Covid Tension: राज्यात ‘या’ सहा जिल्ह्यांत वाढतायेत कोरोनाचे रुग्ण, केंद्र सरकारने दिला राज्याला इशारा, पाहा तुमचा जिल्हा यात आहे का?
केंद्रीय आयोग्य सचिवांनी राज्याच्या आरोग्य खात्याच्या सचिवांना पत्र पाठवले असून, वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रणाची उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात सहा जिल्ह्यांमध्ये (six district in state)गंभीर परिस्थिती असल्याचे केंद्राने नमूद केले आहे.
मुंबई– कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर, आता पुन्हा एकदा कोरोनाने (Covid19)उचल खाल्ली आहे. राज्यात आणि देशात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या सगळ्यांसाठीच डोकेदुखीचा विषय ठरला आहे. केंद्र सरकार याबाबत (Center government)सतर्क झाले आहे. देशातील पाच राज्यांत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यात महाराष्ट्रासह. तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. राज्यात एका हजारांहून अधिक रुग्णसंख्या समोर येत असल्याने केंद्र सरकार चिंतीत आहे. या प्रकरणी केंद्रीय आयोग्य सचिवांनी राज्याच्या आरोग्य खात्याच्या सचिवांना पत्र पाठवले असून, वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रणाची उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात सहा जिल्ह्यांमध्ये (six district in state)गंभीर परिस्थिती असल्याचे केंद्राने नमूद केले आहे.
राज्यातील कोणत्या सहा जिल्ह्यात गंभीर स्थिती
आरोग्य सचिव राजेश भूषण यांना केंद्रीय आरोग्य सचिवांचे पत्र आले आहे. यात राज्यातील ६ जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे सांगितले आहेत. त्यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांच्या नावाचा समावेश आहे. या जिल्ह्यांत उपाययोजना आणि लसीकरण वाढवण्यावर भर द्यावे असा सल्ला देण्यात आला आहे. पुण्यात नुकताच कोरोनाचा नवा व्हेरिएंटही सापडला आहे, त्याकडेही लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात सात पटीने वाढ, मुख्यमंत्रीही चिंतेत
गेल्या महिनाभरात कोरोनाची रुग्णसंख्या सात पटीने वाढली आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे, गुरुवारी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही टास्क फोर्सची बैठक घेत राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला आहे. मास्क वापरण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले असून, परिस्थितीत बदल झाला नाही तर येत्या १५ दिवसांत कठोपर निर्णय घेणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. राज्यात येत्या काही दिवसांत पुन्हा मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात येईल, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दिले आहेत.
मुंबई आणि उपनगरांकडे विशेष लक्ष
मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. फएब्रुवारीनंतर पहिल्यांदाच बुधवारी आणि गुरुवारी दैनंदिन कोरोनाची रुग्णसंख्या १ हजाराच्या पार पोहचली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून दररोज सातशे ते आठशे नवे रुग्ण आढळत आहेत. सध्या जनताही कोणत्याही नियमांविना, मास्कविना रस्त्यांवर. रेल्वेतून प्रवास करीत आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी रुग्णसंख्या सापडण्याची शक्यता आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतही रुग्णसंख्या वाढताना दिसते आहे. या जिल्ह्यांतील अनेकजण नोकरीसाठी मुंबई शहरात येतात, त्यामुळे येत्या काही काळात कोरोनाचा संस्रग अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे मुंबईकरांनी काळजी बाळगावी असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.