Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : पुण्यातही खाकीला कोरोनाचा विळखा वाढला, वाचा आजची अपडेटेड आकडेवारी

| Updated on: Jan 16, 2022 | 10:49 PM

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर (Corona Outbreak) सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : पुण्यातही खाकीला कोरोनाचा विळखा वाढला, वाचा आजची अपडेटेड आकडेवारी
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर  सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात आढळून येणाऱ्या कोरोनाचा रुग्णांची  संख्या मागील काही दिवसांपासून 40 हजाराच्या पुढेच आहे. आजही राज्यात 42 हजार 462 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 23 कोरोना रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू (Corona Death) झाला आहे. दिवसभरात 39 हजार 646 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. . तर राज्यातील ओमिक्रॉनबाधितांचा दिवसभरातील आकडा 125 इतका आहे

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Jan 2022 10:22 PM (IST)

    मुंबईला मोठा दिलासा, महाराष्ट्र अजूनही 40 हजार पार, वाचा ताजी आकडेवारी

    गेल्या काही दिवसांपासून राज्यातला कोरोना रुग्णांचा आकडा (Maharashtra corona update) सतत 40 हजारांच्या पुढे आहे. कालच्या तुलनेत आजची राज्यातली कोरोना रुग्णांची आकडेवारी किंचीत घटली असली तरी आजही राज्यात 41 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या चोवीस तासात राज्यात 41 हजार 327 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 40 हजार 386 कोरोना रुग्ण बरे झाल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात आज 29 कोरोना रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे. ओमिक्रॉनची आकडेवारी चांगलीच घटल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात 8 नवे ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. तर एकूण ओमिक्रॉन रुग्णांचा आकडा 1 हजार 738 वर पोहोचला आहे. त्यातले 932 रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत.

  • 16 Jan 2022 07:39 PM (IST)

    पुण्यातही खाकीला कोरोनाचा विळखा

    शहर पोलीस दलातील तब्बल साडे चारशे पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग,

    यामध्ये 47 पोलीस अधिकारी आहेत. दोन पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

    – पोलीसांकडून मास्क कारवाई तसेच वेगवेगळ्या बंदोबस्त तसेच नियम पालन करण्याचे कर्तव्य बजावत असतात,

    – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात रोज कोरोना तपासणी करण्यात येत आहे.

  • 16 Jan 2022 06:58 PM (IST)

    चंद्रपूर : कोरोना अपडेट

    आजचे कोरोना बाधित – 268

    कालचे कोरोना बाधित – 341

    आजचे कोरोनामुक्त – 106

    आजचे बाधित मृत्यू – 00

  • 16 Jan 2022 06:42 PM (IST)

    हिंगोली- जिल्ह्यात तीन महिन्यांनंतर कोरोना रुग्ण संख्येत वाढ 

    आज नव्याने कोरोनाचे 74 रुग्ण

    आतापर्यंत जिल्ह्यात 16 हजार 343 रुग्ण

    त्या पैकी 15 हजार 731 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला

    तर 216 रुग्णांनवर उपचार सुरू

  • 16 Jan 2022 04:40 PM (IST)

    नांदेडमध्ये आज नव्याने 643 कोरोना बाधित

    नांदेड- आज नव्याने 643 कोरोना बाधित आढळले, शहरातील बाधितांची संख्या 364, आज 95 जणांना उपचारानंतर घरी सोडले, 2768 जणांवर उपचार आहेत सुरु.

  • 16 Jan 2022 02:21 PM (IST)

    कोरोना लसीकरणाला 1 वर्ष पूर्ण

    राज्यात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत, 16 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत, महाराष्ट्रात 14 कोटी 30 लाख लोकांना लस देण्यात आलीये…

    राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, 1 मे पासून या वयोगटासाठी लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील 4 कोटी 75 लाख लोकांना त्यांचा पहिला लसीचा डोस मिळाला आणि 3 कोटी 12 लाख लोकांना त्यांचा दुसरा डोस मिळाला…

  • 16 Jan 2022 12:10 PM (IST)

    शाळा सुरु करण्याबाबत पालकांमध्ये दोन मतप्रवाह

    राजेश टोपे

    शाळा सुरु करण्याबाबत दोन मतप्रवाह

    कॅबिनेट मध्ये चर्चा झाली

    पालकांमध्येही दोन मतप्रवाह

    शाळा बंद ठेवा असही काही पालक म्हणतात, काही पालक शाळा सुरु करा म्हणतात

    15 दिवसानंतर शाळा सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेऊ

    कोरोना लस घेतल्यास दवाखान्यात जावं लागणार नाही

    कोरोना लसीकरण ऐच्छिक असल्यानं गती मंदावली आहे.

  • 16 Jan 2022 12:06 PM (IST)

    राज्यात 90 टक्के लसीकरण पूर्ण : राजेश टोपे

    राजेश टोपे लाईव्ह

    कोरोना लसीकरणाला एक वर्ष पूर्ण

    राहिलेलं लसीकरण पूर्ण करावं, राज्यातील जनेतला आवाहन

    सध्या कोरोनाबाधित असणारे लोक 86  टक्के लोक कोरोनाबाधित आहेत

    सध्या लोकांमध्ये सौम्य लक्षणं आहेत.

