Special Report : दीपाली सय्यद शिंदे गटात, प्रवेश करण्याआधी रश्मी ठाकरेंवर गंभीर टीका
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद या शिंदे गटात सामील होणार आहेत.
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद या शिंदे गटात सामील होणार आहेत. विशेष म्हणजे शिंदे गटात सामील होण्याआधीच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. दीपाली सय्यद या कधीकाळी भाजपच्या महिला नेत्यांना थेट भिडायच्या. तसेच त्यांनी शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या दिलजमाईचे भरपूर प्रयत्न केले. पण आता त्या शिंदे गटात जाणार आहेत. येत्या शनिवारपर्यंत त्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. ठाकरे गटाला रामराम करताना त्यांनी रश्मी ठाकरेंवर टीका केलीय. या विषयी सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !