबंधित बालिकेला 16 एप्रिल रोजी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात भरती होतानाच तिची प्रकृती गंभीर होती. प्रारंभी वार्ड क्रमांक 31 मध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले. त्याच दिवशी तिला अतिदक्षता कक्षात हलवण्यात आले.

उपचारासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र, दुर्दैवाने उपचार सुरु असताना रविवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला. सदर मुलीच्या दोन्ही फुप्फुसात न्युमोनाईटीस आढळला. तिच्या रक्ताच्या गाठी, सेप्टिसिमिया आणि सेप्टिक शॉक यासोबतच तिला कावीळही झाली होती, अशी माहिती घाटीतील डॉक्टरांनी दिली.

मुलांमधील या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

नवी मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉ. सुभाष राव म्हणतात, “कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे उलटत चालली आहे. गेल्या वर्षी, बहुतेक मुलं असिम्प्टमॅटिक होती, म्हणजेच त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसली नव्हती. तर यावर्षी मात्र कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत, प्राथमिक लक्षणं मुलांमध्ये दिसून येत आहेत. संसर्ग लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत पसरत चालला आहे. म्हणूनच जर आपल्याला ही लक्षणे मुलांमध्ये दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

– ताप – सर्दी आणि खोकला – कोरडा खोकला – जुलाब – उलटी होणे – भूक न लागणे – जेवण नीट न जेवणे – थकवा जाणवणे – शरीरावर पुरळ उठणे – श्वास घेताना अडचण जाणवणे

मुलं सुपरस्प्रेडर असू शकतात

डॉ. राव म्हणतात की मुलामध्ये कोविड-19 संसर्गाची लक्षणे (Symptoms of covid-19) दिसल्यास दुसर्‍या दिवशी लगेचच आरटी-पीसीआर चाचणी करा. चाचणी करण्यास उशीर करू नका. उपचार लवकर सुरू करणे महत्वाचे आहे. हे लक्षात ठेवा की मुले सुपरप्रेडर होऊ शकतात, म्हणजेच ते इतर मुलांना आणि प्रौढांना वेगाने संक्रमित करु शकतात.

संबंधित बातम्या :

कोरोनाची दुसरी लाट लहान मुलांसाठी घातक, असे ठेवा मुलांना सुरक्षित

सावधान ! लहान मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण वाढलं, नव्या आकडेवारीमुळे पालकांची चिंता वाढणार

(Corona Effect on Children Aurangabad Girl dies of COVID in GHATI)

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.