Devendra Fadnavis Live : ‘राज्यात शरद पवारांएवढा जाणकार नेता नाही; पण ते सध्या मोजकंच बोलतायत’
देवेंद्र फडणवीस आज उस्मानाबादचा दौरा करत आहेत. (Devendra Fadnavis Flood Affected Inspection Tour Osmanabad District Visit Live Update)
उस्मानाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापुरात केलेल्या पाहणी दौऱ्यानंतर कोणताही दिलासा मिळालेला नाही. केंद्रातून मदत कशी येते, याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आहे, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबाद दौऱ्यात सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जुने व्हिडीओ शेअर करत फडणवीसांनी त्यांना जुन्या वक्तव्यांची आठवण करुन दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या पाहणी दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून ते उस्मानाबादचा दौरा करणार आहे. (Devendra Fadnavis Flood Affected Osmanabad District Visit Live Update)
?LIVE UPDATE?
LIVE : केंद्रातून मदत कशी येते हे शरद पवार यांना चांगलं माहिती आहे : देवेंद्र फडणवीस https://t.co/eIKj4Eop7R #DevendraFadnavis @Dev_Fadnavis pic.twitter.com/DZ36uhXyyQ
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 20, 2020
[svt-event title=”देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका” date=”20/10/2020,9:46AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : जे सत्तेत असतात, त्यांनी संयम दाखवायचा असतो, त्यांना शेतकऱ्यांची काहीही लेनदेन नाही, त्यांना फक्त राजकारण करायचं आहे : देवेंद्र फडणवीस https://t.co/eIKj4Eop7R #DevendraFadnavis @Dev_Fadnavis pic.twitter.com/leHJm6wRx8
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 20, 2020
[/svt-event]
LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आता संधी आहे, त्यांनी जुन्या मागण्यांची पूर्तता करावी, खूप कमी मदतीचे धनादेश दिले : देवेंद्र फडणवीस https://t.co/eIKj4Eop7R #DevendraFadnavis @Dev_Fadnavis pic.twitter.com/BjLxxYFLxU
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 20, 2020
LIVE : देवेंद्र फडणवीसांकडून ‘लाव रे तो व्हिडीओ’चा प्रयोग, जुने व्हिडीओ दाखवत शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी https://t.co/eIKj4Eop7R #DevendraFadnavis @Dev_Fadnavis pic.twitter.com/xGY92mRqCy
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 20, 2020
LIVE : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर कोणताही दिलासा मिळाला नाही : देवेंद्र फडणवीस https://t.co/eIKj4Eop7R #DevendraFadnavis @Dev_Fadnavis pic.twitter.com/m38RlEcAQC
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 20, 2020
LIVE : सरकारने मदत करण्याची गरज आहे, तात्काळ जे काही पंचनामे ते करा, ज्या ठिकाणी पंचनामे शक्य नसेल तर मोबाईलने पाठवलेला फोटो ग्राह्य धरावा : देवेंद्र फडणवीस https://t.co/eIKj4Eop7R #DevendraFadnavis @Dev_Fadnavis pic.twitter.com/fM6Ol9gZEd
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 20, 2020
परतीच्या पावसाने तसेच अतिवृष्टीने राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा पाहणी दौरा करणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील बेगडा आणि तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा या गावातील नुकसानीची फडणवीस पाहणी करणार आहेत.
दरम्यान काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बारामतीपासून नुकसान पाहणी दौरा सुरु केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापुरात, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लातुरात, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या.
देवेंद्र फडणवीसांसोबत भाजप नेते प्रवीण दरेकर एकत्रितपणे पश्चिम महाराष्ट्रातल्या काही गावांना भेटी देत आहे. तसंच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत.
माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते मा. श्री @Dev_Fadnavis यांचा 20 ऑक्टोबरचा अतिवृष्टी पाहणी दौरा.@ChDadaPatil Patil@mipravindarekar pic.twitter.com/Xr5rlj6gKm
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 20, 2020
कसा असेल देवेंद्र फडणवीसांचा उस्मानाबाद दौरा?
- 9 AM – पत्रकार परिषद
- 9.30 AM – बेगडा ता उस्मानाबाद येथे अतिवृष्टीने झालेली नुकसान पाहणी
- 10 AM – तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांची आणि शेतीची पाहणी
? लातूर जिल्हा
- 12 PM – आसीव नुकसानग्रस्त भागात पाहणी
- 12.30 PM – बुदोडा भागातील पाहणी
? बीड जिल्हा
- 2 PM – चतुरवाडी अंबाजोगाईत पाहणी
? परभणी जिल्हा
- 4.30 PM – निळा सोनपेठ तालुक्यातील पाहणी
- 5 PM – गंगाखेड येथील पाहणी
प्रविण दरेकर यांचा दौरा
9 AM – अक्कलकोट येथे सचिन शेट्टी यांच्या घरी भेट भेट 10 AM -संगोगी येथे नुकसानीची पाहणी 10.30 AM -अंधेवाडीज येथील पाहणी 12 PM -जिल्हाधिकारी ,कृषी अधिकाऱ्यांसोबत चर्चा 12.30PM -पत्रकार परिषद 3.30 PM -उमदी जत पाहणी 4.30 PM -बाळेवाडी येथील पाहणी
परतीच्या पावसाचा किती मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे, याचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्यासासंबंधी आश्वासने नेत्यांनी दिली. मात्र सध्या सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांचे दौरे सुरु असले तरी केंद्र व राज्य सरकार एकमेकांकडे बोट दाखवत मदतीचा चेंडू एकमेकांकडे टोलवत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी अजूनही राज्य सरकारने किंवा केंद्र शासनाने भरीव मदतीची घोषणा केलेली नाही.
देवेंद्र फडणवीसांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काल दुपारपर्यंत हे दौंड-बारामती भागात होते. त्यानंतर भिगवण, इंदापूर, करमाळ्याचा त्यांनी दौरा केला. “सरकारने मदत द्यावी म्हणून सरकारवर दबाव निर्माण करु. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्य समजून घेतलं पाहिजे. विरोधात असताना आणि आमच्यासोबत असताना ते मागण्या करायचे. आता त्यांना ईश्वराने मदतीसाठी शक्ती दिली आहे. त्यांनी तातडीने मदत करावी. तातडीने मदत करण्यासाठी काहीही लागत नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis Flood Affected Inspection Tour Osmanabad District Visit Live Update)
संबंधित बातम्या :
देवेंद्र फडणवीसांची नुकसान पाहणी सुरुच, अंधारात लाईट लावून शेतकऱ्यांशी चर्चा
देवेंद्र फडणवीसांचा नुकसान पाहणी दौरा, बारामतीतून सुरुवात
थिल्लरबाजी करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा