Corona Update : पुन्हा धाबे दणाणले! मुंबईसह उपनगरांना कोरोनाचा विळखा वाढला, आजची आकडेवारी टेन्शन वाढवणारी

एकट्या मुंबईत 1765 नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याने पुन्हा प्रशासनाला धडकी भरली आहे. आता निर्बंध टाळायचे असतील तर नियम पाळल्याशिवाय गत्यंतर नाही अशी स्थिती पुन्हा निर्माण होतोना दिसत आहे. तर मुंबईसह उपनगरांचाही धोका वाढला आहे.

Corona Update : पुन्हा धाबे दणाणले! मुंबईसह उपनगरांना कोरोनाचा विळखा वाढला, आजची आकडेवारी टेन्शन वाढवणारी
सावधान! पुन्हा कोरोनाचा कहरImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 7:03 PM

मुंबई : राज्यात पुन्हा कोरोनाने (Corona Update) डोकं वर काढल्याने पुन्हा प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. आजची कोरोनाची आकडेवारी (Today Corona Update)ही आणकी टेन्शन वाढवणारी आहे. आज राज्यात 2701 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एकट्या मुंबईत 1765 नवे कोरोना रुग्ण (Mumbai Corona Update) आढळून आल्याने पुन्हा प्रशासनाला धडकी भरली आहे. आता निर्बंध टाळायचे असतील तर नियम पाळल्याशिवाय गत्यंतर नाही अशी स्थिती पुन्हा निर्माण होतोना दिसत आहे. तर मुंबईसह उपनगरांचाही धोका वाढला आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या घटल्याने थोडा दिलासा मिळाला होता. दोन वर्षांनंतर लोकांच्या तोंडावरचे मास्क उतरवण्याची मुभा मिळाली होती. पुन्हा जग मोकळा श्वास घेऊ लागलं होतं. मात्र आता पुन्हा मास्क सक्तीही होण्याची शक्यता आहे. तसे संकेतही काही नेत्यांकडून देण्यात आले आहेत. राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मत्ृयचूी नोंद झालेली नाही, ही थोडी दिलासादायक बाब आहे.

मुंबई महापालिकेकडून जनजागृती

मुंबईतली रुग्णवाढ रोखण्याचं आव्हान

नव्या कोरोना रुग्णात सर्वात जास्त रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. एकट्या मुंबईतच साडे सतराशेपेक्षाही जास्त रुग्ण वाढल्याने पुन्हा मुंबई महाविकास आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. तिसऱ्या लाटेवेळीही मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढ सुरूवातीला अशीच होती. मात्र काही दिवसातच मुंबई महापालिकेने या रुग्णवाढीला यशस्वीरित्या लगाम लावला होता. त्यामुळे तिसरी लाट फार काही नुकसान करू शकली नाही. तसेच कोरोनाकाळातल्या गाजलेल्या मुंबई पॅटर्नला पुन्हा एकदा प्रभावीपणे राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसात सर्व सुरळीत झाल्याने पुन्हा सार्वजनिक ठिकाणची गर्दी वाढली आहे. प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही काही लोक नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.

उपनागरातील कोरोना रुग्ण वाढले

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत चालली आहे. कल्याण डोंबवली महापालिकेच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात 30 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आता आत्तापर्यंत 119 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढत असल्याने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढत चालली आहे. त्यामुळे उपनगरेही सध्या अलर्ट मोडवर आहेत.

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.