Milk Agitation | महाविकासआघाडीचा केंद्रबिंदू शेतकरी, दूध उत्पादकांना मदत करण्याची आमची भूमिका : मंत्री सुनील केदार
महाविकासआघाडीचा केंद्रबिंदू हा शेतकरीच आहे," असेही सुनील केदार यांनी (Sunil Kedar On Dairy Farmers Protest Meeting) सांगितले.
मुंबई : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक होत आंदोलन सुरु (Sunil Kedar On Dairy Farmers Protest Meeting) आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात राज्याचे पशु आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला माजी कृषी राज्यमंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह इतर काही संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत महाविकासआघाडीचा केंद्रबिंदू शेतकरी आहे. दूध उत्पादकांना मदत करण्याची आमची भूमिका आहे, असे मत पशु-दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केलं.
“महाविकासआघाडीचा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे. आम्ही चांगली योजना आणू, आंदोलनामुळे ही बैठक होते असं नाही. ही बैठक आधीच नियोजित होती. मी स्वत: ही बैठक 16 जुलैला बोलवली होती. ही बैठक तोडगा काढण्यासाठी बोलवण्यात आली नव्हती. तर या बैठकीत संघटना आणि नेत्यांनी अनुदानासह दूध उत्पादनाच्या अडचणी मांडल्या,” असे पशु आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार म्हणाले.
“मात्र कोरोना संकटामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. दूध उत्पादकाना मदत करण्याची आमची भूमिका आहे. गेल्या सरकारने 5 रुपये अनुदानाचा निर्णय घेतला. मात्र अनेकांना लाभच मिळाला नाही. हे टाळण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, महाविकासआघाडीचा केंद्रबिंदू हा शेतकरीच आहे,” असेही सुनील केदार यांनी सांगितले.
“दूध भुकटीचा निर्णय आम्ही घेतला, ही मागणी कोणत्याही पक्षाने केली नव्हती, आम्ही स्वत:हून हा चांगला निर्णय घेतला. दूध भुकटीबाबत मी केंद्राशी संपर्क केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र दिलं,” अशीही माहिती पशु-दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिली.
“राजू शेट्टींबाबत मी काही बोलणार नाही. राज्याच्या धोरणाचा निर्णय मंत्रिमंडळ स्तरावर होतो. मंत्री स्तरावर होत नाही,” असा टीकाही सुनील केदार यांनी केली.
बैठकीनंतर मंत्री सुनील केदार काय म्हणाले?
- शेतकरी हाच आमचा केंद्र, चांगली योजना आणू, आंदोलनामुळे ही बैठक होतेय असं नाही, ही बैठक आधीच नियोजित होती, कोरोना संकटामुळे परिस्थिती बिकट
- मागच्या सरकारने 5 रुपये अनुदानाचा निर्णय घेतला, मात्र अनेकांना लाभच मिळाला नाही, हे टाळण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू हा शेतकरीच आहे
- राजू शेट्टींबाबत मी काही बोलणार नाही, राज्याच्या धोरणाचा निर्णय मंत्रिमंडळ स्तरावर होतो, मंत्री स्तरावर होत नाही
- दूध भुकटीचा निर्णय आम्ही घेतला, ही मागणी कोणत्याही पक्षाने केली नव्हती, आम्ही स्वत:हून हा चांगला निर्णय घेतला
- दूध भुकटीबाबत मी केंद्राशी संपर्क केला, गडकरी, फडणवीस यांनाही पत्र (Sunil Kedar On Dairy Farmers Protest Meeting) दिलं.
संबंधित बातम्या :
दूध दरवाढीबाबत मंत्रालयात बैठक, सुनील केदार यांची सदाभाऊ खोत आणि शेतकरी प्रतिनिधींसोबत चर्चा