सचिन तेंडुलकरांचा ‘असा’ अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का? : देवेंद्र फडणवीस

भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोचीत माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या पुतळ्यावर काळे तेल टाकत निषेध व्यक्त केला (Devendra Fadnavis ask question to Maha Vikas Aghadi leaders)

सचिन तेंडुलकरांचा 'असा' अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का? : देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 11:24 PM

मुंबई : भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोचीत माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या पुतळ्यावर काळे तेल टाकत निषेध व्यक्त केला. एएनआयने याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. या ट्विटला रिट्विट करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेते हे सहन करणार का? असा सवाल केला आहे (Devendra Fadnavis ask question to Maha Vikas Aghadi leaders).

“केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे भूषण असलेले, भारतरत्न आणि मराठी माणसाचे अभिमान असलेले सचिन तेंडूलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?”, असं देवेंद्र फडणवीस ट्विटरवर म्हणाले आहेत. या ट्विटला आता देवेंद्र फडणवीस नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल (Devendra Fadnavis ask question to Maha Vikas Aghadi leaders).

नेमकं प्रकरण काय?

दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन पॉपस्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी केलेल्या टिप्पणीला सचिन तेंडुलकर याच्याकडून अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर देण्यात आलं. “भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात, पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये”, असं सचिनने ट्विटमधून ठणकावून सांगितलं. मात्र, या ट्विटवरुन अनेकांनी त्याच्यावर टीका केली. सचिन तेंडुलकरच्या ट्विट विरोधात कोचीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला.

सचिन तेंडुलकरचं ट्विट नेमकं काय?

भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात, पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये. भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ती गोष्ट त्यांनीच ठरवावी. देश हा एकसंध राहिला पाहिजे, असे ट्विट सचिन तेंडुलकर याने केले आहे.

हेही वाचा : बिहारच्या राजकारणात सचिन तेंडुलकर केंद्रस्थानी, नेमकं कसं?

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.