Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : कोरोनाच्या ब्रेकनंतर शाळांची घंटा वाजली, कुठे कधी सुरू? वेगवान अपडेट

| Updated on: Jan 20, 2022 | 10:52 PM

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर (Corona Outbreak) सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : कोरोनाच्या ब्रेकनंतर शाळांची घंटा वाजली, कुठे कधी सुरू? वेगवान अपडेट
Corona testing

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात आढळून येणाऱ्या कोरोनाचा रुग्णांची संख्या पुन्हा 40 हजारांच्या वर गेली आहे. बुधवारी राज्यात 43 हजार 697 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 49 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 46 हजार 591 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 69 लाख 25 हजार 825 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, राज्यात बुधवारी ओमिक्रॉनच्या 214 रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण पुण्यातील आहेत. पुण्यात 158, मुंबईतील 31 रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 2074 वर पोहोचली आहे. तर, 1091 जण ओमिक्रॉन संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Jan 2022 09:53 PM (IST)

    सावधान, पुन्हा राज्याची चिंता वाढली

    आज राज्यात पुन्हा 46 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आल्याने पु्न्हा चिंता वाढली आहे. 46 हजार 197 नवे कोरोना रुग्ण वाढल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या 24 तासात 37 कोरोना रुग्णांच्या मृत्युचीही नोंद झाली आहे.

  • 20 Jan 2022 07:24 PM (IST)

    कोरोनाने नागपूरची चिंता पुन्हा वाढवली

    नागपूर जिल्हयात गेल्या 24 तासांत4428 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    – दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदा 4428 रुग्णसंख्येची नोंद

    – 24 तासांत जिल्ह्यात सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    – कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली

  • 20 Jan 2022 06:39 PM (IST)

    आरोग्यमंत्री राजेश टोपे लाईव्ह

    मुलांचे 50 टक्के लसीकरण झाले आहे, त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    अमोल कोल्हे सकाळी दोन तास माझ्यासोबत बोलत होते, त्यावेळी त्यांनी रोलबाबत सांगितले

    अमोल कोल्हेंची ओळख लोकप्रिय, गुणी कलावंत

    अमोल कोल्हेंकडे अभिनेता म्हणून पाहिलं पाहिजे, असे आवाहन मी जनतेला करेल

    कलेची पाठराखण केली पाहिजे

  • 20 Jan 2022 06:26 PM (IST)

    अकोला कोरोना अपडेट

    अकोल्यात आजच्या अहवालात 469 रुग्ण पॉझिटिव्ह

  • 20 Jan 2022 06:25 PM (IST)

    यवतमाळ कोरोना अपडेट

    यवतमाळ- आज कोरोनाचा आलेख वाढला एकाच दिवशी तब्बल 358 रुग्ण पॉझिटिव्ह

    ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण संख्या पोहचली 1091 वर

  • 20 Jan 2022 06:08 PM (IST)

    पुण्यात आजही धडकी भरवणारी कोरोनावाढ

    20 जानेवारी दिवसभरात 7264 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात रुग्णांना 4575 डिस्चार्ज. – पुणे शहरात करोनाबाधीत ०7 रुग्णांचा मृत्यू.

  • 20 Jan 2022 05:38 PM (IST)

    मुंबईचे पालकमंत्री काय म्हणाले?

    अस्लम शेख

    शाळा सुरू करण्याचा निर्णय योग्यच

    मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक

    शाळेत, कॉलेजात लसीकरणाचे कॅम्प असणार आहेत, त्याद्वारे लसीकरण होणार आहे

    अमोल कोल्हे हे कलाकार आहेत..

    त्यांनी कुठला रोल केला तर ते राजकारणाची तुलना करणे योग्य नाही..

    कलाकाराला पैसा आणि रोल इतकाच संबंध असतो..

    महा आघाडी 80 टक्के विजयी झाली आहे…

    भाजप ला 20 टक्केच विजय मिळाला आहे..

    आमच्यात कोण पुढे आहे हे महत्वाचे नाही..

