अवकाळी आला आणि सगळच घेऊन गेला,; आता पंचनामे होणंही झालं अवघड…

वादळी वाऱ्यासह आणि विजांसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून रब्बी पिकांसह फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.

अवकाळी आला आणि सगळच घेऊन गेला,; आता पंचनामे होणंही झालं अवघड...
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 8:37 PM

धुळे : महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. तर दुसरीकडे शासकीय कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळेही शेतकरी संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेलं उभं पीक अवकाळी पावसामुळे मातीत जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशीच परिस्थितीत दुसऱ्यांदा धुळे जिल्ह्यावर ओढावली आहे. धुळे जिल्ह्याला आठवड्याभरात दुसऱ्यांदा अवकाळी पावसाने झोडपले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे शेतीचे नुकसान होऊनही त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ना शासनाचे अधिकारी आहेत ना कोणते पथक आहे.  त्यामुळे आता झालेल्या नुकसानीची भरपाई मागायची कुणाकडे असा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा आणि धुळे तालुक्यात अवकाळी पावसाने मुसळधार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात असणारी उभी पिकं भूईसपाट झाली आहेत.

शेतीचे प्रचंड नुकसान होऊनही आता शासकीय कर्मचारी आंदोलनात सहभागी असल्यामुळे आता झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी कोण करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसामुळे दुसऱ्यांदा फटका बसला आहे. धुळे जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडल्याने त्याचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला आहे.

वादळी वाऱ्यासह आणि विजांसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून रब्बी पिकांसह फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसामुळे धुळे जिल्ह्याला मोठा फटका बसला असला तरी आणि प्रचंड नुकसान झाले असले तरी आता या नुकसानीचे पंचनामे करणार कोण असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

जुनी पेन्शन योजनेसाठी सगळे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले असल्याने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे होणार की नाही असाही सवाल आता उपस्थित केला जात आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.