Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट येण्याची शक्यता, ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील कटुता खरंच संपणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं जास्त औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नवे संकेत दिले आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट येण्याची शक्यता, ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील कटुता खरंच संपणार?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 6:52 PM

मुंबई : महाराष्ट्राने गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक राजकीय बदल पाहिले. महाराष्ट्रात गेल्या आठ महिन्यांमध्ये दोनवेळा राजकीय भूकंप येऊन गेले. एक म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेलं बंड आणि त्यातून झालेलं सत्तांतर. त्यानंतर शिवसेना (Shiv Sena) पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांनाच देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) दिला हा दुसरा भूकंप होता. या घडामोडींमुळे शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांच्यात टोकाची कटुता निर्माण झालीय. हीच कटुता कमी करण्याच्या दिशेला आता भाजपने (BJP) एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि सध्याच्या शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यामुळे ते राज्यभरात आता जाहीर सभा घेऊन भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधणार आहेत. या सर्व घडामोडींदरम्यान आता महाराष्ट्र भाजपची वाटचाल उद्धव ठाकरेंसोबतची कटुता कमी करण्याच्या दिशेला होताना दिसत आहे. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज तशीच वक्तव्य केली आहेत.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उद्धव ठाकरेंसोबतची कटुता संपवण्याचे संकेत मिळाले आहेत. आमच्या मित्रांना कुणीतरी भांग पाजला होता, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. विरोधकांनी असा नशा करण्यापेक्षा आता चांगली कामे करावीत, असा सल्ला त्यांनी दिलाय. “आम्ही विधानसभेत उभं राहून म्हटलं होतं की, अनेकांनी आम्हाला त्रास दिला. या सगळ्या लोकांचा आम्ही बदला घेऊ. आम्ही त्यांना आधीच माफ केलं आहे. आमच्या मनात आता कोणतीही कटुता नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

हे सुद्धा वाचा

“आमचे काही मित्र आहेत त्यांना कुणीतरी खोटं सांगून भांग पाजून दिलं. त्यानंतर दिवसभर त्यांचं जे काही चाललं होतं, कुणी गाणं म्हणत होतं, कुणी रडतच होतं. हे सगळं पाहून मजा आली. पण मी हे सांगण्याचा प्रयत्न केला की, असा नशा करण्यापेक्षा भक्तीचा नशा करावा, संगीताचा, कामाच नशा करावा”, असं आवाहन त्यांनी केलं.

चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना उद्देशून महत्त्वाचं विधान केलं. “संजय राऊतांनी मतभेद आणि मनभेद विसरुन काम करावं”, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. “मी संजय राऊत यांना विनंती करेन की त्यांनी आजपासून मनभेद आणि मतभेद बाजूला सारुन एकत्रितपणे महाराष्ट्र पुढे नेण्याचं काम करावं”, असं आवाहन बावनकुळे यांनी केलं.

भाजपला महाविकास आघाडीपासून मोठा धोका

विशेष म्हणजे महाविकास आघाडी दिवसागणिक घट्ट होत चालली आहे. पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीतील मतदानाची आकडेवारी तर हेच सांगताना दिसत आहे. याशिवाय एक महिन्यापूर्वी विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरशी ठरली होती. महाविकास आघाडीकडून आपली मतं फुटणार नाहीत यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आले. महाविकास आघाडीची ही एकजुट आगामी निवडणुकांमध्ये अशीच असली तर भाजपला मोठा धोका उद्भवण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांच्याविषयाची सहानुभूती मतांमध्ये दिसली तर….

आगामी निवडणुका या भाजपसाठी महत्त्वाच्या आहेत. कारण राज्यातील मोठ्या शहरांमधील महापालिकांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. यामध्ये मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे, औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरांचा समावेश आहे. या निवडणुकांनंतर संपूर्ण देशात लोकसभेची निवडणूक असणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत जिंकून यायचं असेल तर भाजपला रिस्क घेणं महागात पडू शकतं. कारण उद्धव ठाकरे संपूर्ण राज्यात सभा घेणार आहेत. त्याचा फटका कदाचित भाजपला बसू शकतो. कारण उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्याचे वंशज आहेत. ते बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. स्वत: बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्ष सुपूर्द केला होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्या बद्दलची सहानुभूती असेल तर ती आगामी निवडणुकांमध्ये मतांच्या रुपात दिसून येण्याची दाट शक्यता आहे.

भाजपपुढे मार्ग काय?

एकनाथ शिंदे यांनी आजच्या घडीला संपूर्ण शिवसेना पक्ष टेकओव्हर केल्याचं चित्र आहे. याशिवाय निवडणूक आयोगाने शिंदे यांचा गटच खरा शिवसेना पक्ष असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये सध्याच्या शिवसेनेसोबत भाजप निवडणुका लढवण्याची शक्यता आहे. पण तरीही पिक्चर अजूनही बाकी आहे. कारण सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. सुप्रीम कोर्टाचा काय निकाल येईल, यावर आगामी काळातील राजकीय गणितं अवलंबून आहेत. असं असताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतची कटुता संपवण्याचे संकेत दिल्यामुळे भाजपची आगामी वाटचाल शिवसेनेच्या दोन्ही गटांना सोबत घेऊन चालण्याची आहे की काय? अशी चर्चा आता सुरु झालीय.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात धुळवडीचा आनंद लुटला. यावेळी त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. पण त्यावर त्यांनी जास्त बोलणं टाळलं. त्यांनी विरोधकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. याशिवाय सगळ्यांना सद्धबुद्धी मिळो, अशी प्रतिक्रिया दिली.

काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.