Corona : महाराष्ट्रात वाढले कोरोनाचे रुग्ण, DCM देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

maharashtra corona update: देशात सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. जगात वेगाने पसरत असलेल्या जेएन १ व्हेरिएंटचे रुग्ण महाराष्ट्रात आढळल्याने चिंता वाढल्या आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पाहा.

Corona : महाराष्ट्रात वाढले कोरोनाचे रुग्ण, DCM देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
fadnavis
Follow us
| Updated on: Dec 25, 2023 | 5:25 PM

Corona update : देशात गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कारण देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही वाढतच चालली आहे. कोरोनाच्या JN.1 या नव्या व्हेरिएंटचे प्रकरणे वाढत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. 24 डिसेंबरपर्यंत देशात कोरोनाच्या JN.1 प्रकाराची एकूण 63 प्रकरणे समोर आली आहेत. सर्वाधिक 34 प्रकरणे गोव्यात, 9 महाराष्ट्रात, 8 कर्नाटक, 6 केरळ, 4 तामिळनाडू आणि 2 तेलंगणात आढळून आली आहेत.

या राज्यांमध्ये झपाट्याने वाढ

केरळमध्ये 128 नवीन कोरोना प्रकरणे गेल्या 24 तासात आढळले असून एका मृत्यूची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, केरळमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 3,128 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रातही रुग्णांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रात 50 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली, त्यापैकी JN.1 प्रकारातील नऊ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ज्यामुळे राज्यातील नवीन प्रकाराची एकूण प्रकरणे 10 झाली. या 10 प्रकरणांपैकी पाच ठाण्यात, दोन पुण्यात आणि प्रत्येकी एक सिंधुदुर्ग, अकोला आणि पुणे ग्रामीण जिल्ह्यांतील आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, NITI आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, भारतातील वैज्ञानिक नवीन कोविड व्हेरिएंटची बारकाईने तपासणी करत आहे.  राज्यांनी चाचणी वाढवणे आणि त्यांची पाळत ठेवणारी यंत्रणा मजबूत करणे आवश्यक आहे. प्रकरणांची संख्या वाढत असले तरी सध्या चिंतेचे कारण नाही. एकूण रुग्णांपैकी 92 टक्के लोक घरी बरे होत आहेत.

पॅनिक होण्याची गरज नाही – फडणवीस

कोरोनाची पॅनिक होण्यासारखी परिस्थिती नाहीये, मात्र काळजी घेण्याची गरज आहे. या सगळ्या परिस्थितीकडे आम्ही लक्ष देऊन आहोत. मुख्यमंत्र्यांनीही बैठक घेऊन अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. मात्र आपण अपेक्षा करू की त्याचा फार प्रादुर्भाव वाढणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.