हॉटस्पॉट ठरलेल्या निफाड तालुक्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; 108 गावांमध्ये एकही रुग्ण नाही
हॉटस्पॉट ठरलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्याची आता दिवाळी कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
लासलगावः हॉटस्पॉट ठरलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्याची आता दिवाळीत कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
कोरोनाच्या दोन्ही लाटांनी नाशिक जिल्ह्याला चांगलेच जेरीस आणले. विशेषतः दुसऱ्या लाटेनंतरही निफाड तालुका हा गेल्या दहा-पंधरा दिवसांपूर्वीही हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात होता. यादरम्यान कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही सातत्याने 100 ते 125 हून अधिक राहत होती. मात्र, आता ही संख्या 50 च्या जवळपास आली आहे. यात कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगावसह निफाड तालुक्यातील 108 गावे कोरोनामुक्त झाली असून, पंचवीस गावात 58 कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहे. या सर्व रुग्णांनाही लवकरच डिस्चार्ज मिळत आहे. त्यामुळे तालुका लवकरच कोरोनामुक्त झालेला पाहायला मिळले.
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे 97.11 टक्के, नाशिक शहरात 98.16 टक्के, मालेगावमध्ये 97.12 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.73 इतके आहे. तर नाशिक ग्रामीणमध्ये 4 हजार 201 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 3 हजार 998, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 357 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 681 कोरोना रुग्णांचा मृत्यू नाशिक जिल्ह्यात झाला आहे.
एकीकडे संपूर्ण देशात शंभर कोटी नागरिकांचे लसीकरण झाले असताना, दुसरीकडे नाशिक विभागाने विभागाने राज्यात विक्रमी आघाडी घेत तब्बल 1 कोटी 29 लाख 34 हजार 893 नागरिकांचे लसीकरण केले आहे. नाशिक विभागाला पुरेसा लससाठा प्राप्त झाल्यामुळे हे लसीकरण करण्यात आले. नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांसाठी वेळोवेळी कोव्हॅक्सिन 15,99,370 डोसेस आणि कोविडशिल्ड 1,17,61,820 डोसेस शासनाकडून प्राप्त झाले आहेत. या दोन प्रकारच्या कोरोना लसीचे एकूण 1,33,61,190 डोसेस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी विभागात 1, 29, 34, 893 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र, तरीही नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णात अनेक ठिकाणी वाढ होताना दिसत आहे.
नियम पाळण्याचे आवाहन
सध्या परदेशात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आपल्या देशातही अनेक राज्यात कोरोना रुग्णांचे आकडे वाढत आहेत. सध्या महाराष्ट्र सरकारने निर्बंधामध्ये सूट दिली आहे. हे पाहता लोकांंनी कोरोना नियमांचे पालन करूनच व्यवहार करावेत. सर्वांनी मास्क आवश्य वापरावा. एकाच ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (Decrease in the number of corona patients in Niphad taluka)
इतर बातम्याः
Video : कोरोनाची लस घेतलीही नाही आणि घेणारही नाही, इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याने नवा वाद
Special Report: तुझं हसणं माझ्या जगण्याची भाकरीय; जगात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या एका मुलखावेगळ्या कवीची गोष्ट!https://t.co/rIFR65qDOq#SpecialReport|#PabloNeruda|#Poet|#RevolutionaryPoet|#Chile
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 3, 2021