धुळे
Intro: खानदेशातील एक महत्त्वाचा जिल्हा म्हणून धुळ्याची ओळख आहे. पांझरा नदीच्या काठावरच्या प्रदेशात विस्तारलेले धुळे हे खानदेशातील प्रमुख प्रशासकीय केंद्र आहे. याठिकाणी एमआयडीसी, वाहतूक विभाग आणि एमटीडीसीची विभागीय मुख्यालये आहेत. आदिशक्ती एकविरा आणि स्वामीनारायण या मंदिरांमुळे धुळे जिल्ह्याचे धार्मिक महत्त्वही मोठे आहे. वस्त्रोद्योग, खाद्यतेल उत्पादन, माहिती व तंत्रज्ञान आणि हातमाग उद्योगासाठीही धुळे जिल्हा ओळखला जातो. धुळ्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग जात असल्यामुळे राज्यातंर्गत वाहतुकीच्यादृष्टीनेही जिल्ह्याला विशेष महत्त्व आहे. आगामी काळात या भागातून आणखी चार राष्ट्रीय महामार्ग जाणार आहेत. याशिवाय, धुळे जिल्हा दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोअर प्रकल्पाचा भाग आहे. धुळे जिल्हा हा दूध आणि तुपाच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. जिल्ह्यात प्रामुख्याने भुईमूगाची शेती केली जाते. त्यामुळे या भागात अनेक कृषीपूरक उद्योगांची साखळी उभारली गेली आहे. याशिवाय, धुळ्यात पवनचक्की आणि सौरउर्जेच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर उर्जानिर्मिती होते. येथील साक्री तालुक्यात आशियातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्पांपैकी एक आहे. याशिवाय मिरचीच्या उत्पादनसाठीही धुळे जिल्हा प्रसिद्ध आहे. तसेच जिल्ह्यात विडी वळणे, कुंभारकाम, विटभट्टी, हातमाग यासारखे अनेक लघुद्योगही आहेत. मुंबई आणि दिल्लीपासून धुळे जिल्हा हा समान अंतरावर आहे. त्यामुळे या भागात मोठे लॉजिस्टिक पार्कही उभारण्यात आले आहे.
धुळ्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.
पुढे वाचा