जळगावात दोन कोरोना संशंयित रुग्णाचा मृत्यू, दोन्ही रुग्णांचा स्वॅब रिपोर्ट येणे बाकी
जळगावमध्ये दोन कोरोना संशंयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जळगावात एकच खळबळ उडाली (Jalgaon two Corona Suspect died) आहे.
जळगाव : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत (Jalgaon two Corona Suspect died) आहेत. तर दुसरीकडे कोरोनाबाधित मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नुकतंच जळगावमध्ये दोन कोरोना संशंयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही रुग्णांचे कोरोना चाचणीचे तपासणी अहवाल येणे बाकी आहे. या अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.
जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना (Jalgaon two Corona Suspect died) विशेष कक्षात असलेल्या दोन संशंयित रुग्णांचा शनिवारी (4 एप्रिल) मृत्यू झाला. यात खोटेनगर परिसरात राहणाऱ्या एका 65 वर्षीय महिलेचा आणि वाल्मिकनगरमधील 33 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. या दोन्ही रुग्णांचा स्वॅब रिपोर्ट येणे बाकी आहे. याबाबत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनीही दोघांच्या मृत्यूबाबत दुजोरा दिला आहे.
दरम्यान, या दोन्ही रुग्णांचे कोरोना चाचणीचे अहवाल जर पॉझिटिव्ह आले तर जळगावात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3 होईल. तसेच नुकतंच मृत्यू झालेल्या दोन्ही व्यक्तींच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
यापूर्वीही जळगावात एका 63 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तो व्यक्ती शहरातील सालार नगरातील रहिवासी होता.
कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?
- मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च
- मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च *मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
- मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च
- मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च
- नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
- मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
- बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
- मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
- पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
- मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
- मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च
- पालघर – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
- मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
- मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
- मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
- मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
- मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
- जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल
- मुंबई – 61 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
- मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
- मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
- मुंबई – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
- पुणे : 50 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
- वसई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
- बदलापूर – एका रुग्णाचा मृत्यू – 3 एप्रिल
- मुंबई – 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल
- अमरावती – एका रुग्णाचा मृत्यू – 4 एप्रिल
- मुंबई – 70 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
- मुंबई – 53 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
- मुंबई – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
- मुंबई – 47 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 4 एप्रिल
- मुंब्रा – 57 वर्षीय पुरुषाचा मृत्यू -= 4 एप्रिल
- पुणे – 60 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल (रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज)
राज्यात आतापर्यंत 33 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक मृत्यू हे मुंबईतील आहे. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 22 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर देशात कोरोनाबाधितांचा आकडा 3000 पार गेला आहे. जगात कोरोनामुळे 55 हजार मृत्यू (Jalgaon two Corona Suspect died) झाले आहेत.