वर्षभर कोरोनाविरुद्ध लढलो, आता पुन्हा लढाईचे दिवस- पोलीस महासंचालक
वर्षभर कोरोनाच्या विरोधात लढलो. आता विश्रांतीनंतर पुन्हा एकदा युद्ध करण्याचे दिवस आले आहेत, अशा शब्दात पोलीस महासंचालकांनी संपूर्ण पोलीस यंत्रणेला सतर्क केलं आहे.
नवी मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा रोजचा आकडा आता 6 हजाराच्या पुढे गेलाय. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी कोरोनाविरोधातील लढाईची घोषणा केली आहे. वर्षभर कोरोनाच्या विरोधात लढलो. आता विश्रांतीनंतर पुन्हा एकदा युद्ध करण्याचे दिवस आले आहेत, अशा शब्दात पोलीस महासंचालकांनी संपूर्ण पोलीस यंत्रणेला सतर्क केलं आहे. ते आज नवी मुंबईत बोलत होते.(Days to fight again against Corona, reaction of DGP Hemant Nagarale)
पोलिसांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीपत्र
रेल्वे सेवा सुरु झाल्याने काही प्रमाणात केसेस वाढतील असं वाटलं होतं. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढतील अशी शक्यता वाटली नव्हती, असं पोलीस महासंचालक म्हणालेत. नवी मुंबई आणि कोकण परिक्षेत्रात कोरोना काळात शहीद झालेल्या 83 पोलीस जवानांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती पत्रक देण्यात आलं. पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते हे नियुक्ती पत्र दिलं गेलं.
नवी मुंबईत 19 तर कोकण परिक्षेत्रात 64 जणांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहेत. वाशी इथल्या सिडको ऑडिटोरियममध्ये हा कार्यक्रम पार पडला. येत्या 1 – 2 दिवसांत 500 सहाय्यक पोलीस निरीक्षकांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती होणार आहे. तसंच 335 पोलिसांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाणार आहे, तशी माहिती नगराळे यांनी दिली आहे.
राज्यात आज 6 हजार 218 नवे रुग्ण
महाराष्ट्रात मंगळवारी 6 हजार 218 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 5 हजार 869 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 51 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 2 लाख 79 हजार 288 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 2 हजार 484 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्या 53 हजार 409 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
Maharashtra reports 6218 new #COVID19 cases, 5869 recoveries and 51 deaths in the last 24 hours.
Total cases 21,12,312 Total recoveries 20,05,851 Death toll 51,857
Active cases 53,409 pic.twitter.com/RKAWR9ZyDZ
— ANI (@ANI) February 23, 2021
संबंधित बातम्या :
नियम सर्वांना सारखेच, पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
मास्क न घालणाऱ्या पुणेकरांना धडा, पोलिसांची 2 लाख 28 हजार जणांवर कारवाई
Days to fight again against Corona, reaction of DGP Hemant Nagarale