    15 ते 18 लसीकरणासाठी कोवॅक्सिन द्यायची आहे

    महिनाभराच्या स्टॉकसाठी केंद्राकडे लस मागितली आहे.

    केंद्र सरकार कोरोना लस देत नाही, असं म्हटलेलं नाही

    दररोज 8 लाख लोकांना लस देत आहोत

    पुढे लस संपली अस होऊ नये म्हणून केंद्राकडे लस मागितली

    ज्या जिल्ह्यात राज्याच्या सरासरीपेक्षा लसीकरण कमी झालंय तिथं पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या आहेत

  • 16 Jan 2022 10:35 AM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 221 नवीन रुग्णांची नोंद

    नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 221 नवीन रुग्णांची नोंद….

    19 वर्षीय तरुणीचा कोविड मुळे मृत्यू

    खाजगी दवाखान्यात उपचारा दरम्यान मृत्यू

  • 16 Jan 2022 10:10 AM (IST)

    भारतात गेल्या 24 तासात 2,71,202 नवे कोरोना रुग्ण

    भारतात गेल्या 24 तासात 2,71,202 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. 1,38,331 जण कोरोनामुक्त झाले असून 314 जणांच्या मृत्यूची नोंद झालीय.

  • 16 Jan 2022 08:51 AM (IST)

    चेन्नई शहरात आज कडकडीत लॉकडाऊन

    तामिळनाडू

    चेन्नई शहरात आज कडकडीत लॉकडाऊन

    पहिल्या वेळच्या लाटेप्रमाणे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन

    तामिळनाडू राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारचा निर्णय

    केरळ आणि कर्नाटक राज्यातील अनेक शहरांमध्ये आज विकेंड कर्फ्यू

  • 16 Jan 2022 08:14 AM (IST)

    पिंपरी-चिंचवड शहरात लस घेतलेल्यांनाही कोरोनाची लागण

    -पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांनाही कोरोनाची लागण झालीय

    -शहरातील पहिला डोस घेतलेल्या 5549 तर दुसरा डोस घेतलेल्या 3381 जणांना कोरोनाची लागण,लस घेणा-यांना लागण होण्याचे प्रमाण खूप कमी आहे

    -आजपर्यंत शहरातील 31 लाख 47 हजार 46 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलीय

  • 16 Jan 2022 07:24 AM (IST)

    नवी मुंबईत दररोज 2 हजार कोरोना रुग्णांची नोंद

    नवी मुंबईत सध्या दररोज जवळपास दोन हजार कोरोना रुग्‍णांची नोंद होत असून उपचाराधीन रुग्ण 17 हजारांच्या घरात गेले आहेत.

    यापैकी 60 टक्के म्हणजे दहा हजार रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत.

  • 16 Jan 2022 07:10 AM (IST)

    नागपूरच्या मनोरुग्णालयात ही कोरोनाचा शिरकाव

    नागपूरच्या मनोरुग्णालयात ही कोरोनाचा शिरकाव

    10 महिलांना झाली लागण, बधितांना करण्यात आलं क्वारंटाईन

    काहींना सौम्य तर काहींना लक्षण नाही

    मात्र स्वतःच भान राहत नसल्याना कोरोनाची लागण झाल्याने वाढली चिंता

  • 16 Jan 2022 06:42 AM (IST)

    नाशिकमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण दिलासादायक

    – नाशिकमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण दिलासादायक – 95.26% रुग्ण बरे होण्याचं प्रमाण – शहरात सद्या 7 हजार 875 रुग्ण ऍक्टिव्ह – घरी उपचार घेणाऱ्यांचं प्रमाण ही अधिक – रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अधिक असल्याने आरोग्य विभागाला काहीसा दिलासा

  • 16 Jan 2022 06:41 AM (IST)

    सलग तिसऱ्या दिवशी पुणे शहरात पाच हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण

    सलग तिसऱ्या दिवशी पुणे शहरात पाच हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले

    तब्बल 5 हजार 705 पॉजिटिव्ह रुग्णांची वाढ

    14 जानेवारीच्या तुलनेत आज शहरातील रुग्णसंख्या तर वाढीबरोबर पॉझिटिव्ह रेटही विक्रमी वाढला

    शहरातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट 29 टक्के

    पुणे शहरात 204 कोरोना रुग्णांना ॲाक्सिजनवर उपचार सुरू

    तर इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 22 आणि नॉन इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 22 रुग्ण

  • 16 Jan 2022 06:18 AM (IST)

    नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच

    – नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच – गेल्या 24 तासात जिल्ह्यात 1989 रुग्णांची नोंद – तर सर्वाधिक 1491 रुग्ण आढळले शहरात – दिवसागणिक वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य विभाग चिंतेत – आरोग्य विभागाकडून सर्वाना नियम पाळण्याच आवाहन

  • 16 Jan 2022 06:12 AM (IST)

    राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित कोरोना पॉझिटिव्ह

    बीड: राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित कोरोना पॉझिटिव्ह

    अमरसिंह यांच्यासह बंधू जयसिंह पंडित ही पॉझिटिव्ह

    दोघा भावंडांत कोरोनाचे सौम्य लक्षणे

    संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी चाचणी करण्याचे आवाहन

    दोघांवरही घरीच उपचार सुरू

Published On - Jan 16,2022 6:04 AM

Follow us
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...