भाजपने युती धर्म पाळला असता तर शिवसेनेचे चार खासदार आणखी निवडून आले असते… एकनाथ शिंदे समर्थक आमदाराचा भाजपवर निशाणा

भाजपने शिवसेनेची नांदेड, यवतमाळची उमेदवारी बदलवली. या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये भाजपचा हस्तक्षेप झाला. त्याऐवजी भाजपने हे काम ज्याच्या घरचे आहे त्यालाच करू दिले पाहिजे होते. युतीचा धर्म जर भाजपने व्यवस्थित पाळला असता तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणखी चार खासदार निवडून आले असते.

भाजपने युती धर्म पाळला असता तर शिवसेनेचे चार खासदार आणखी निवडून आले असते... एकनाथ शिंदे समर्थक आमदाराचा भाजपवर निशाणा
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Sep 16, 2024 | 1:21 PM

लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलाच झटका बसला होतो. त्यामुळे या झटक्यातून महायुतीचे नेते अजूनही सावरले नाही. या निवडणुकीचे कवित्व सुरु आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदाराने भाजपला सुनावले आहे. भाजपकडून युती धर्माचे पालन झाले नाही. निर्णयात हस्तक्षेप झाला. भाजपने युती धर्म पाळला असता तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणखी चार आमदार निवडून आले असते, असा दावा प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना भाजपवर जोरदार टीका केली.

भाजपकडून युती धर्माचे पालन नाही

लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावतीचा सर्व्ह हा भाजप विरोधात होता. भाजपच्या अर्ध्या पदाधिकाऱ्यांची नवनीत राणा यांच्यावर नाराजी होती. त्यांची उमेदवारी का बदलली नाही? हा प्रश्न आहे. तसेच भाजपने शिवसेनेची नांदेड, यवतमाळची उमेदवारी बदलवली. या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये भाजपचा हस्तक्षेप झाला. त्याऐवजी भाजपने हे काम ज्याच्या घरचे आहे त्यालाच करू दिले पाहिजे होते. युतीचा धर्म जर भाजपने व्यवस्थित पाळला असता तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणखी चार खासदार निवडून आले असते, असा दावा बच्चू कडू यांनी केला.

महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई

कुठलाही पक्ष निवडून येणाऱ्यालाच तिकीट देतो. निवडून येणारा माणूस गांजा विकणारा जरी असला तरी त्याला उमेदवारी दिली जाते. कारण निवडणुकीत जो जिता वही सिंकदर असतो. लाडकी बहीण योजनेवर महायुतीमध्ये श्रेयवाद आहे. ती स्पर्धा आहे. लाडकी बहीण योजना कोणी आणली? हे त्यांनाच माहीत, असा उपरोधिक टोला बच्चू कडू यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

केंद्रात भाजप सरकारने ओबीसीला 10 टक्के आरक्षण वाढून द्यावे. म्हणजे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देता येईल, अशी सूचना बच्चू कडू यांनी केली. अजित पवार यांच्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, अजित पवार यांचे अर्ध्यापेक्षा अधिक आमदार शरद पवार यांच्या सोबत जातील. अजित पवार जात असतील तर त्यांना कोणी अडवले? असे बच्चू कडू यांनी म्हटले.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.