धतड ततड… धतड ततड… ढाकू माकूम ढाकू माकूमच्या तालावर थरावर थर, वाहतुकीतील बदल काय ?

Dahi Handi 2024 : आज सर्वत्र दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत दहीहंडीची तयारी जल्लोषात सुरू आहे. शहरात विविध ठिकाणी उंचच उंच दहीहंडी बांधण्यात आल्या आहेत. तर त्यांना फोडण्यासाठी दहीहंडी पथकांमध्ये चुरस रंगताना दिसणार आहे. त्यानिमित्त शहरातील वाहतुकीतही काही बदल करण्यात आले आहेत.

धतड ततड... धतड ततड... ढाकू माकूम ढाकू माकूमच्या तालावर थरावर थर, वाहतुकीतील बदल काय ?
Follow us
| Updated on: Aug 27, 2024 | 10:50 AM

ठाकू माकूम… ठाकू माकूमच्या तालावर रंगत दहीहंडी फोडण्यासाठी आज मुंबईकर सज्ज झाले आहेत. संपूर्ण देशात सध्या दहीहंडीचा उत्साह पहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत दहीहंडीची तयारी जल्लोषात सुरू असून शहरात विविध ठिकाणी उंच दहीहंडी बांधण्यात आल्या आहेत. दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंच दहीहंड्या बांधण्यात आल्या असून या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस आज रंगणार आहे. याच पार्श्वभू्मीवर शहरातील वाहतुकीत काही बदल करण्यात आला आहे.

दहीहंडीनिमित्त मध्यभागात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. आज संध्याकाळनंतर छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.

छत्रपती शिवाजी रस्ता, महात्मा फुले मंडई, हुतात्मा बाबू गेणू चौक, अप्पा बळवंत चौक, टिळक रस्त्यावरील साहित्य परिषद चौक, नवी पेठेत मोठी गर्दी होते. मंगळवारी सायंकाळी पाचनंतर दहीहंडी फुटेपर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. गर्दी वाढल्यानंतर छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.

दहीहंडीनिमित्त कोणते रस्ते बंद राहणार ?

– मंडईतील रामेश्वर चौक ते शनिपार चौक

– लक्ष्मी रस्त्यावरील सोन्या मारुती चौक ते सेवा सदन चौक

– छत्रपती शिवाजी रस्त्यावरील लालमहाल चौक ते गोटीराम भैय्या चौक, मंडई

– दारूवाला पूल चौक ते गणेश रस्ता लाल महाल चौक

जखमी गोविंदांसाठी मुंबईतील रुग्णालये सज्ज

दरवर्षी दहीहंडी फोडताना मोठ्या प्रमाणात गोविंदा जखमी होतात. या गोविंदांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील राज्य सरकारबरोबरच महानगरपालिकेची रुग्णालये सज्ज झाली आहेत. दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या उत्साहात तरुण सकाळी घराबाहेर पडतात. मात्र हा उत्साह शिगेला पोहोचत असतानाच गोविंदा जखमी होण्याच्या घटना घडतात आणि उत्सवाला गालबोट लागते. मागील काही वर्षांमध्ये दहीहंडी फोडण्यामध्ये गोविंदा पथकांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. पण गेल्या दोन वर्षांत जखमी गोविंदांची संख्या 200 वर पोहचली आहे.

दरवर्षी तरुण गोविंदा मोठ्या प्रमाणात जखमी होत असल्याने व त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील राज्य सरकारच्या तसेच महानगरपालिकेची केईएम, शीव, नायर व कूपर ही रुग्णालये सज्ज झाली आहेत. नायर रुग्णालयामध्ये ट्रॉमा, शल्यचिकित्सा विभाग आणि अस्थिव्यंगशल्य चिकित्सा विभागात जखमी गोविंदांसाठी 8 ते 10 खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून, आवश्यक सर्व औषधांचा साठा उपलब्ध करण्यात आल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीराजे नवी मुंबईत ‘महाराष्ट्राच्या परिवर्तनाची’ प्रतिकात्मक दहीहंडी फोडणार

मुंबई, नवी मुंबई भागात मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. यातच यावर्षी स्वराज्य पक्षाच्या वतीने ऐरोली विधानसभा मतदारसंघ (नवी मुंबई) येथे सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाने चांगलीच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यातच स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे याठिकाणी परीवर्तनाची प्रतिकात्मक दहीहंडी फोडणार असल्याने याला महत्व आहे. दहीहंडी उत्सवाचे आयोजन स्वराज्य पक्ष उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी केले आहे. यावेळी छत्रपती संभाजीराजे सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उपस्थित असतील.

गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी बॉलिवूड कलाकार राहणार हजर

मुंबईत आज दिवसभर दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. बोरिवली पूर्व देवीपाडा मैदानावर आ प्रकाश सुर्वे, त्यांचा मुलगा यांच्या तारामती चॅरिटेबल फाउंडेशन च्या माध्यमातून भव्य असा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवामध्ये 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 1 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर, भाग्यश्री पटवर्धन, लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांची उपस्थिती असणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.