जळगावात फेसबुक लाईव्हवर लग्न, नवदाम्पत्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 हजार

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. तसेच राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली (Facebook live wedding jalgaon) आहे.

जळगावात फेसबुक लाईव्हवर लग्न, नवदाम्पत्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 हजार
Follow us
| Updated on: Apr 19, 2020 | 7:00 PM

जळगाव : कोरोना विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. तसेच राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली (Facebook live wedding jalgaon) आहे. याच दरम्यान जळगावात एका कुटुंबाने मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत फेसबुक लाईव्हवर लग्न सोहळा साजरा केला. त्यासोबत 25 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला दिली. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र या नववधू-वराची चर्चा (Facebook live wedding jalgaon) रंगली आहे.

भीमराव जाधव यांचे चिरंजीव युवराज आणि औरंगाबाद येथील सुभाष सातदिवे यांची कन्या चैशाली यांचा विवाह आज 19 मार्च रोजी ठरला होता. अचानक कोरोना महामारी आली आणि सचारबंदी लागू झाली.

आता लग्न सोहळा कसा होईल याची चिंता लागून असलेल्या मुला आणि मुलीकडील परिवाराला समता सैनिक दलाचे धर्मभूषण बागुल यांनी एक कल्पना सुचवली. केवळ 10 लोकांच्या उपस्थीतीत फेसबुक लाईव्हकरून लग्न उरकावे आणि लग्नात होणारा खर्च हा मुख्यमंत्री सहायता निधीत द्या. तसेच ठरल्या तारखेला हा सोहळा पार पाडावा.

या कल्पनेला वधू-वरासह मान्यवरांनी मान्यता दिली आणि आज हा आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. 25 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याबरोबर कोरोना आजरावर नियंत्रण रहावं म्हणून काम करणाऱ्या पोलीस, पत्रकार आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना सुरक्षा किट भेट देऊन साजरा केला.

“या आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याचे किती कौतुक केलं तरी कमी आहे मी शासनाच्या वतीने नवं वधूवरांचे आभार व्यक्त करतो”, असं प्रांत लक्ष्मीकांत साताळकर यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.