    पण सगळ्यांना सोबत घेऊन सरकार चालेल…

  • 20 Jan 2022 05:02 PM (IST)

    पुण्यातील शाळांचा निर्णय अजित पवारांच्या बैठकीत घेतला जाणार

    पुण्यातील शाळांचा निर्णय अजित पवारांच्या बैठकीत घेतला जाणार,

    पालक , डॉक्टर, टास्क फोर्स यांची मतं विचारात घेतली जाणार

    आठवड्यापासून पुण्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढतीये

    या सगळ्यांचा विचार करूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय

    महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती …

  • 20 Jan 2022 02:56 PM (IST)

    राजेश टोपे काय म्हणाले?

    आयसोलेशन, ऑक्सिजन बेड हे सरासरीपेक्षा 4 ते 5 टक्केच भरलेले आहेत

    87 टक्के हे घरीच क्वारंटाईन आहेत

    50 हजार रुपये मृतांच्या नातेवाईकांना देत आहोत यात मृतांचा आकडा आणि claims चा आकडा यात फरक आहे ज्याला मदत गेली पाहिजे ती मिळायलाच हवी त्यात गफलत होऊन चालणार नाही

  • 20 Jan 2022 01:47 PM (IST)

    रायगड नाशिक भागामध्ये पॉझिटिव्हीटी रेट जास्त : राजेश टोपे

    राजेश टोपे

    टेस्टिंग कमी होते असं नाही दिवसाला लाख दीड लाख टेस्टिंग केला जात आहे रायगड नाशिक भागामध्ये पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे पन्नास हजाराच्या मदतीबाबत जवळपास एक लाख लोकांना मदत आतापर्यंत देण्यात आलेली आहे हे जे अर्ज येत आहेत त्यांची चांगल्या पद्धतीने तपासणी करूनच मग मदत दिली जात आहेत

  • 20 Jan 2022 11:15 AM (IST)

    सिरोंचा नगरपंचायत निवडणूक निकाल, राष्ट्रवादीचा पाच जागांवर विजय

    सिरोंचा नगरपंचायत एकूण जागा 08 /17 भाजपा -00 शिवसेना-01

    काँग्रेस- 00

    राष्ट्रवादी -05 अपक्ष -0 स्थानिक पक्ष असलेल्या आदिवासी विद्यार्थी संघटनेचे 06 नगरसेवक विजयी

  • 20 Jan 2022 09:29 AM (IST)

    देशात नव्या तीन लाख कोरोना रुग्णांची नोंद

    कोरोना रुग्णांच्या संख्येनं तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात गेल्या 24 तासात 3 लाख 17 हजार 532 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, देशात 491 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 2 लाख 23 हजार 990 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

  • 20 Jan 2022 06:46 AM (IST)

    मुंबईत कोरोना चाचण्यांची संख्या घटली

    मुंबईत दैनंदिन रुग्णवाढीचे प्रमाण जसजसे कमी होऊ लागले तसतसे चाचण्यांमध्येही मोठय़ा प्रमाणात घट होऊ लागली आहे.

    तिसऱ्या लाटेने उच्चांक गाठला त्यावेळी मुंबईत दैनंदिन चाचण्यांची संख्या ही 68 ते 70 हजारांवर गेली होती.

    परंतु आता हे प्रमाण थेट 47 हजारांपर्यंत खाली आले आहे.

  • 20 Jan 2022 06:17 AM (IST)

    Maharashtra Omicron update : राज्यात ओमिक्रॉनचे 214 नवे रुग्ण

    बुधवारी राज्यात 43 हजार 697 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 49 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 46 हजार 591 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 69 लाख 25 हजार 825 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, राज्यात बुधवारी ओमिक्रॉनच्या 214 रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण पुण्यातील आहेत. पुण्यात 158, मुंबईतील 31 रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 2074 वर पोहोचली आहे. तर, 1091 जण ओमिक्रॉन संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

Published On - Jan 20,2022 6:15 AM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.