नागपुरात वाढता कोरोनाचा संसर्ग, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

नागपुरात आठवड्याभरापासून कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे नागपूर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. | Nagpur Palika Decision

नागपुरात वाढता कोरोनाचा संसर्ग, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
नागपूर महापालिका
Follow us
| Updated on: Feb 13, 2021 | 8:14 AM

नागपूर :  राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं दिसत असलं तरी नागपूर आणि अमरावती विभाला अद्यापही धोका कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. नागपुरात (nagpur Corona patient) तर गेल्या आठवड्यापासून कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे नागपूर प्रशासनाने (nagpur Palika) मोठा निर्णय घेतला आहे. (Corona patient increasing Day By Day nagpur palika take A big Decision)

शारजावरुन येणारे विमानप्रवासी (Sharjah Flight) पुढचे सात दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय नागपूर पालिका प्रशासनाने घेतला आहे. जे प्रवासी शारजावरुन नागपूर विमानतळावर उतरतील त्यांना संस्थात्मक विलीगीकरणाचे आदेश नागपूर मनपाकडून जारी करण्यात आलेले आहेत.

येत्या 14, 21 आणि 28 तारखेला शारजावरुन नागपुरात विमान येणार आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नागपूर प्रशासनाने प्रवाशांसाठी संस्थात्मक विलीगीकरणाचे आदेश जारी केलेले आहेत. विमानतळावरुन प्रवाशांना थेट हॉटेलमध्ये पाठवणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे.

नागपुरात कोरोना रुग्णसंख्येचा ब्लास्ट

नागपूर शहरात कोरोना रुग्णसंख्येचा ब्लास्ट झालेला पाहायला मिळतोय. गेल्या पाच दिवसांत 1717 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेली पाहायला मिळतीय. ही वाढ गेल्या 2 महिन्यांतील सर्वाधिक वाढ आहे. राज्यातील कोरोनाचे आकडे कमी होत असताना नागपुरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही बाब प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे.

मनपा मुख्यालयातच कोरोना नियमांची ऐशीतैशी

नागपूरच्या मनपा मुख्यालयातच कोरोनाच्या नियामांचं पालन होताना दिसून येत नाहीय. मनपा मुख्यालयातले कर्मचारी विनामास्क वावरताना दिसून येत आहेत. तसंच धक्कादायक बाब म्हणजे पालिका आयुक्तांच्या केबीनबाहेर विनामास्क कर्मचारी दिसून येतात. या निमित्ताने शहरात विनामास्कची कारवाई करणाऱ्या मनपाच्या दिव्याखाली अंधार असल्याचं बोललं जातंय. या सगळ्या प्रकारावर मनपाचे विधी सभापती धर्मपाल मेश्राम यांनी कारवाईची मागणी केली आहे.

नागपुरात वाढती रुग्णसंख्या, मुख्यमंत्री अलर्ट

महाराष्ट्राने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाच्या नविन रुग्ण संख्येचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र मुंबईतला काही भाग, नागपूर, वर्धा या सारख्या भागात रुग्णसंख्येचे प्रमाण का वाढत आहे? याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. राज्यात आरोग्य सुविधेत कमतरता नाही, तरीही नागपूर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी आपल्या विभागातील यंत्रणा अधिक सतर्क कराव्या अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहे.

(Corona patient increasing Day By Day nagpur palika take A big Decision)

हे ही वाचा :

मंत्री संजय राठोड बोलणार की नाही? मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष, भाजपानं दबाव वाढवला!

मंत्री संजय राठोड प्रकरणी जयंत पाटील म्हणतात, ‘एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याची लगेच व्यवस्था होते!’

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.