Dhule Rada : धुळ्यात नगरपंचायत निवडणुकीनंतर दोन गटात राडा, एका महिलेचा मृत्यू, नागरिकांचे पोलीस ठाण्यासमोर आंदोलन
मोहिनी जाधव या शिवसेनेच्या पराभूत उमेदवार ताराबाई जगताप यांच्या पुतणी आहेत. या झटापटीत मोहिनी गंभीर जखमी होऊन मरण पावल्या. भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उमेदवारांकडून मोहिनी यांना मारहाण करण्यात आली व त्यात त्या गंभीर जखमी होऊन मयत पावल्या असा आरोप मयत मोहिनीच्या नातेवाईकांनी केला आहे.
धुळे : साक्री नगरपंचायतीच्या मतमोजणीनंतर रात्री झालेल्या तुंबळ हाणामारीमध्ये महिलेचा मृत्यू झाला होता. आज पोस्टमोर्टमनंतर मृतदेह गावात आणताच ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी एम्बुलेंस अडवून धरली. मारेकर्यांना जोपर्यंत ताब्यात घेणार नाही तोपर्यंत मृतदेह ॲम्बुलन्स बाहेर काढणार नाही असा नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पावित्रा घेतला आहे. मोहिनी नितीन जाधव असे मृत महिलेचे नाव आहे. पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून नागरिकांचे आंदोलन सुरू आहे. भटक्या विमुक्त जातीचे असल्यामुळे जाणीवपूर्वक मारहाण केली असल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे. यामुळे परिसरात तणावाची स्थिती असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी 9 जणांविरोधात साक्री पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल निवडणूक निकालानंतर भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला होता राडा
साक्री नगरपंचायत निकालानंतर या निकालाला गालबोट लागले आहे. साक्री नगरपंचायत निवडणूक प्रभाग क्रमांक 11 च्या शिवसेनेच्या उमेदवार ताराबाई राजेंद्र जगताप या पराभूत झाल्यानंतर भाजपच्या व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटी झाल्या. प्रभाग क्रमांक 11 चे उमेदवारांच्या परिवारातील सदस्यांमध्येही शाब्दिक चकमक झाल्यानंतर दोन्हीकडचे लोक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यावेळी मोहिनी जाधव या वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेल्या. मोहिनी जाधव या शिवसेनेच्या पराभूत उमेदवार ताराबाई जगताप यांच्या पुतणी आहेत. या झटापटीत मोहिनी गंभीर जखमी होऊन मरण पावल्या. भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उमेदवारांकडून मोहिनी यांना मारहाण करण्यात आली व त्यात त्या गंभीर जखमी होऊन मयत पावल्या असा आरोप मयत मोहिनीच्या नातेवाईकांनी केला आहे.
मयत मोहिनी जाधव यांच्या नातेवाईकांचे उपोषण सुरु
दरम्यान संपूर्ण साक्री शहरातील मोहिनी यांचे नातेवाईक व मित्र परिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपोषण सुरु केले आहे. सर्व गुन्हेगारांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. या प्रकरणात विजयी उमेदवार व भाजप कार्यकर्ते यांचा समावेश असल्याचं सांगितलं जातं आहे. (Fight between two groups after Nagar Panchayat elections in Dhule, death of a woman)
इतर बातम्या
Muktainagar : मुक्ताईनगरमध्ये क्षुल्लक कारणावरुन ऑन ड्युटी वनरक्षकाला मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल