करुणा मुंडे निवडणूक लढवतात… धनंजय मुंडेंच्या वकिलाचा त्या युक्तीवादाने गेम पालटणार
धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना दरमहा २ लाख रुपये पोटगी देण्याच्या आदेशाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज या याचिकेवर सुनावणी झाली. मुंडेंच्या वकिलांनी युक्तीवाद करत करुणा मुंडे यांचे स्वतःचे उत्पन्न आणि आर्थिक क्षमता यांच्यावर भर दिला.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना दर महिन्याला 2 लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशावरोधात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी धनंजय मुंडेंच्या वकिलाने कोर्टात विविध मुद्दे मांडले. मी मुलांना स्वीकारत आहे, पण मी त्यांच्या आईशी लग्न केलं नाही, असा युक्तीवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला. तसेच धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांनी निवडणूक लढवली त्याबद्दलही भाष्य केले.
करुणा शर्मा यांनी पोटगीची रक्कम तुटपुंजी असून ती 9 लाख रुपये करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. आता याप्रकरणी धनंजय मुंडेंच्या वकिलांनी कोर्टात बाजू मांडली. यावेळी करुणा मुंडे यांना पोटगी मिळण्याप्रकरणी अंतिम युक्तीवाद करण्यात आला. यावेळी धनंजय मुंडे यांच्या बाजूने वकिलांनी कोर्टात युक्तीवाद केला. या दरम्यान वकिलांनी करुणा शर्मा यांचे उत्पन्न आणि आर्थिक बाबींवरही भाष्य केले.
राजश्री मुंडे या धनंजय मुंडे यांच्या खऱ्या पत्नी आहेत. मी मुलांना स्वीकारत आहे, पण मी त्यांच्या आईशी लग्न केलं नाही. धनंजय मुंडे यांचे करुणा मुंडेंसोबत झालेले लग्न अधिकृत नाही. धनंजय मुंडेंनी मी मुलांना स्वीकारत आहे, पण मी त्यांच्या आईशी लग्न केलं नाही, असा युक्तीवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला.
त्या स्वतः स्वतःचा खर्च मॅनेज करतात
यावेळी धनंजय मुंडेंच्या वकिलांनी उत्पन्नाबद्दल भाष्य केले. करुणा मुंडे यांना १५ लाखाच्या जवळपास वर्षाला इन्कम आहे, त्या इन्कम टॅक्स भरतात. त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत. तरी त्यांनी पोटगीसाठी अर्ज केला आहे. करुणा मुंडे यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत. त्यांना माझ्या पैशांची गरज नाही. त्या स्वतः स्वतःचा खर्च मॅनेज करत आहेत, असे धनंजय मुंडेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितले.
त्यांच्याकडे निवडणूक लढायला सुद्धा पैसे आहेत
करुणा मुंडे यांची अनेक क्षेत्रात गुंतवणूक आहे. बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक आहे. त्या इन्कम टॅक्स भरतात. त्यांच्याकडे निवडणूक लढायला सुद्धा पैसे आहेत, त्यांना पोटगीची गरज काय? एका व्यवसायात त्यांनी 3 करोड रुपये गुंतवणूक केली आहे त्यांना पोटगी कशाला? त्या आर्थिक सक्षम आहेत, असा युक्तीवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला.