‘कैसा सीधा साधा…मैं कैसा भोला भला…’ गाण्यावर आमदाराचा भन्नाट डान्स, व्हिडिओ तुफान व्हायरल

prashant bumb dance: प्रशांत बंब यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 'खाई के पान बनारस वाला' या गाण्यावर प्रशांत बंब थिरकले. कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्यात प्रशांत बंब यांचा हटके अंदाज प्रथमच दिसून आला. त्यांच्या डान्सचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

'कैसा सीधा साधा...मैं कैसा भोला भला...' गाण्यावर आमदाराचा भन्नाट डान्स, व्हिडिओ तुफान व्हायरल
prashant bumb
Follow us
| Updated on: Sep 06, 2024 | 6:33 PM

लोकप्रतिनिधी नेहमी कार्यकर्त्यांच्या गराड्यात दिसतात. कधीतरी गणेश उत्सव किंवा इतर एखाद्या मिरवणुकीत ठेकाही ते धरतात. परंतु एखाद्या गाण्यावर भन्नाट डान्स करणारे आमदार विरळच. भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब अधूनमधून चर्चेत असतात. आता एका गाण्यावर त्यांनी केलेला डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘डॉन ‘ या चित्रपटातील ‘छोरा गंगा किनारे वाला’ या बॉलीवूडमधील गाण्यावर प्रशांत बंब यांनी डान्स केला. चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी या गाण्यावर डान्स केले होते.

कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्यात डान्स

प्रशांत बंब यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘खाई के पान बनारस वाला’ या गाण्यावर प्रशांत बंब थिरकले. कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्यात प्रशांत बंब यांचा हटके अंदाज प्रथमच दिसून आला. त्यांच्या डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.

हे सुद्धा वाचा

एमबीए केल्यानंतर राजकारणात

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदार संघातील आमदार प्रशांत बंब हे अधूनमधून चर्चेत येतात. घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात त्यांनी पाऊल ठेवले. त्यांनी एमबीए केल्यानंतर एखाद्या कंपनीचे व्यवस्थापन करण्याऐवजी राजकारण सुरु केले. 2002मध्ये लासूर स्टेशन ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, 2005मध्ये जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापतीपद आदी पदे त्यांनी भूषविली आहेत. 2009, 2014 आणि 2019मध्ये ते सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत.

मुलीच्या लग्नात केला होता भन्नाट डान्स

प्रशांत बंब यांनी त्यांचे मुलीचे लग्न साध्या पद्धतीने केले होते. त्यांची मुलगी बघायला ज्या दिवशी मुलगा आला त्याच दिवशी तिचे लग्न लावण्यात आले. केवळ 100 जणांचा उपस्थितीत साध्या पद्धतीने हे लग्न झाले होते. त्या लग्नात त्यांनी धमाकेदार डान्स केला होता. तो ही चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्यात प्रशांत बंब यांनी तुफान डान्स केला.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.