Nandurbar Accident | कंटेनर-आर्टिका गाडीचा भीषण अपघात, तीन जण ठार, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू
नंदुरबार जिल्ह्यात कंटेनर आणि आर्टिका गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात गावाकडं परतणारे तीन जण ठार झाले. यात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाचा समावेश आहे. ही घटना रात्री एकच्या सुमारास घडली.
नंदुरबार : नंदुरबार निझर रस्त्यावर कंटेनर आणि आर्टिका (Containers and Artica) गाडीचा भीषण अपघात झाला. रात्री 1 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात तीन जण ठार झाले. अपघातात हिरालाल पवार, अनिल सोलंकी, प्रशांत सोनवणे हे ठार झालेत. प्रशांत सोनवणे हे रेल्वे सुरक्षा दलाचे (Railway Security Force) जवान होते. नंदुरबार जिल्ह्यात रस्त्यांची कामे अर्धवट पडलेली आहेत. काम सुरू असल्यानं रस्ता खराब असल्यानं अंदाज घेता येत नाही. याकडं रस्ता महामार्ग प्रशासनानं लक्ष देण्याची गरज आहे. पोलीस दल हे महामार्गाचं काम करतात. पण, रस्ता नादुरुस्त असल्यानं ते दुरुस्त करण्याचं काम हे महामार्ग प्रशासनाकडं (Roads and Highways Administration) आहे. नंदुरबार हा जिल्हा स्वतंत्र जिल्हा झाला. पण, महामार्गाचं कार्यालय नाही. या कामासाठी धुळेला जावं लागतं. तेथील प्रशासनाचं रस्त्यांकडं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय.
सुटीवर आले होते
हे तिन्ही मित्र सुटीवर आले होते. प्रशांत सोनवणे हे रेल्वे सुरक्षा दलात जवान होते. त्यांचं मुळ गाव नंदुरबार जिल्ह्यतील पथराई आहे. पथराई इथं गावाकडं मित्रांसोबत जात असताना हा अपघात झाला. गावातून निघाले आणि हायवेला लागले. पण, समोरून येणारा कंटेनर गाडीवर आदळला. यात तिघेही ठार झाले. या गाडीला धडक खूप जोरात बसली. त्यामुळं गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली. तिघांच्याही मृतदेह छिन्नविछिन्न झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. मृतदेह शवविच्छेदानासाठी पाठविण्यात आले आहेत.