AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : भारतात 1 लाख 61 हजार 386 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

| Updated on: Feb 03, 2022 | 6:07 AM

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचं समोर आलं आहे.

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : भारतात 1 लाख 61 हजार 386 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
कोरोना चाचणी

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात आढळून येणाऱ्या कोरोनाचा रुग्णांची संख्या 40 हजारांच्या खाली आली आहे. मंगळवारी राज्यात 14 हजार 372 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 94 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 30 हजार 93 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 91 हजार 524 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 77 लाख 35 हजार 481 वर गेलीय तर आतापर्यंत 73 लाख 35 हजार 481 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 3221 वर पोहोचली आहे. तर,1689 जण ओमिक्रॉन संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

PIB महाराष्ट्रचे ट्विट

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 Feb 2022 11:11 AM (IST)

    शिक्षकांना कोरोना नंदुरबारमध्ये 20 शाळा बंद

    24 जानेवारीपासून नंदुरबार जिल्ह्यातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू झाल्यात शाळा सुरू झाल्यानंतर तब्बल 70 हजार विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्या आठवड्यात दांडी मारल्याचे समोर आलाय तर 89 शिक्षकांना कोरोणाची बाधा झाल्याने 20शाळा बंद करण्यात आल्या आहेत तर 21 हजार विद्यार्थ्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.

  • 02 Feb 2022 10:19 AM (IST)

    भारतात 1 लाख 61 हजार 386 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    भारतात 1 लाख 61 हजार 386 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर देशात 16 लाख 21 हजार 603 सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

  • 02 Feb 2022 08:08 AM (IST)

    नाशिकमध्ये गेल्या 24 तासात  6 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद

    – नाशिकमध्ये गेल्या 24 तासात  6 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद –  1486 रुग्ण कोरोना बाधित आढळून आल्याने पुन्हा आरोग्य विभाग चिंतेत – मृत्यूचा आकडा वाढल्याने सर्वांचीच धाकधूक वाढली

  • 02 Feb 2022 07:06 AM (IST)

    कोरोना लसीकरणासंदर्भात नागपूरमध्ये धक्कादायक वास्तव

    धक्कादायक, नागपूर जिल्हयात पाच लाख लोकांनी घेतला नाही लसीचा दुसरा डोज

    – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मृत्यू झालेल्या 90 टक्के लोकांचे लसीकरण नाही

    – लस न घेतलेल्यांसाठी तिसरी लाट धोकादायक

    – लस घेण्याचं नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

    – नागपूर जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील 60टक्के लसीकरण पूर्ण

  • 02 Feb 2022 06:14 AM (IST)

    मंगळवारी राज्यात 14 हजार 372 नवे कोरोना रुग्ण

    मंगळवारी राज्यात 14 हजार 372 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 94 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 30 हजार 93 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 91 हजार 524 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 77 लाख 35 हजार 481 वर गेलीय तर आतापर्यंत 73 लाख 35 हजार 481 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 3221 वर पोहोचली आहे. तर,1689 जण ओमिक्रॉन संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

Published On - Feb 02,2022 6:11 AM

Follow us
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम.
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान.