‘चांदिवाल आयोगाचा अहवाल अत्यंत धक्कादायक’, देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

देवेंद्र फडणवीस यांनी चांदिवाल आयोग आणि अनिल देशमुख यांच्याबाबत नवा गौप्यस्फोट केला आहे. चांदिवाल आयोगाने देशमुखांना क्लीन चीट दिलेली नाही, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. अहवालातून उघड झालेल्या भ्रष्टाचाराच्या पुराव्यांबद्दल आणि महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेवर फडणवीसांनी टीका केली आहे.

'चांदिवाल आयोगाचा अहवाल अत्यंत धक्कादायक', देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 6:17 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्याबाबत नवे गौप्यस्फोट केले आहेत. एकीकडे अनिल देशमुख यांनी चांदिवाल आयोगाच्या अहवालात आपल्या विरोधात कुणाताही पुरावा सापडला नसल्याचं म्हटलं आहे. पण दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी चांदिवाल आयोगाचा अहवाल अत्यंत धक्कादायक असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी घोटाळ्यांचे आरोप झाले होते. अनिल देशमुख महाविकास आघाडीचं सरकार असताना मुंबईतील मोठमोठ्या बार आणि पबचालकांकडून दर महिन्याला 100 कोटी रुपये घ्यायचे, असा आरोप तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. परमबीर यांनी त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पोलीस महासंचालकांना पत्र लिहून याबाबतचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच 11 महिन्यांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये राहावं लागलं होतं. याच प्रकरणी चांदिवाल आयोगाच्या अहवालावरुन आता राजकारण तापताना दिसत आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे गंभीर आरोप

“चांदीवाल आयोगाचा अहवाल अत्यंत धक्कादायक आहे. त्यांनी अनिल देशमुख यांना कुठलीही क्लीनचीट दिली नसल्याचं स्पष्टपणे म्हटले आहे. हा अहवाल उद्धव ठाकरे यांचे सरकार असतानाच आला आहे. पण त्यांनी त्यावर काहीही कारवाई केली नाही. आरोपी आणि साक्षीदार यांची एकत्रित भेट एक डीसीपी करून देत होता, असा उल्लेख आहवालात आहे. अनेक पुरावे मला दिसत होते. पण यांच्या साटेलोटं असल्यामुळे मला ते रेकॉर्डवर घेता आले नाही”, असा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

“महाविकास आघाडीच्या काळात हा भ्रष्ट्राचार आहे. वसुलीचे यापेक्षा मोठे पुरावे काहीच असू शकत नाहीत. सचिन वाझेने कोर्टाला पत्र लिहलं. त्यात त्याच्यावर कसा दबाव आणला हे सांगितलं. हे प्रकरण गंभीर आहे. गृहमंत्री आणि त्याकाळचे सरकार यामध्ये इनव्हॉल आहे का? त्याची चौकशी करणे गरजेचं आहे. जाणीवपूर्वक या सगळ्या लोकांनी मला गोवण्याचा प्रयत्न केला. पण जे केलंच नाही त्याला डर कशाचा? त्यामुळे ते मला गोऊ शकले नाहीत. हा धक्कादायक खुलासा आल्यानंतर माझं मत आहे एक फ्रेश चौकशी या प्रकरणाची केली पाहिजे”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.