सर्व विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरु करण्याच्या सूचना देणार, ‘देवदूत सन्मान’ कार्यक्रमात उदय सामंतांची घोषणा

देवदूतांचा सन्मान या कार्यक्रमात बोलताना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी टीव्ही 9 मराठीच्या कामाचं कौतुक केलं. तसंच सर्व देवदूतांचेही आभार मानले. त्यावेळी कोल्हापूर विद्यापीठात सुरु असलेल्या आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठात हा अभ्यासक्रम सुरु करण्याची सूचना देणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

सर्व विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरु करण्याच्या सूचना देणार, 'देवदूत सन्मान' कार्यक्रमात उदय सामंतांची घोषणा
उदय सामंत यांच्याहस्ते देवदूतांचा सन्मान
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 9:40 AM

मुंबई : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील महापुराच्या संकटातून हजारो लोकांचे जीव वाचवणाऱ्या देवदूतांचा सन्मान आज टीव्ही 9 मराठीकडून करण्यात आला. या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या हस्ते 11 देवदूतांच्या कार्याचा गौरव सोहळा पार पडला. जलप्रलयात हजारो नागरिकांचे जीव वाचवणाऱ्या या देवदुतांना पुरस्कार, ट्रॉफी, रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, शाळ, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि अभिनेक्षी दिपाली सय्यद यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे. (Uday Samant announces to start disaster management courses in all universities)

सर्व विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरु करण्याची सूचना

देवदूतांचा सन्मान या कार्यक्रमात बोलताना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी टीव्ही 9 मराठीच्या कामाचं कौतुक केलं. तसंच सर्व देवदूतांचेही आभार मानले. त्यावेळी कोल्हापूर विद्यापीठात सुरु असलेल्या आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठात हा अभ्यासक्रम सुरु करण्याची सूचना देणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. तसंच कोल्हापुरातील विद्यापीठात या कोर्सचं कोऑर्डिनेशन शुभांगी घराळे या करतील असंही सामंत म्हणाले. सर्वच राजकीय पक्षाचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असल्याचंही सामंत यावेळी म्हणाले.

महापुराच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरुपी उपायांवर विचार सुरु- मुश्रीफ

महापुराच्या पार्श्वभूमीवर आता कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी सरकार गांभीर्यानं विचार करत आहे. काही गाव, वस्त्यांचं कायमस्वरुपी पुनर्वसन करत आहोत. एकीकडे महापुराचं चित्र असताना दुसरीकडे अहमदनगर जिल्हा आणि राज्यातील काही भागात महिन्याभरापासून पाऊस नाही. तिथे दुष्काळी स्थिती पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं सांगितल्याप्रमाणे उद्यापासून पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. मात्र, त्या भागासाठीही काही करता येईल का? याचा विचार सरकार करत असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

तीव्रता जास्त, मात्र नुकसान तुलनेने कमी : सतेज पाटील

या कार्यक्रमात बोलताना राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दरवर्षी येत असलेल्या आपत्तीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. 2019 आणि 20 च्या तुलनेत यावर्षी पावसाची तीव्रता कित्येक पटीने अधिक होती. या परिसरात दरडी कोसळण्याच्या घटना ही इतक्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच झाल्या आहेत. असं असलं तरी जिल्हा प्रशासनांनी केलेल्या नियोजनामुळे या वर्षी तुलनेने नुकसान कमी झाल असल्याचंही ते म्हणाले. या संकटावर सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असून राज्य सरकार त्यासाठी पुढाकार घेईल असेही त्यांनी आश्वस्त केलं.

सरकारला महागात पडण्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत द्या- राजू शेट्टी

महापूर आणि अन्य नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर सरकारनं कायमस्वरुपी उपाययोजना करायला हव्या. वैश्विक तापमान वाढीमुळं कमी काळात जास्त पाऊस पडतोय आणि त्या पावसाचं पाणी धारण करण्याची नद्यांची क्षमता राहिलेली नाही. नद्यांमध्ये गाळ साचल्यामुळे नद्या उथळ झाल्या आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात 5 नद्यांवर 103 पूल असेल आहेत, ज्यावर दीड ते दोन किलोमीटर भराव आहे. त्या भरावामुळे पाणी रेंगाळतं, 10-10 दिवस पाणी राहतं आणि मोठं नुकसान होतं. अशा ठिकाणी कमानीचे पूल बांधले जावेत. राज्य सरकारनं नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांवर कुठेतरी अन्याय केला आहे असं मला वाटतं. दुकानदाराला 50 हजार रुपये आणि शेतकऱ्याला फक्त 13 हजार रुपये मदत हा अन्याय आहे. हा अन्याय तुम्हाला महागात पडण्यापूर्वी निर्णय बदलावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

11 देवदूतांचा सन्मान

1. सुनील कांबळे, कोल्हापूर 2. विश्वनाथ शिंदे, चिपळूण 3. सचिन लकेश्री, चिपळूण 4. महेश हिरेमठ, सांगली 5. रणजीतराजे शिर्के, चिपळूण 6. शुभांगी घराळे, कोल्हापूर 7. सुधीर भोसले, चिपळूण 8. साक्षी दाभेकर, महाड 9. पप्पू महाडिक, चिपळूण 10. महेश सानप, महाड 11. स्वप्निल पाटील, कोल्हापूर

इतर बातम्या :

महापुराच्या संकटात अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या देवदूतांना टीव्ही 9 मराठीचा सलाम, महाराष्ट्रवासियांकडून कौतुकाची थाप

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला सोमवारपासून सुरुवात; ठाण्यातील आनंदनगर चेक नाका येथून शुभारंभ!

Uday Samant announces to start disaster management courses in all universities

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.