Eknath Shinde | घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने कालबाह्य केलं – एकनाथ शिंदे
निकालावर समाधान व्यक्त करतो. निश्चितपण लोकशाहीमध्ये लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय झाला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई :”सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर समाधान व्यक्त करतो. निश्चितपण लोकशाहीमध्ये लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय झाला” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “हा जो काही निकाल आहे, त्यात चार-पाच महत्वाचे मुद्दे आहेत, त्याकडे लक्ष वेधू इच्छितो” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद
– महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर सर्वोच्च न्यायालयाने पाणी फेरलय
– पहिल्या सारखीस्थिती कायम ठेवता येणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलय. म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत.
– सभापतींचे अधिकार सभापतीना दिला आहे.
– त्या 16 आमदारांचे अधिकार त्यांच्याकडे आहेत.
– निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु होता, तो चुकीचा आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलय.
– आमच सरकार कायदेशीर आहे हे सिद्ध झालं आहे.
– उद्धव ठाकरे म्हणाले, मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, आमच्यासोबत निवडून आलात. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार बनवलं, त्यावेळी उद्धव ठाकरे नैतिकता कुठल्या डब्ब्यात बंद करुन ठेवली होती? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.
एकनाथ शिंदे यांनी मांडलेले मुद्दे
– लोकशाहीत अपेक्षित निकाल लागला, सत्याचा विजय झाला – एकनाथ शिदे
– कायदेशीर बाबींची पूर्तता करुन सरकार स्थापन केलं. आज सुप्रीम कोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केलं.
– घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना चपराक लगावली
– घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने कालबाह्य केलं.
– आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांना दिला आहे.
– सरकार अल्पमतात आल्यामुळे आधीच्या मुख्यमंत्र्यांनी राजीना दिला.
– घटनात्मक बाबींची काळजी घेऊन सरकार स्थापन केलं.
– धनुष्यबाण वाचवण्याच काम आम्ही केलं.
– धनुष्यबाण गहाण ठेवण्याचा काम तुम्ही केलं.
– सर्वोच्च न्यायालायच्या निर्णयाच मनापासून स्वागत करतो.