खाकी वर्दीतल्या माणुसकीचं दर्शन, आगीत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबाला महिन्याचा किराणा वाटप
खाकी वर्दीतील पोलिसांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारा प्रसंग धुळे जिल्ह्यात समोर आला आहे. Police Help to family in dhule
धुळे: खाकी वर्दीतील पोलिसांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारा प्रसंग धुळे जिल्ह्यात समोर आला आहे. गॅस सिलेंडरच्या स्फोटात संपूर्ण घर जळून खाक झालेल्या कुटुंबाला पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्याकडून किराणा साहित्य वाटप करण्यात आलंय. पोलीस अधिकारी पदाचं कर्तव्य बजावत असताना दुर्गेश तिवारींनी दाखवलेल्या माणुसकीचं दर्शन सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. (Dhule Dondaicha Police Inspector Durgesh Tiwari help family who lost all things due to fire outbreak)
पोलिसांच्या वर्दीतही माणूस
पोलीस म्हटलं की आपण दूरच राहावं अस अनेकांच्या मनात भावना असते. या खाकीवर्दी मागे अनेक वेळेस भीतीही दडलेली असते. परंतु, याच खाकी मागे हाडामासाचा आणि भावनाशील असलेला माणूस देखील लपलेला आहे. याचाच प्रत्यय शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या निमित्तानं दिसून आला आहे.
पीडित कुटुंबाचं काय होणार हा विचार
दोन दिवसापूर्वी शिंदखेडा तालुक्यातील रहीम पुरे गावात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले होते. कुटुंबा समोर आता अस्मानी संकट उभे राहिलेलं होतं. क्षणात होत्याचं नव्हतं झालं, या कुटुंबाच्या डोळ्यासमोर त्यांचं घर जळून खाक झालं होतं. याचवेळी आपलं कर्तव्य म्हणून दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी घटनास्थळी आले होते. पंचनामा कागदपत्रांची जमवाजमव या एकूण सगळ्या शासकीय कामकाजाची पूर्तता करत असताना तिवारी यांच्या डोक्यात कुटुंबाचं पुढं काय हा विचार आला. एकीकडे अशी कोरोनाची परिस्थिती तर दुसरीकडे आर्थिक चक्र थांबलेले असताना या पीडित कुटुंबावर आलेल संकट, असे अनेक प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होते.
महिनाभर पुरेल इतका किराणा देत मायेचा हात
खाकीतला माणसाच्या मनात कुटुंबाला मदत करण्याचं आलं. कुटुंबाला थोडाफार का होईना! मदतीचा हातभार लागावा. डोळ्यातील ओलेचिंब वाहणारे अश्रू पुसता यावे म्हणून पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी कर्तव्य पार पाडत या पिडीत कुटुंबाला महिनाभर पुरेल इतका किराणा साहित्य भेट देऊन या दुःखी परिवाराचे सांत्वन केलं. मायेचा हात डोक्यावर फिरवून खाकी वर्दीतील खऱ्या माणुसकीचा दर्शन या अधिकार्याकडून पाहावयास मिळाल आहे. निस्वार्थपणे आपले कर्तव्य बजावत असताना अशा संकटापायी पीडित गोरगरिबांसाठी धावून येणाऱ्या खाकी वर्दीतील देवदूत माणसाचं सर्व स्तरावरून मन भरून कौतुक देखील व्यक्त होत आहे. या पीडित कुटुंबांना आधार देण्याकरिता याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष लोले, पोलीस कर्मचारी योगेश पाटील, वाहन चालक संजय गुजराथी, पोलीस पाटील राजेश बेडसे, माजी सरपंच दिनेश बेडसे, मनोहर पाटील, नकुल पाटील, विश्वास पाटील, निंबा पाटील, चंद्रकांत पाटील मुकेश पाटील, उ. खा. पाटील आदी उपस्थित होते.
VIDEO : भारतात कोरोना रुग्णसंख्येचा आजही उद्रेक, 3 लाख 68 हजार 147 कोरोनाचे नवे रुग्ण#India #CoronaUpdate #CoronaVirus #NewPatient pic.twitter.com/edSFkUrhy2
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 3, 2021
संबंधित बातम्या:
महाराष्ट्रात 28 जिल्ह्यात कोरोनाचं संकट पसरलं, लॉकडाऊन हाच पर्याय? वाचा सविस्तर
प्रत्येक महिन्याला कमवा बक्कळ पैसा, Post Office ची खास योजना, वाचा किती होणार फायदा?
(Dhule Dondaicha Police Inspector Durgesh Tiwari help family who lost all things due to fire outbreak)