Santosh Bangar : संतोष बांगर चिडले; थेट ऑफिस फोडले
संतोष बांगर यांनी पीकविमा कार्यालय फोडले आहे.
हिंगोली : रमेश चेंडके, tv9 हिंगोली : शिवसेनेचे हिंगोलीतील बंडखोर आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांचे आक्रमक रुप पुन्हा एकदा पहायला मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी संतोष बांगर यांनी उपहारगृह व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली होती. यानंतर आता संतोष बांगर यांनी पीकविमा कार्यालय फोडले आहे.
संतोष बांगर यांचे आक्रमक रुप पुन्हा एकदा पहायला मिळाले आहे. हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांच्यासह शेतकऱ्यांनी पीकविमा कार्यालयाची तोडफोड केली आहे.
पीकविमा कंपनीची आमदार बांगर यांनी पाहणी केली. त्यावेळी कोणताही अधिकारी उपस्थित नसल्याचं दिसून आले. बराच वेळ बांगर शेतकऱ्यांसह कार्यालयात थांबले होते.
बांगर आणि शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे संतप्त शेतकरी आणि बांगर यांनी संतापाच्या भरात पीकविमा कार्यालयाची तोडफोड केली.
दरम्यान, बुधवारी बांगर यांनी माध्यान्ह भोजनाची ग्रामीण भागातून जाणारा वाहनाचा ताफा अडवला. बांगर यानी स्वत: मध्यान्ह भोजनाच्या मेनूची तपासणी केली.
वरण, भात, भाजी सह सर्व परार्थांची त्यांनी तपासणी केली. तपासणी दरम्यान वरणात आळ्या आढळून आल्याचा आरोप आमदार संतोष बांगर यांनी केला आहे.
काही महिन्यांपूर्वी बांगर यांना एका उपहार गृहात निकृष्ट दर्जाचे अन्न सापडले होते. तेव्हा संतोष बांगर यांनी उपहारगृह व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली होती.