मुस्लिम शेतकऱ्याची महादेवावर श्रद्धा, स्वखर्चातून मंदिर उभारले

दोन दिवसांपूर्वी त्यांनी महादेवाची पिंड, नंदी आणि पार्वतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. (Dhule Muslim Farmer Built temple)

मुस्लिम शेतकऱ्याची महादेवावर श्रद्धा, स्वखर्चातून मंदिर उभारले
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 7:11 PM

धुळे : धुळे तालुक्यातील बिलाडी येथे मुस्लिम समाजातील शेतकरी सांडू सुमन पिंजारी यांची भगवान महादेवावर प्रचंड श्रद्घा आहे. या श्रद्धेतून त्यांनी गावात सर्वात मोठे महादेवाचे मंदिर उभारले आहे. या मंदिरासाठी सांडू सुमन पिंजारी यांनी गावातील कुणाकडूनही एक रुपया देणगी घेतली नाही. त्यांनी स्व:कष्टातून जमवलेल्या पैशातून हे मंदिर उभारले आहे. या मंदिरात दोन दिवसांपूर्वी त्यांनी महादेवाची पिंड, नंदी आणि पार्वतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. (Dhule Muslim Farmer Built temple)

हिंदू-मुस्लिम समाजात एकोपा नांदावा यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होत आहे. काही ठिकाणी हे दोन्ही समाज एकमेकांच्या सण, उत्सवात सहभागी होऊन एकसंघतेचे दर्शन घडवतात. धुळे तालुक्यातील बिलाडी गावात असा सामाजिक एकोपा दिसून येत आहे.

बिलाडी येथे दहा ते बारा मुस्लिम कुटुंबांचे वास्तव्य आहे. या ठिकाणी राहणारे सांडू सुमन पिंजारी हे मुस्लिम समाजातील असून ते शेती करतात. त्यांची दोन्ही मुले ट्रॅक्टरचालक म्हणून काम करतात. त्यांची कौटुंबिक परिस्थिती फार बेताची आहे. (Dhule Muslim Farmer Built temple)

सांडू पिंजारी यांची भगवान महादेवावर नितांत श्रद्धा आहे. या श्रद्धेतून त्यांनी स्वत:च्या शेतात महादेवाचे मंदिर उभारण्याचा संकल्प केला. हा संकल्प तडीस नेण्यासाठी त्यांनी पाच वर्षांपूर्वी शेतात मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. गावातील मुस्लिम व्यक्ती मंदिर उभारत असल्यामुळे अनेकांनी त्यांना मदत करण्यासाठी हात पुढे केले. मात्र, सांडू पिंजारी यांनी कुणाकडूनही मदत न घेता मंदिर उभारले.

गेल्या पाच वर्षांत शेतातून मिळालेले उत्पन्न, मुलांनी केलेल्या आर्थिक मदतीतून त्यांनी या मंदिराचे बांधकाम केले. या मंदिराचे काम नुकतेच पूर्ण झाले. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच या मंदिरात भगवान महादेवाची पिंड, पार्वती आणि नंदी अशा तीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विशेष म्हणजे त्यापूर्वी गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गावातील नागरिकही सहभागी झाले. तसेच रविवारी भंडारा वाटप करण्यात आला. दरम्यान, संपूर्ण पिंजारी कुटुंबाने मंदिरात पूजाविधीही केला.

निवडणुकीतही सामाजिक एकोपा

विशेष बाब म्हणजे बिलाडी गावात ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्वांनी सांडू पिंजारी यांच्या महादेव मंदिराच्या संकल्पपूर्ती कार्यक्रमात एक सहभाग नोंदवला. मूर्तीची मिरवणूक, प्राणप्रतिष्ठा आणि महाप्रसाद वाटपाच्या कार्यक्रमातून सामाजिक आणि धार्मिक एकोपा निर्माण होण्यास मदत झाली. (Dhule Muslim Farmer Built temple)

संबंधित बातम्या : 

मोदी सरकार अंबानी-अदानीसाठी काम करतंय, पुढच्या निवडणुकीसाठी फंडची तयारी सुरु : मेधा पाटकर

Palghar Mob Lynching | पालघर साधू हत्याकांड प्रकरणी अटकेतील आणखी 89 आरोपींना जामीन मंजूर

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.