Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: Maharashtra Omicron Update, राज्यात आज 125 नव्या रुग्णांची नोंद
Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर (Corona Outbreak) सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. राज्यात शुक्रवारी दिवसभरात 43 हजार 211 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 19 जणांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यात 238 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.सर्वाधिक 197 रुग्णांची पुण्यात नोंद झालीय. आतापर्यंत राज्यात 1605 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.859 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे. पुण्याच चोवीस तासात 10 हजार 76 कोरोना रुग्ण आढळले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील ही गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक वाढ असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या 50 हजारांच्यावर गेल्याचं कळतंय. दरम्यान, गुरुवारच्या तुलनेता राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत आणि मृतांच्या संख्येत घट नोंदवण्यात आली आहे.