AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर मी हिरोईन झाले असते… धनंजय मुंडे कुणाला देणार होते 20 कोटी?; करुणा शर्मा यांचा मोठा दावा काय?

करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर लग्न, २० कोटींच्या लाच आणि धमक्यांचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आपण मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचा दावा केला आहे आणि त्यासाठी पुरावे सादर केले आहेत.

तर मी हिरोईन झाले असते... धनंजय मुंडे कुणाला देणार होते 20 कोटी?; करुणा शर्मा यांचा मोठा दावा काय?
Karuna Sharma dhananjay munde
| Updated on: Apr 05, 2025 | 2:41 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी वांद्रे न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका सुनावणीत धनंजय मुंडे यांनी मी दोन्ही मुलांची जबाबदारी घ्यायला तयार आहे, पण करुणा शर्मा यांच्याशी लग्नच झालेले नाही, असा दावा केला होता. आता आज याप्रकरणी माझगाव कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी धनंजय मुंडेंचे वकिलांनी करुणा शर्मा यांनी लग्नाच्या पुराव्यांसाठी कागदपत्रे बनावट बनवली आहे, असा धक्कादायक आरोप केला आहे.

करुणा शर्मा यांनी माझगाव कोर्टात पार पडलेल्या सुनावणीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपण धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहोत, असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. त्यांनी याबाबतचे सर्व पुरावे सादर केले असल्याचे सांगितले. आम्ही लवकरच याबद्दलची रेकॉर्डिंग लवकरच सादर करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

हे सर्व पुरावे आणि सह्या खऱ्या

“आम्ही या संदर्भात न्यायालयात धाव घेतली आहे. सादर केलेले सर्व पुरावे खरे असून, त्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या सही आणि अंगठ्याचा ठसा असलेला मृत्युपत्र आणि स्वीकृतीनामा यांचा समावेश आहे. राज घनवट यांची सही देखील या कागदपत्रांवर आहे. यासोबतच धनंजय मुंडे एका गृहकर्जात जामीनदार असल्याचे पुरावेही सादर करण्यात आले आहेत. हे सर्व पुरावे आणि सह्या खऱ्या असल्याचे करुणा शर्मा यांनी सांगितले.

“माझ्याकडे पुरावे नसते तर मी समोर आले नसते. धनंजय मुंडे यांना हे प्रकरण दाबायचे होते. मला मिळणाऱ्या कोणत्याही गोष्टीशी आपले काहीही घेणेदेणे नाही, परंतु आपण त्यांची पहिली पत्नी आहोत हे सिद्ध करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्याकडे जगभरातून मिळवलेले पुरावे आहेत आणि त्यांनी कोणतीही आर्थिक मदत केलेली नाही. धनंजय मुंडे यांच्यासोबत माझे जॉईंट अकाऊंट आहे. त्यासोबतच काही रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत. मी त्या लवकरच माध्यमांना देणार आहे”, असे करुणा शर्मा यांनी म्हटले.

माझी अवस्था बिकट

“माझे जीवन रस्त्यावर आणले. आज धनंजय मुंडे घरात आरामात बसले आहेत, पण माझी अवस्था बिकट झाली आहे. मी गाडी घेऊन आलेली असताना मोठा हंगामा केला. मला रस्त्यावर आणि मीडियासमोर आणणारा धनंजय मुंडेच आहे,” असा आरोप करुणा शर्मा यांनी केला.

“मला एका चित्रपटात काम करण्याची ऑफर होती, परंतु मी ती नाकारत पतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. माझ्यासोबत लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे २० कोटी रुपये देणार होते. माझा पती इतका वाईट नाही. पण त्याने दलाल लोक बाजूला सांभाळले आहे. माझ्या नावावर काही नाही. मला आणि माझ्या मुलांना नेहमी धमकी दिली जाते”, असे गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केले आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.