Corona Update : 25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची परवानगी द्या, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे विनंती

२५ वर्षापुढील सर्वाना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे.

Corona Update : 25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची परवानगी द्या, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे विनंती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 10:17 PM

मुंबई : कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचवणे आवश्यक आहे. त्यामुळे २५ वर्षापुढील सर्वाना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. मध्यंतरी देशातील मुख्यमंत्र्यांसमवेतच्या एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये 45 वर्षापुढील सर्वाना लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती. आजच्या या पत्रात मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी धन्यवाद देऊन लसीकरण वयोगट आणखी कमी करण्याची विनंती केली आहे. लसींचे वाढीव डोस महाराष्ट्राला मिळावेत असेही या पत्रात मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. (Uddhav Thackeray’s letter to Narendra Modi, request to allow corona vaccination to young people above 25 years)

तरुण वर्गाला लस गरजेची

मोठ्या संख्येने तरुण वर्ग विशेषत: जो घराबाहेर कामाला जातो त्याला लस मिळाल्यास रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल असं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटलंय. कोरोना परिस्थितीसंदर्भात महाराष्ट्र सरकार ठोस पावलं उचलत आहे. याविषयी मुख्यमंत्री पत्रात म्हणतात की, राज्याने नेहमीच अतिशय पारदर्शकपणे कोरोनाविषयक माहिती मांडली आहे. चाचण्याचा वेगही प्रयत्नपूर्वक वाढवला आहे. प्रत्येक कोरोना रुग्ण बरा झालाच पाहिजे या निर्धाराने आम्ही उपाययोजना करीत आहोत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक हानिकारक असलेल्या विषाणूला रोखण्यासाठी आम्ही ब्रेक दि चेन या मोहिमेच्या माध्यमातून काही कडक निर्बंध लावले आहेत. मात्र यात जीवनावश्यक वस्तू व सेवा, उत्पादन क्षेत्र, वाहतूक सुरूच राहील आणि कोविडसाठी आरोग्याचे नियम सर्वजण पाळतील अशी कार्य पद्धती ठरवली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

कोविड लसीकरणास राज्याने अतिशय गांभीर्याने घेतले असून काल 4 एप्रिल रोजीपर्यंत 76.86 लाख जणांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. 3 एप्रिल रोजी तर आम्ही राज्यात सर्वाधिक म्हणजे 4.62 लाख जणांना लस दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.

दीड कोटी डोस मिळावेत

लसीकरण वेग वाढविण्याचा महाराष्ट्राचा प्रयत्न आहेच पण त्यासाठी केंद्राने जादा डोस द्यावेत अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या सर्वाधिक संसर्ग असलेल्या 6 जिल्ह्यांसाठी केवळ 3 आठवड्यात 45 वर्षापुढील सर्वाना लस देण्याची आमची तयारी आहे , याकरिता दीड कोटी डोस मिळावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केलीय.

केंद्र सरकारच्या सहाय्याने आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नाने या संसर्गाच्या लाटेवर मात करता येणे शक्य होईल असे सांगून मुख्यमंत्र्यांनी आधी जीवन, मग उपजीविका अशा प्राधान्याने आणि विज्ञानाच्या उपयोगाने देशाला एका नव्या सामान्य परिस्थितीत आणता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update : रुग्णसंख्येत काहीशी घट, चिंता मात्र कायम! दिवसभरात 47 हजार 288 नवे कोरोना रुग्ण

Maharashtra Lockdown | दुकान, मॉल ते धार्मिक स्थळं, लग्नाचा हॉल, महाराष्ट्रातील निर्बंधांची ‘ए टू झेड’ नियमावली

Uddhav Thackeray’s letter to Narendra Modi, request to allow corona vaccination to young people above 25 years

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.