Ajit Pawar | राष्ट्रवादी 90 जागा लढवणार अजित पवार यांच्या विधानावर भाजपा प्रदेशाध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया

Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष सरकारमध्ये आल्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांमध्ये अस्वस्थतता आहे, या प्रश्नावर सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं. अजितदादांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्र, देश हिताची आहे, असं त्यांनी सांगितलं.

Ajit Pawar | राष्ट्रवादी 90 जागा लढवणार अजित पवार यांच्या विधानावर भाजपा प्रदेशाध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया
Ajit Pawar-Chandrashekhar Bawankule
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 11:38 AM

मुंबई : “शरद पवार हे सर्वांसाठी आदरणीय आहेत. काल अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल सर्व आलेख मांडला. वेळोवेळी वेगवेगळी भूमिका घेतल्यामुळे पक्ष अडचणीत आला. विश्वासहर्ता कमी झाली. परिवारातही खोटं बोलाव लागलं. कुटुंबही राजकारणापासून सुटलं नाही” असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. अजितदादांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्र, देश हिताची आहे, असं त्यांनी सांगितलं.

“छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांनी त्यांना का पक्ष सोडावा लागला? ते का बाहेर पडले? हे सगलं मांडलं. अजितदादांनी सत्य परिस्थिती मांडली. मी पवार कुटुंबाचा आहे, खोटं बोलत नाही, असं अजितदादा म्हणाले. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे” असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

जागा वाटपाच्या मुद्यावर चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस 90 जागा लढवणार असल्याच म्हटलं आहे. त्यावर बावनकुळे म्हणाले की, “जागांबद्दल काय बोलण झालं? काय नाही? हे माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही. परंतु निवडणूका लागत नाही, तो पर्यंत जागा वाटपाचा निर्णय होत नाही. साधराण युतीमध्ये असं असंत” “आम्ही म्हटलं इतक्या जागा लढू, एकनाथ शिंदे म्हणाले, इतक्या जागांवर लढू पण खरं चित्र हे निवडणुका लागल्यानंतरच स्पष्ट होतं. त्यामुळे राष्ट्रवादी 90 जागा लढवणार हे माझ्या दृष्टीने महत्वाच नाही” असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांच्या नाराजीबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष सरकारमध्ये आल्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांमध्ये अस्वस्थतता आहे, या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची बैठक आधीच ठरली होती. त्यामुळे ते नागपूरवरुन गेले. त्यांनी राष्ट्रपतींच स्वागत केलं. मुख्यमंत्र्यांसमोर अनेक विषय असतात. आमच्यात कुठलीही धुसफूस नाही. तीन भाऊ असल्यामुळे कमी-जास्त होऊ शकतं. पण मनभेद, मतभेद आमच्यात नाहीत. हे मजबूत सरकार आहे. बहुमताच सरकार असून ते टिकेल” असा विश्वास चंद्रशेखर बावनुकळे यांनी व्यक्त केला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.