Eknath Shinde : ‘संजय राऊतांच्या बोलण्याने आग लागते’, शिंदे गटाकडून संजय राऊतांबाबत उघड नाराजी व्यक्त

शिंदे गटातील नेते माजी गृह राज्यमंत्री केसरकर यांनी आपल्या मनातील खदखद आज बोलून दाखवली. ते यावेळी म्हणाले, संजय राऊत यांचा आम्हाला आदर आहे. मात्र त्यांच्याबद्दल तक्रारही आहे. याबाबत आम्ही आधी बोललो नाही. राऊत हे फायर आहेत. त्यांच्या बोलण्यामुळे आग लागते.

Eknath Shinde : 'संजय राऊतांच्या बोलण्याने आग लागते', शिंदे गटाकडून संजय राऊतांबाबत उघड नाराजी व्यक्त
दिपक केसरकर आणि खासदार संजय राऊतImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 5:49 PM

मुंबई : गेली पाच एक दिवस राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामुळे राजकारण चांगलेच तापलेलं आहे. शिंदे यांनी बंडाळी करत ही महाविकास आघाडी सरकार आम्हाला मान्य नसल्याचे सांगितले. तसेच शिवसेने यातील बाहेर पडावे आणि भाजपशी घरोबा करावा असे म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेनेकडून हा बंडनिकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे शिवसैनिकांकडून फुटीर आमदार आणि नेत्याविरोधात निर्दशने केली जात आहेत. तर फुटलेल्या शिंदे गटावर शिवसेने नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे टीका करताना हल्ला करत आहेत. यावर शिंदे गटातील अनेक नेत्यांनी राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. तर त्यांच्यावर आक्षेपही नोंदवले आहेत. असाच आक्षेप शिंदे गटात गेलेले माजी गृह राज्यमंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राऊत यांच्यावर केला आहे. राऊतांवर आक्षेप करत केसरकर म्हणाले, राऊत्यांच्या बोलण्याने आग लागते. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी संवाद करत नाही.

त्यांच्याशी थेट कधी संबंध येत नाही

एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार खाळी खेचण्याची पुर्ण तयारी केली आहे. शिंदे यांनी आपल्या सोबत तब्बल 40 ते 45 आमदार नेले आहेत. ज्यात शिवसेनेचेही आमदारही आहेत. ज्यामुळे सनेनेला खिंडार पडले आहे. तर हा पडलेला खड्डा भरून काढण्यासाठी शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. मात्र या प्रयत्नांना कुठेतरी सुरूंग लागण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. याचबाबतीत शिंदे गटातील नेते माजी गृह राज्यमंत्री केसरकर यांनी आपल्या मनातील खदखद आज बोलून दाखवली. ते यावेळी म्हणाले, संजय राऊत यांचा आम्हाला आदर आहे. मात्र त्यांच्याबद्दल तक्रारही आहे. याबाबत आम्ही आधी बोललो नाही. राऊत हे फायर आहेत. त्यांच्या बोलण्यामुळे आग लागते. त्यांच्या याच बोलण्यामुळे मार्गी लागणारे विषय ही संकटात सापडतात. तसेच ते विधीमंडळाचे सदस्यही नाहीत. त्यामुळे आमचा त्यांच्याशी थेट कधी संबंध येत नाही. तसेच मी त्यांनी त्यांचा स्वभाव बदला असेही बोलू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत अधिक बोलणं योग्य नसल्याचेही केसरकर म्हणाले.

आम्ही विरोध करणारच

तसेच यावेळी केसरकर यांनी अनेक विषयांना हात घालताना, शिवसेनेच्या नावाचा वापर करू नका असे ते म्हणत असतील तर आम्ही तसे करू असे म्हटलं आहे. तसेच त्यांनी असही म्हटलं की, आजच्या घडीला असे अनेक नेते आहेत जे पक्षाच्या चिन्हा शिवाय निवडूण येऊ शकतात. तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपद घेण्यावर बोलताना, मुख्यमंत्रिपद घेऊन जर शिवसेना संपणार असेल, तर आम्ही विरोध करणारच असल्याचे सांगितले. विकासाची काम करुन शिवसेना मोठी होईल. जेव्हा विरोधात शिवसेना होती तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती, मात्र आता शिवसेना सत्तेत आहे. जनतेच्या आपल्याकडून या अपेक्षा वाढल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेकडे बोट दाखवत होते

तसेच त्यांनी हे जे काही आता सुरू झाले नसल्याचे म्हणत याची ठिणगी ही राज्यसभेवेळीच पडल्याचे म्हटलं आहे. तर ज्यावेळी मतं फुटली होती. ती काही शिवसेनेची नव्हती. मात्र लोक शिवसेनेकडे बोट दाखवत होते, शिवसेनेच्या लोकांनी वेगळीकडे मतदान केलं, त्यानंतरच ही वेळ आल्याचेही केसरकर म्हणाले.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.