Nitesh Rane : देवेंद्र फडणवीस हे हिंदूह्रद्यसम्राट, उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न, काय म्हणाले नितेश राणे?
लव्ह जिहाद प्रकरणी श्रीरामपूरमध्ये गेल्या काही काळात मुली बेपत्ता होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याविरोधात आंदोलनात आता भाजपा आणि नितेश राणे हेही उतरलेले दिसत आहेत. धर्मांतरण आणि आदिवासी तरुणांच्या अपहरणाच्या घटनाही वाढल्या आहेत. या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सर्व हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे.
शिर्डी – राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)हे कडवट हिंदुत्ववादी आहेत. तर हिंदूह्रद्यसम्राट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)हे उपमुख्यमंत्री आहेत. हे शिर्डीतील पोलीस अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांनी दिला आहे. अपहरण, धर्मांतरण आणि लव्ह जिहाद प्रकरणी नगर जिल्ह्यात शिर्डीमध्ये नितेश राणे यांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यात हजारो जण सहभागी झाले होते. श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी नितेश राणे यांनी फडणवीस यांचा उल्लेख हिंदूह्रद्यसम्राट असा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावर देवेंद्र फडणवीसांना हिंदुहृदय सम्राट म्हणण्यात चुकीचं काय? जो जो हिंदूचे रक्षण करतो, हिंदूच्या हृदयात आहे त्यांना हिंदुहृदयसम्राट नाही म्हणायचं, तर काय म्हणायचं असा प्रतिप्रश्न राणे यांनी उपस्थित केला आहे.
धर्मांतरण, अपहणाविरोधात आक्रमक
लव्ह जिहाद प्रकरणी श्रीरामपूरमध्ये गेल्या काही काळात मुली बेपत्ता होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याविरोधात आंदोलनात आता भाजपा आणि नितेश राणे हेही उतरलेले दिसत आहेत. धर्मांतरण आणि आदिवासी तरुणांच्या अपहरणाच्या घटनाही वाढल्या आहेत. या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सर्व हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे. अपहरण प्रकरणात पोलीस अधिकारी माहिती द्यायला तयार नाही. त्यांना बहुतेक या राज्याचे अल्पसंख्याक मंत्री हे आता नवाब मलिक राहिलेले नाहीत, तसेच नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आता हसन मुश्रीफ नाहीत, याचा विसर पडलेला दिसतो, असा टोलाही राणे यांनी पोलिसांना लगावला आहे. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आल्यानेच या प्रकरणात कारवाई आणि चौकशी सुरु असल्याची आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली.
उद्धव ठाकरे यांचे सरकार हिंदूद्वेषी
राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार हे हिंदूद्वेषी होते, याच मविआ सरकारच्या काळात हिंदूंना दाबण्यात आले. धर्मांतरणाचे प्रकार वाढल्याची टीका त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात हिंदू धर्मांवर निर्बंध टाकण्यात आले. त्यांनी आता हिंदुत्वाची भाषा करु नये, अशी टीका राणे यांनी केली आहे. अडीच वर्षाच्या कार्यकाळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधण्याऐवजी याकूब मेमन याच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आले. अशी टीका त्यांनी केली आहे. त्यांना बाळासाहेबांच्या नावाने मते मागू नका, हे सांगण्याचा अधिकार आहे का, असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. बाळासाहेबांपेक्षा याकूब मेमन मोठा झाला आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.