कोरोनाच्या संकटात गोंडस मुलीला जन्म, 14 दिवसांच्या उपचारानंतर मायलेकीची भेट

कोरोनाचा संसर्ग झालेला असतानाही एक गोंडस मुलीला जन्म देणाऱ्या कोरोनाबाधित आईने देखील कोरोनाला हरवलं आहे (Corona infected mother cure in Aurangabad).

कोरोनाच्या संकटात गोंडस मुलीला जन्म, 14 दिवसांच्या उपचारानंतर मायलेकीची भेट
जाणून घ्या नवजात बाळाला मालिश कसे करावे !
Follow us
| Updated on: Apr 29, 2020 | 6:48 PM

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग झालेला असतानाही एक गोंडस मुलीला जन्म देणाऱ्या औरंगाबादमधील कोरोनाबाधित आईने देखील कोरोनाला हरवलं आहे (Corona infected mother cure in Aurangabad). 14 दिवसांच्या उपचारानंतर अखेर या आईला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे जन्मापासूनच विलग झालेल्या मायलेकींची तब्बल 12 दिवसांनी भेट झाली. 18 एप्रिलला या कोरोनाबाधित महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. विशेष म्हणजे आई कोरोनाबाधित असतानाही या चिमुरडीला कोरोनाचा संसर्ग झालेला नव्हता.

कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर या महिलेवर 14 दिवस उपचार करण्यात आले. दरम्यान या महिलेची प्रसुतीही झाली. त्यानंतर मागील 12 दिवस या नवजात मुलीचा सांभाळ रुग्णालयातील नर्स आणि डॉक्टरांनीच केला. आता अखेर उपचारानंतर या आईच्या दोन्ही कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले. यानंतर मायलेकींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचा सावटाखाली जन्मलेल्या मुलीला निरोप देण्यासाठी संपूर्ण रुग्णालय लोटलं होतं.

दरम्यान, औरंगाबादच्या या गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर सर्वांचीच धाकधूक वाढली होती. प्रसुतीच्या काही दिवस आधीच या गर्भवतीचे ‘कोरोना’ रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले होते. तिचे 9 महिने भरत आल्यामुळे महिलेच्या कुटुंबासह डॉक्टर-नर्स यांनाही काळजी लागली होती. 18 एप्रिलला घाटी रुग्णालयात या महिलेची डिलेव्हरी झालीत होती. कोरोनाबाधित महिलेने मुलीला जन्म दिला. बाळाला उचलून घेण्यासाठी आई आसुसली होती, मात्र संसर्गाच्या भीतीने माऊलीने आपल्या इच्छेला मुरड घातली.

प्रसुतीनंतर बाळंतीण आणि बाळ यांची प्रकृती सुखरुप होतीच, परंतु आईकडून बाळाला संसर्ग झाला नसेल ना, याची सर्वांना चिंता लागून राहिली होती. नवजात बालिकेचे नमुने स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. कोरोनाबाधित महिलेने बाळाला जन्म देण्याची देशातली ही तिसरी घटना ठरली होती. यानंतर बाळाचे ‘कोरोना’ अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, प्रश्न इथेच संपला नव्हता. कोरोनामुळे या आईला आपल्या नवजात बाळापासून वेगळं राहावं लागणार होतं. आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर चिमुकलीला आईकडे सोपवलं जाणार होतं. अखेर आज तो दिवस आला.

संबंधित बातम्या :

गुड न्यूज! औरंगाबादमध्ये ‘कोरोना’बाधित बाळंतीणीचे नवजात बाळ ‘कोरोना’ निगेटिव्ह

औरंगाबादमध्ये ‘कोरोना’बाधित महिलेच्या अंत्यविधीला शेकडोंची गर्दी!

लोकलमध्ये महिलेला जुळे, एका बाळाचा जन्म सफाळेत, दुसऱ्याचा पालघरमध्ये

Corona infected mother cure in Aurangabad

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.