मुंबई-ठाण्यासह राज्यभरात दहीहंडी उत्सव रद्द, जन्माष्टमी सोहळाही घरच्या घरी साजरा

दरवर्षी जन्माष्टमीनंतर सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला जातो (Mumbai Dahihandi Celebration during Corona).

मुंबई-ठाण्यासह राज्यभरात दहीहंडी उत्सव रद्द, जन्माष्टमी सोहळाही घरच्या घरी साजरा
फोटो - प्रातिनिधीक
Follow us
| Updated on: Aug 12, 2020 | 8:50 AM

मुंबई : दरवर्षी जन्माष्टमीनंतर सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला जातो (Mumbai Dahihandi Celebration during Corona). तथापि यावर्षी 31ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन असल्याने आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने या उत्सवास शासनाची परवानगी मिळणे शक्य नाही. त्यामुळे यंदा दहहंडीप्रेमींच्या आनंदावर विरजण पडले आहे (Mumbai Dahihandi Celebration during Corona).

दहीहंडीची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात यंदा शुकशुकाट पाहायला मिळणार असून आयोजकांनी आरोग्य उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. तर दुसरीकडे मनसेने देखील हा सण रद्द करून ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नौपाडा येथील त्यांच्या कार्यालयात गोकुळ अष्टमीचा जन्म उत्सव पूजा अर्चाकरून साजरा केला जाणार आहे.

“सांस्कृतिक कार्यक्रमाचा खर्च यंदा कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसासाठी खाजगी गाड्या सोडण्यावर भर दिला आहे. त्यामुळे पुढील वर्षी हंडी चांगल्या जल्लोशात साजरी करू”, असे मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी संगीतले आहे.

यंदा शिर्डीतील साई मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा भक्तांविना

देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव‌ साध्या पद्धतीने साजरा होतोय. शिर्डीच्या साईबाबा मंदीरातही हा उत्सव मोठया श्रध्देने आणि उत्साहात साजरा करण्यात येतोय. मात्र यावेळी हा सोहळा भक्तांविना साजरा केला आहे. तसेच यंदाचे  चित्र वेगळं आहे. साईबाबांच्या मंदीरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्याची प्रथा गेल्या अऩेक वर्षापासून चालत आली आहे. साईबाबांना श्रीकृष्णाचा अवतार मानत या पावन दिवशी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी अनेक भक्त साई दरबारी येत‌ असतात. मात्र कोरोनाच्या संकटामुळे हा उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा होत आहे. काल रात्री साई मंदीरात 12 वाजता कृष्ण जन्म झाल्यानंतर शेजआरती पार पडली. तर आज दुपारी 12 वाजता मंदीरात दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे.

गोकुळ अष्टमीच्या दिवशी साईंच्या मंदीरात कृष्ण जन्म आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येतो. चांदीच्या पाळण्यात बालकृष्णाची मूर्ती ठेवून श्रीकृष्ण जन्माचे किर्तन झाल्यानंतर जन्म उत्सव साजरा करण्यात येतो. गोपाळ काल्याच्या दिवशी दिवसभर साईंच्या समाधी शेजारी गोपाळ कृष्णाचा फोटो ठेवून पुजाविधी आणि आरती केली जाते. विशेष म्हणजे यावर्षी विश्वस्त आणि अधिकाऱ्यांएवजी कृष्ण जन्माच्यावेळी दोरीने‌ पाळणा ओढण्याचा‌ मान साई मंदिरातील ‌भालदार-चोपदार, साईसेवक आणि फोटोग्राफर यांना मिळाला आहे.

ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी रद्द

ठाणे शहरात अनेक गोविंदा उत्सव मंडळांनी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय. ठाण्यातील खेवरा सर्कल येथे दरवर्षी मोठया धुमधडाक्यात दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या भाजप पुरस्कृत स्वामी प्रतिष्ठानने देखील आपला दहीहंडी उत्सव रद्द करुन उत्सवासाठी होणारा सर्व खर्च कोरोनाग्रस्त रुग्णांना मदत म्हणुन देणार असल्याचे सांगितले आहे. मागे देखील युती सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष याच ठिकाणी पुरग्रस्थांना मदत करण्यात आली होती. स्वामी प्रतिष्ठान या ठिकाणी दरवर्षी मुंबई ठाण्यातून अनेक गोविंदा पथक हजेरी लावत असतात.

पालघर जिल्ह्यातील युवा आमदार दहीहंडी उत्सव रद्द

पालघर जिल्ह्याील सर्वात मोठा युवा आमदार दहीहंडी उत्सव या वर्षी रद्द करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ गेली सलग 12 वर्षे पालघर जिल्ह्यातील युवा आमदार दहीहंडी उत्सव विरार पूर्व मानवेलपाडा येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक भान ठेवून यावर्षी हा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोशल डिस्टन्सिंग पाळत दहीहंडी उत्सव साजरा

दहीहंडी उत्सव आपली परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी सरकारी आदेशाचे उल्लंघन न करता साजरा करण्याचा निर्णय पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला दहीहंडी गोविंदा पथकाने घेतला आहे. सोशल डिस्टंन्सिग पाळून दहीहंडी फोडून उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

“दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा मिळाला आहे. त्यानंतर गेल्या वर्षी सरकारने अटी आणि नियम लागू केल्याने अनेक बाळ गोपाळ आणि गोपिकांना दहीहंडीच्या या थरार खेळातून मागे यावे लागलं. तर यंदा कोरोनामुळे मोठया प्रमाणात उत्सवही साजरा होणार नाही. मात्र यावरही तोडगा काढत सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करत दहीहंडी उत्सव साजरा करण्याचे पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला दहीहंडी गोविंदा पथकाने ठरवल्याचे पथकाच्या अध्यक्षा गीता झगडे यांनी सांगितले.”

संबंधित बातम्या : 

मराठवाड्यातील कोरोना योद्धांवर उपासमारीची वेळ, 1200 डॉक्टरांना 2 महिन्यापासून वेतन नाही

मुलीचे कोरोनाने निधन, डीएसके पत्नी मुलासह काही तासांसाठी तुरुंगाबाहेर येणार

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.