AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik| ‘आजादी का अमृत महोत्सवा’निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात योगाभ्यासाचा संकल्प

जिल्हाधिकारी कार्यालयातील हिरवळीवर पहाटेच्या थंडीत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी या अभ्यासवर्गात सहभाग घेतला. प्रज्ञा पाटील यांनी विविध योगासने आणि त्यांचे दैनंदिन जीवनातील फायदे याबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती दिली.

Nashik| 'आजादी का अमृत महोत्सवा'निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात योगाभ्यासाचा संकल्प
नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बुधवारी सकाळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योगासनांचे प्रशिक्षण घेतले.
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 3:04 PM

नाशिकः स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आपण साजरे करीत आहोत. मात्र, हा आनंद केवळ एखाद्या समारंभापुरता मर्यादित न ठेवता त्यातून प्रत्येकाच्या आयुष्यात अमृतमहोत्सवी जगण्याचा आनंद घेण्यासाठी योगाभ्यास गरजेचा आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज बुधवारी केले. जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या आवारातील हिरवळीवर ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत आयोजित योगासनांच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सूरज मांढरे बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी , उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) भीमराज दराडे, उपजिल्हाधिकारी प्रकाश थविल, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी स्वाती थविल, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

धावपळीच्या आयुष्यात योगा

जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आयुष्यभरासाठी काही तरी वेगळं करण्याचा संकल्प करावा म्हणून योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात योग खूप गरजेचा आहे. आपण जर नियमितपणे योगाभ्यास केला, तर प्रत्येक जण स्वतः च्या अमृतमहोत्सवापर्यंत निरोगी राहील. योग अभ्यास यासारखे कार्यक्रम आयोजित केल्यास, त्याचे दूरगामी फायदे दिसून येतील व योगाभ्यास प्रत्येक माणसाला तणावमुक्तीच्या दिशेने घेऊन जाईल, असेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.

प्राणायाम गरजेचे

योग अभ्यासक प्रज्ञा पाटील यांनी यावेळी योगातील विविध आसने व त्यांचे होणारे फायदे यांची माहिती देऊन निरोगी आयुष्यासाठी योगासनांचे महत्व विषद केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील हिरवळीवर पहाटेच्या थंडीत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी या अभ्यासवर्गात सहभाग घेतला. प्रज्ञा पाटील यांनी विविध योगासने आणि त्यांचे दैनंदिन जीवनातील फायदे याबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती दिली. तसेच दिवसभरात जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा प्राणायाम कसा करावा आणि त्याचा आपल्याला काय फायदा होतो याबाबतही मार्गदर्शन केले.

अधिकारी, कर्मचारी समाधानी

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुमारे तासभर हा योगाभ्यास सुरू होता. सतत कामाच्या व्यापात आणि धावपळीचे आयुष्य जगणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने व गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड विजेत्या प्रज्ञा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि BLVD ग्रुपच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. आभार उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांनी मानले.

इतर बातम्याः

अशोक चव्हाण यांच्या कुटुंबाला 300 कोटींचे कर्ज दिले, आता नांदेड, धर्माबादला जाणार; किरीट सोमय्यांचा इशारा

बाळासाहेबांचं हिंदुत्व राष्ट्रीयत्वाला धरून, भागवतही म्हणालेले आमचा DNA एक, खासदार सावंतांकडून उजाळा

भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदीला मुदतवाढ दिली
भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदीला मुदतवाढ दिली.
उपकाराची जाणीव मोदींनी किती ठेवली?, राऊतांचे खळबळजनक दावे, गौप्यस्फोट
उपकाराची जाणीव मोदींनी किती ठेवली?, राऊतांचे खळबळजनक दावे, गौप्यस्फोट.
‘नरकातला स्वर्ग’ मधून राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
‘नरकातला स्वर्ग’ मधून राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.