ब्रेकिंग! महाराष्ट्र पुन्हा मास्कसक्ती होण्याची शक्यता, केंद्राचं महाराष्ट्रासह 5 राज्यांना पत्र, पत्रात काय?

राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती केली जाण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णवाढीनं पुन्हा एकदा डोक वर काढल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झालाय.

ब्रेकिंग! महाराष्ट्र पुन्हा मास्कसक्ती होण्याची शक्यता, केंद्राचं महाराष्ट्रासह 5 राज्यांना पत्र, पत्रात काय?
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 6:54 AM

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती (Mask Compulsion in Maharashtra) केली जाण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णवाढीनं पुन्हा एकदा डोक वर काढल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झालाय. महाराष्ट्रासह (Maharashtra Corona) केंद्रानं पाच राज्यांना पत्र लिहिलंय. दिल्ली, नोएडा, एनसीआर आणि चंदीगड या भागात रुग्णांची संख्या पुन्हा वाढते आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. दिल्ली, नोएडा, एनसीआर आणि चंदीगडमध्ये पॉझिटिव्हिटी रेट (Corona Positivity Rate) 8 टक्क्यांवर गेल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे. सध्याच्या घडीला रुग्ण मोठ्या प्रमाणात जरी आढळून येत नसले, तरिही खबरदारी बाळगण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. कोरोना वाढत असल्यानं पंचसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं जातंय.

दिल्लीत कोरोनाचा वेग

राजधानी दिल्लीमध्ये कोरोना रुग्णवाढीचा वेग काळजी करायला लावणारा आहे. मंगळवारी 24 तासात 632 नवे कोरोना रुग्ण दिल्लीत आढळून आले आहे. तर सोमवारी 501 नव्या रुग्णांची भर पडली होती. त्यामुळे दिल्लीत 26 टक्क्यांनी रुग्ण वाढत असल्याचं दिसून आलं आहे. तसंच संसर्ग वाढण्याचं प्रमाणही चिंताजनक आहे. मागील काही दिवसांत दिल्लीत कोरोना रुग्णवाढ तिप्पट प्रमाणात होत असल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट झालंय. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झाल्याची नोंद दिल्लीत मंगळवारी करण्यात आलेली नाही. तर 414 रुग्ण बरे झाल्याचंही मंगळवारी दिल्लीतील आरोग्य प्रशासनकडून सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्राची आकडेवारी काय?

राज्यातील आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात मंगळवारी (19 एप्रिल) 127 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 7,876,041 इतकी झाली आहे. दरम्यान, तीन दिवसांनंतर राज्यात कोरोनामुळे मंगळवारी तीन रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील कोरोना बळींची संख्या ही 1,47,830 इतकी झाली आहे. सोमवारी (18 एप्रिल) रोजी राज्यात 59 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर 16 एप्रिलला 98 आणि 17 एप्रिलला 127 नव्या रुग्णांचं निदान झालं होतं. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 108 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

मुंबईची आकडेवारी

मुंबई मंगळवारी 85 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर सोमवारी 34 रुग्ण वाढले होते. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुळे मु्ंबईत एकाही रुग्णाचा बळी गेला नव्हता. रुग्णवाढ नियंत्रणात येत असल्यानं राज्य सरकारकडून महाराष्ट्रात कोरोना निर्बंध हटवण्यात आले होते. 2 एप्रिलपासून राज्यातील मास्कसक्तीसह सर्वच निर्बंध हटवण्यात आले. त्यानंतर आता वीस दिवसांतच पुन्हा एकदा देशभरात रुग्णवाढीचं प्रमाण वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं जातंय.

संबंधित बातम्या :

Corona Cases : लहान मुलांना कोरोनाच्या नव्या लाटेचा मोठा धोका, जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात…

ब्रेकिंग! पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढीनं डोकं वर काढलं, गेल्या 24 तासांतली आकडेवारी बघाच

Traditional Medicine : पारंपरिक औषध केंद्र ठरणार गेमचेंजर, अ‍ॅलोपॅथीला टक्कर; WHO चं गुजरातमध्ये सेंटर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.