Cyclone in Mumbai : मुंबईत सोमवारी कोरोना लसीकरण पूर्णत: बंद, तौत्के चक्रीवादळामुळे महापालिकेचा निर्णय

तौत्के चक्रीवादळामुळे मुंबई वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी, दि - 17 मे रोजी होणारं कोरोना लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे.

Cyclone in Mumbai : मुंबईत सोमवारी कोरोना लसीकरण पूर्णत: बंद, तौत्के चक्रीवादळामुळे महापालिकेचा निर्णय
कोरोना लसीकरण
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 7:39 PM

मुंबई : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या तौत्के चक्रीवादळामुळे मुंबई वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी, दि – 17 मे रोजी होणारं कोरोना लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालयातील लसीकरण बंद राहणार असल्याचं महापालिकेकडून जाहीर करण्यात आलंय. (Corona Vaccination in Mumbai will be closed on Monday)

तौत्के चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे 60 ते 80 किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सोबतत जोरदार पाऊसही कोसळू शकतो. चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून ते जात असल्याने, वादळीवारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उद्या लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलंय.

वेळ पडल्यास कोळीवाड्यातील नागरिकांना हलवणार

तौत्के चक्रीवादळामुळे मुंबईत पर्जन्यवृष्टीसह वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे यंत्रणा सतर्क आणि सुसज्ज ठेवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सुचनेनुसार, अरबी समुद्रात ‘तौत्के’ नावाचे चक्रीवादळ तयार होत आहे. हे चक्रीवादळ दिनांक 15 आणि 16 मे 2021 रोजी मुंबईच्या नजिक येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे वेगवान वाऱ्यांसह पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क आणि सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई महापालिका अलर्ट

महापालिकेच्या स्तरावर करण्यात आलेली तयारी व सुसज्जता आणि इतर संबंधित यंत्रणांनी केलेली तयारी याचा आढावा मुंबई उपनगरे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ( पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे व मुंबई शहर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित या आढावा बैठकीला अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश निवतकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई पोलीस दलाचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह महानगरपालिकेचे अतिवरिष्ठ अधिकारी व केंद्र शासनाचे अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

Tauktae Cyclone : रायगडमध्ये समुद्र किनाऱ्यावरील 64, तर खाडी किनाऱ्यावरील 128 गावांना सतर्कतेचा इशारा

बांद्रा बँडस्टँडला 20 वर्षीय तरुणीवर गँगरेप, बॉयफ्रेण्डसह तिघा जणांना अटक

Corona Vaccination in Mumbai will be closed on Monday

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.